पाककृती
काकडीची खमंग धिरडी ....
Primary tabs
नमस्कार मिपाकरानो ,
नवीन वर्षातली ही माझी पहिली जिलेबी ......;)
ओह ! आय मीन रेसेपी ;)
एकदम झटपट बनवता येणारा अन चवीला लाजवाब असा प्रकार आहे .
काकडीची धिरडी
साहित्य : एक काकडी. (किसलेली ).
एक मध्यम कांदा (किसलेला ).
एक वाटी बाजरीचे पीठ.
अर्धी वाटी बेसन पीठ .
आलं अर्धा इंच .
लसूण पाकळ्या ६-७ ,
हिरव्या मिरच्या ६-७ .
तीळ एक चमचा .
जीर एक छोटा चमचा.
लाल-तिखट अर्धा चमचा .
हळद अर्धा चमचा .
मीठ चवीनुसार .
कोथिंबीर चिरलेली.
तूप / लोणी /तेल /बटर ( मी धिरड भाजण्यासाठी तूप अन लोणी वापरलं आहे )
कृती : आलं ,लसुण ,मिरची ,कोथिंबीर याची एकत्र पेस्ट बनवून घ्यावी ,
एका बावूलमध्ये वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे , त्यात थोड पाणी घालावं ,मिश्रण जास्ती पातळ नको अन घट्टही नको,मध्यम ठेवावं.( जास्त पातळ झाले तर धिरड खरपूस भाजल जात नाही ,अन जाड असेल तर कच्च लागत )
एका पॅनमध्ये थोड तूप / तेल घालून त्यावर मिश्रण घालावं ,चमच्याने पसरून घ्यावं ,जितक पातळ पसरवता येईल तितक !
आता दोन्ही साईडने धिरड खरपूस अन खमंग होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या ,वरतून भरपूर तूप /लोणी घाला
अन गरम गरम धिरड सॉस / शेंगदाण्याची चटणी / दही / लोणच याबरोबर सर्व करा . :)
( गरम गरम धिरड खाण्याच्या नादात फोटोकडे अंमळ दुर्लक्ष झाले त्याबद्दल क्षमा असावी ) :)
शेंगदाण्याच्या चटणीवर एवढा उजेड का पाडलाय ?
तुमच्याकडे फ्लॅश असणारा डीजीकॅम आहे हे कळले...
सर्व मंजे काय काय??
एका बावूलमध्ये वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
बागुल बुवाची आठवण झाली :)
झुणक्याच्या पोळीचा 'मॉर्डन' अवतार??
आहा... :)
मी गोड घावन खाल्ले आहे,हे पण ट्राय मारायला हवे आता ! ;)
वा..!
तेवढं अशुद्धलेखन सुधारा की पियुषातं. कितीवेळा तुम्हाला गोग्गोड शब्दात सांगायचं?
अहो तिला हपिसात कि नै कुप कुप काम अस्तं म्हने. मग गद्बदित चुक होताता. तुमाल कस कल्नार हो एशीत बस्लेल्यना ;)
(अशुदलेकख) अन्या
टीपः पहिले काही शब्द चुकुनसुद्धा चुकीचे लिहू शकलो नाही याबद्दल क्षमस्व ;)
http://www.misalpav.com/node/6332
वाचा एकदा ..असुढ्द कसे लिहावे ;)
आमच्या मावशीकडं सोलापुरात अगदि अस्सच करतात हे धिरडं....
अहो पियुशातै,
त्याला धिरड म्हणत नाही ओ, धिरडं म्हणतात.
आणि फोटोंकडे जरा लक्ष्य देत जा हो बै.
ओके सगळ्याना इतकाच त्रास आहे तर मी धागा अप्रकाशित करायला सान्गते
धन्यवाद :)
फकस्त नेस्ट टैम कल्जि घेने
उत्तम.
आणि मग खरडींमध्ये पण तू अशुद्ध लिहितेस असे लोकं बोलली की सदस्यत्व पण काढून घ्यायला सांग. ;)
काय येवढ्या तेवढ्या गोष्टी मनाला लावून घेते बे ?
फाट्यावरती मारुन मोकळे होणे. साला हाय काय आन नाय काय !
त्रास नका देऊ रे कोणी बिचारील. आपापले प्रतिसाद संपादीत करा पाहू.
बॉडीगार्ड
परा
चुकून
पराबॉडी
गार्ड
असे वाचले ;)
पाकृ चांगली आहे, अजुन येवु द्यात .
छान! भाजणी घालूनसुद्धा अप्रतिम होतात!
धिरडी छानच दिसतायेत गं पियुशा... चवीलाही छान झाली असतीलच.
फक्त फोटो फ्लॅशशिवाय काढले असते तर डोळे एवढे दिपले नसते :P
मस्तच ग.....
छान
अरे वाह... पियु बॅक इन अॅक्शन :)
बॅक इन अॅक्शन ला
पियु 'इनअॅक्टिव्ह' कधी होती/ता.... ?
मी पण ह्याचे गोड थालपीठ खाल्ले आहे. हे असे करुन बघायला पहिजेत. चांगली आहे पाकृ.. :)
छान छान पियु
पाकृ करून बघितली पाहिजे :)
जिलबी...अपलं..ते..हे सॉरी...धिरडी अवडली.... :-)
मस्त धिरडी पियुषा
अवांतर : एकदा एक जावई सासरी जातो, तिथे सासू त्याला धिरडी बनवून खाऊ घालते. घरी आल्यावर बायकोला म्हणतो कि "ते" करून खाऊ घाल जे तुझ्या आईने बनवले होते. तिला काही समजत नाही, तो पण सारखा म्हणतो "ते" करून खाऊ घाल. ह्या घोळात तिला मारून तिची पाठ सुजवतो, शेजारची बाई म्हणते "नवरा हाय का काय हाय पाठ कशी धिरड्यावाणी सुजवलीय" नवरा अत्यानंदाने ओरडतो " हेच ते जे मी तुला करून खायला घालायला सांगत होतो"
फार चविष्ट प्रकार दिसतो आहे. करून बघितला पाहिजे. रंगसंगतीसाठी ह्यात थोडा गाजराचा किसही छान दिसेल आणि पौष्टीकही होईल.
या धाग्यावर शुद्ध्लेखना विषयी चर्चा अपेक्षित नैय्ये पण गाजराचा कीस म्हणायचं होत का तुम्हाला??
प्र.का.टा.आ.
आशा आहे प्रत्यक्षात तसं नसावं.
ओ जलेबीबाई, धिरडी आवडली गेल्या आहे. आता नविन जिलेब्या पाडायला कुठला मुहूर्त शोधणार आहेस..
- पिंगू
लई भारी गुरुमैय्या!खूप गुणाची आहे माझी पिवशी.
तू कुठुन एवढ्या वेगवेगळ्या पाककृती आणतेस ग? मी तर हे नावही पहिल्यांदा ऐक्तीये.मला वाटल उपवासच थालीपीठ असेल.
करायला हव.
>>तू कुठुन एवढ्या वेगवेगळ्या पाककृती आणतेस ग?
पंडोरा बॉक्स का काय म्हणतात बघा ;)
मला तर फोटोच दिसले नाही , त्यामुळे जे झालं ते उत्तम असेल अशी आशा करतो..
मा. किचेनताई, आपल्याकडुन अशा उपेक्षित प्रतिसादाची अपेक्षा नव्हती हे नमरपणे नमुद करु इच्छितो.
मा. पियुषताई, धागा उडवु नये हि नमर विनंती.
माझ्या प्रतिसादामध्ये उपेक्षित वाटेल अस काय आहे? :?
तुमचा काहीतरि गैरसमज झालाय बहुतेक.
या दोन्ही रंगीत व अधोरेखित पदार्थांमधील फरक काय ??
५ मार्कासाठी प्रश्ण... एका वाक्यात उत्तरे दिली तरी चालतील....
लोणी म्हणजे ते जे बाळकृष्ण मडक्यातून चोरून खायचा,आणि बटर म्हणजे ते जे अमूलची मुलगी कागदात बांधून देते.
आणि दुसरे बटर चहाबरोबर खातात...लोकल बेकर्यांमध्ये मिळतात.
पाचवीच्या इंग्रजी विषय शिकवणार्या मास्तरीण बाइंची चुकच झाली.....
Butter = लोणी शिकवलं होतं त्यांनी.... आजच त्यांना जाब विचारीन म्हंतो....
गुरु अन त्यांच्या प्रिय शिष्येला (मा. श्री. संजीव कपुर यांच्या भगिनी जिल्बुषाजी नगरकर अन वधु-वर संयोजिका स्वयंपाकघर बाइ) विनंती आहे, माझ्या त्या मास्तर्नीला माफ करावे....
अन असले प्रश्न उपस्थित केल्याबद्दल, चितळे बंधुंच्या सदाशिव पेठेतील दुकानासमोर उभे करुन मला चाबकाचे १० फटके मारण्यात यावेत ही शिक्षा मी स्वतःच कबुल करतो.....
------