पाककृती

सामोसा/समोसा चाट

Primary tabs

साहित्य सामोसा/समोसा भाजी: ४ बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात १/२ वाटी उकडलेले मटारचे दाणे २ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जिरेपूड १ टेस्पून गरम-मसाला १ टीस्पून आमचूर पावडर (फोटोत नाही आहे पण पुढे कृतीत वापर केला गेला आहे ) १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार ५-६ कढीपत्ता तेल Image removed. पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन जीरे, कढीपत्ता, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. Image removed. पेस्ट चांगली परतली गेली की त्यात चिरून ठेवलेले बटाटे, उकडलेले मटारचे दाणे, धणे-जीरेपूड, गरम-मसाला व मीठ घालावे. Image removed. त्यात आमचूर पावडर घालून सर्व एकत्र करावे. Image removed. भाजी तयार झाली की गार करायला ठेवावी. साहित्य सामोसा/समोसा आवरण व तळण: २ वाट्या मैदा १/४ वाटी बारीक रवा १ टीस्पून ओवा मीठ चवीनुसार कडकडीत तेलाचे मोहन Image removed. पाकृ: वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालावे . Image removed. गार पाण्याने कणीक घट्ट भिजवून ठेवावी. २०-२५ मिनिटांनी त्याचे गोळे करावेत.गार पाण्याने भिजवल्यामुळे सामोसे खुसखूशीत होतात. Image removed. तयार गोळयाची पोळी लाटावी, फार जाड ही नको...फार पातळ ही नको. लाटलेल्या पोळीचे मधो-मध दोन भाग करावे. Image removed. अर्ध्या भागाचा त्रिकोण करावा व त्याला मैदा-पाण्याची पेस्ट लावून बंद करावा. टोक ही नीट बंद करावे नाहीतर तळताना तेल आत जाईल. Image removed. Image removed. तयार त्रिकोणात तयार भाजी भरून कडा नीट बंद कराव्यात. Image removed. Image removed. गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर सामोसा/समोसा तळावेत. Image removed. तयार सामोसे /समोसे. Image removed. साहित्य छोले / चणा ग्रेव्ही : (ही ग्रेव्ही नेहेमीच्या छोल्यांप्रमाणे नाही जराशी आंबट-गोड आहे) २ वाट्या उकडलेले काबुली चणे किंवा टीनमधले चणे १ छोटा कांदा बारीक चिरलेला १ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टेस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जीरेपूड १ टेस्पून छोले मसाला १ टीस्पून जीरे ३-४ टेस्पून चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे) ४-५ टेस्पून चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे) मीठ चवीनुसार तेल Image removed. पाकृ: एका भांड्यात तेल तापवून जीरे, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. Image removed. त्यात लाल-तिखट, धणे-जीरेपूड, छोले मसाला घालून परतावे. Image removed. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणावी. चवीपुरते मीठ घालावे. Image removed. आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालणे. Image removed. आवडीप्रमाणे गुळ घालणे व नीट मिक्स करणे. Image removed. रस्सा अंगासरशी ठेवावा. सर्व्हींग : तयार सामोसे /समोसे तयार छोले/ चणा ग्रेव्ही हिरवी चटणी चिंचेची चटणी फेटलेले दही बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर चाट-मसाला Image removed. एका प्लेटमध्ये सामोसा/ समोसा कुस्करुन घ्यावा व त्यावर डावाने छोले ग्रेव्ही घालावी. Image removed. त्यावर थोडे फेटलेले दही, हिरवी चटणी व चिंचेची चटणी घालावी. Image removed. त्यावर कांदा, टोमॅटो , चाट-मसाला, शेव व कोथिंबीर घालावी व लगेच खायला सुरुवात करावी. Image removed. नोटः वरील पाकृ थोडी मेहनतीची आहे पण तुम्ही ही आणखीन सोपी करु शकता. विकतचे सामोसे/ समोसे आणून बाकी कृती तशीच बनवावी. इथे फ्रोझन पट्टी सामोसे/ समोसे मिळतात जे विशेष आम्हाला आवडत नाही म्हणून मी घरीच सामोसे/ समोसे बनवते :) आवडत असल्यास सामोस्याच्या भाजीत हळद घालावी.
अन्या दातार

एकतर इतक्या मेहनतीने ते सामोसे बनवा, आणि नंतर परत कुस्करा. कशाला इतका त्रास करुन घ्यायचा? त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या सारणासाठी भाजी करुन घ्यावी, पारीची पुरी तळून घ्यावी आणि हे दोन जिन्नस छोले ग्रेव्हीत मिक्स करावेत. चव तीच राहिल आणि त्रासही कमी. कसे? :)

(इथुन पुढे तुमच्या पाकृना मस्त, चांगले, तोंपासू इ.इ. सर्व विशेषणे आहेत हे गृहित धरावे. प्रतिसाद दिला नसेल तरीही ;) )

गणपा

त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या सारणासाठी भाजी करुन घ्यावी, पारीची पुरी तळून घ्यावी आणि हे दोन जिन्नस छोले ग्रेव्हीत मिक्स करावेत

+१ रे अन्या.

बाकी मेहनत अफाट घेतली आहे.
कुठुन उपासाच्या दिवशी धागा उघडला असे झाले. ;)

किसन शिंदे

कुठुन उपासाच्या दिवशी धागा उघडला असे झाले.

तेच म्हणतो.. पाहवं कि नाही, या पेचात पडलेलो.
एकतर आधीच गेल्या महिन्याभरापासून घरात समोसे बनवण्यासाठी भुणभूण सुरू होती त्यात आता रंगीबेरंगी फोटोवाला धागा कहर..!

अन्या दातार

एकतर आधीच गेल्या महिन्याभरापासून घरात समोसे बनवण्यासाठी भुणभूण सुरू होती

काय हे किसना? इतके दिवस सांगूनही सामोसे बनवले नाहीस? छे, तुझ्यासारख्या व्यक्तिकडून ही अपेक्षा नव्हती. अरे एखादा कट्टा चुकला असता तर काय आभाळ कोसळणार होतं का? तोच दिवस पकडून केले असतेस सामोसे तर चांगलं झालं असतं की नै?? ;)

किसन शिंदे

अरे एखादा कट्टा चुकला असता तर काय आभाळ कोसळणार होतं का?

अन्या बाळा, असे किती कट्टे झालेयत रे माझे गेल्या महिन्याभरात? तुझ्या नोंदवहीत बघून सांग जरा.

५० फक्त

मा. अन्याभाउ,' सुसभ्य व्यक्तिमत्वाचे किसन शिंदे 'असं म्हणायचंय का तुम्हाला ?

सोत्रि

वरील पाकृ थोडी मेहनतीची आहे पण तुम्ही ही आणखीन सोपी करु शकता. विकतचे सामोसे/ समोसे आणून बाकी कृती तशीच बनवावी.

एवढी मेहनत करणे शक्य नाही, त्यामुळे ही पूर्ण डीशच विकत आणावी म्हणतो ;)

पण मस्त फोटो खासकरून चमचे!

- (ऐतखाऊ) सोकाजी

प्रचेतस

का असा छळवाद मांडताय. त्रास आहे नुसता त्रास.

अवांतरः ५० राव ही पाकृ पाहून विशेष आनंदित होणार यात काहीच शंका नाही. :)

प्यारे१

सानिका तैंचा स्वप्निल असो...!

स्मिता.

हे असे फोटो टाकून आम्हाला फक्त जळवणे अज्ज्जिबात आवडले नाहीये. यापुढे तुझ्या पाकृंना माझ्याकडून प्रतिक्रिया मिळणार नाही यांची नोंद घे ;)

पप्पुपेजर

तुमच्या पाककृती पाहून आमचे डोळे दिपतात !!! तुम्ही (MASTER CHEF India ३) मध्ये जरूर भाग घ्या

मनि२७

मी नेहमीच तुमच्या पाक्रु वाचत असते... आणि बरर्याच करून पण पहिल्या आहेत......
तुमच्या सगळ्याच पाक्रु, वर्णन आणि स्तुती करण्या पलीकडे आहे.... :-)
खूपच छान....
आणि सामोसे चाट तर लाजवाब !!!
एक नंबर आले आहे...
फोटो जीवघेणे आहे मात्र !!!
:-)

मनि.....

तुमचे कुटुंब हे अत्यंत नशिबवान आहे.. भयंकर पुण्यसंचय असल्याशिवाय घरात अशी सुगरण मिळत नाही....
रोज रोज नवे पदार्थ.... क्या बात है!!

सविता००१

मी पण स्मिताशी सहमत. आता तुला प्रतिक्रिया देणारच नाही

हसरी

प्रेझेंटेशन एकदम बेस्टेस्ट आहे. तुमचं कौतुक वाटलं. :-)

पण प्रचंड मेहनतीची डिश आहे ही... आयतीच मिळाली तर अगदी पोटभर खाऊ.

एकाच धाग्यात ३ वेळा खपल्या गेल्या आहे.

मागच्या महिन्यात एकेठिकाणी चाट खाल्ली. ती इतकी भिकार होती, की चाट म्हणले की आता काटा येतो अंगावर. मात्र आता ही पाकृ पाहून पुन्हा ट्राय मारल्या जाईलच.

मी सामोसा खाणाराच !

परेश कणकवलीकर ;)

प्रीत-मोहर

मागच्या महिन्यात एकेठिकाणी चाट खाल्ली. ती इतकी भिकार होती, की चाट म्हणले की आता काटा येतो अंगावर. मात्र आता ही पाकृ पाहून पुन्हा ट्राय मारल्या जाईलच.

मी पण सहमत!!!

मी सामोसा खाणाराच !

परेश कणकवलीकर

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

५० फक्त

येस्स्स्स अँड ही इज बॅक, बॅक वुईथ अ समोसा,
बाकीचं नेहमीचं तेच ते तेच ते लिहित नाही पुन्हा.

Mrunalini

मी परवाच सामोसे केले होते... अगं पण आज चतुर्थी आहे नाअ.. मग का असा माणसीक छळ करते??? ;)

आचारी

मेलो..............खपलो.........................अरे काय जीव घेताय आमचा...............एवढे चटकदार फोटो टाकुन आणि तेहि चतुर्थिच्या दिवशि .............का छ्ळ करताय..........कोणितरि था॑बवा रे ....................

पाक्रु एकदम झकास.........फोटो त्याहुनहि मस्त.......... भन्नाट.........जबरदस्त........अजुनहि बर॑च ........आता था॑बतो......तो॑डातिल लाळेमुळे बोलता येत नाहिये..........

सुहास..

ठार !!!!

अवांतर : पतीराजांना निरोप द्या आमचा " नशीबवान आहात " असा :)

रेवती

फोटू नेहमीप्रमाणेच्........विद्या बालन!;)
कृती जरा वेळखाऊ आहे पण कष्टाचं फळही चवदार असतं.

सुनील

समोश्याला समोशाचा आकार देणे आजपावेतो जमलेले नाही. पण आता त्याची तोडमोडच करायची म्हटल्यावर आकार कसाही आला तरी चालेल! :) तेव्हा करून पहायला हरकत नाही!

अवांतर - निदान ह्या पाकृततरी चमचे दिसणार नाहीत असे वाटले होते :)

पिंगू

येत्या विकांती समोसा चाट बेत पक्का..

- पिंगू

बबलु

_/\_ .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ ..

आणि शेवटून दुसरा फोटू जीवघेणा.

पाषाणभेद

पाककृतीकडे लक्ष न देता फोटो बघितले.

तोंडात लाळ माझ्या माईना...माईना.

प्राजु

काय सारखं सारखं सांगायचं बाई तुला!!
अशक्य नीटनेटकेपणा आहे.. त्या छोल्यामध्ये, समोश्यामध्ये आणि शेवटच्या चाट मध्ये...

श्यामल

व्वा ! पाककृती आणि पाककृतीच्या प्रत्येक टप्प्याचे फो टो ज्या सुबकतेने आणि नजाकतीने सादर केले आहेत, ते पाहुन एखाद्या नवशिकीने अथवा एखाद्या नवशिक्यानेही ही पाककृती सहज केली तर नवल वाटायला नको.........

RUPALI POYEKAR

खुपच छान दिसतेय, एकदम आवडली

मस्तं पाककृती आहे.

समोसे बनविताता बारीक चिरलेला कांदा तळून घ्यायचा आणि तो तेलातून काढून निथळवून समोश्यांच्या सारणात घालायचा तसेच आमचूर ऐवजी चांगल्य प्रतीचा चाट मसाला तसेच कोथींबीर वापरल्यास समोसे अजून चविष्ट होतील.
समोशात कढीपत्ता टाळावा.
समोशांचे छायाचित्र पाहता मैद्यात जे मोहन घातले आहे ते नीट मिसळले गेलेले नाही असे दिसते. कडकडीत मोहन न घालता थंड तेल मिसळून मैदा भरपूर मळावा लागतो. म्हणजे, मैदा आणि तेल पुर्णंपणे एकजीव झाले की आवरणाला फोड येते नाहीत. आणि आवरण खुसखुशीत होते.

बाकी पाककृती दिसायला मस्त आहे. चवीलाही भन्नाट असणार. अभिनंदन.

तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे पुढच्यावेळेस नक्की तसे बनवून बघेन समोसे :)
धन्यवाद