मेथी डाळ !!
Primary tabs
ही आधी केलेली स्वयंपाक घरातील लुडबुड
http://www.misalpav.com/node/16330
http://www.misalpav.com/node/13709
http://www.misalpav.com/node/13909
http://www.misalpav.com/node/14007
आणि दिपालीदेवी आणि गणपाशेफ यांच्या प्रेरणेवरून.
विनंती : पाकृ करताना फोटो काढण्याच्या त्रेधा-तिरपटी साठी लेखकांस क्षमा असावी
भारतीय आहारपध्दतीत डाळी ला अन्यनसाधारण महत्व आहे, (लोक घर की मुर्गी दाल बराबर म्हणत असले तरी जर का दाल परफेक्ट असेल तर बाहेरची मुर्गी देखील...हॅ हॅ हॅ ;) ) साधं रेस्टारंट मध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीचा डाल फ्राय /डाल तडका यांच्याशिवाय मेनु पुर्ण होत नाही. डाळ ही सहजा-सहजी कूठे ही मिळत असली तरी बनवणे म्हणजे महा कर्म कठीण काम असते. जरा तेलाच,पाण्याच प्रमाण, कूकर ची शिट्टी, जिरे-मोहरी चा तडका हिकडचा तिकडं झाला की डाळीची वाट लागलीच म्हणुन समजा. (वर आमच्या सारख्या आय टी नवर्यांना " साधी डाळ करता येत नाही " हे एकावे लागेल ते बोनसमध्ये ;) )...असो ...
अश्याच काही डाळींमध्ये मेथी डाळ हा एक अजुन अवघड प्रकार, स्वताचा 'कूकींग सेन्स' चा कस पहायचा असेल तर ही पाकृ चॅलेंज म्हणुन करायला हरकत नाही, कारण मेथी चा कडवट पणा आणि डाळी ची चव, जिर्याचा तडका, हिरव्या-लाल मिरच्या, ह्या सर्व जिन्नसांची योग्य त्या प्रमाणात शिजवण झाली नाही तर जिभेवर ठेवल्या-ठेवल्या बनवणार्याच्या प्रयत्नांची बोळवण होते. (मी जेव्हा पहिल्यांदा केली तेव्हा कूकर उघडला तशी माझी शेजारिण घावत येवुन म्हणाली की घरात 'वायर' जळाली आहे बहुधा ;) ) आणि याच मुळे ही पाकृ लिहीताना मी प्रमाण देण्याचे टाळतो आहे.
१ ) मेथी खुडून घ्या. (सुचना : बाजारात हल्ली कलर केलेल्या मेथीच्या गड्ड्या असतात, आधी घेताना भाजीवाल्याच्या नकळत एक भिजलेले पान खुडून जरा चिमटीत घासुन घ्या , हाताला कलर लागला तर सरळ दुकान बदला.)
२ ) डाळ निवडुन भिजवुन घ्या. ( सुचना : इथे ही कलर्ड, प्रोसेस्ड भानगडी आहेतच, मी माझ्या च शेतातली वापरतो :) )
३ ) ट्माटे कापुन घ्या, मिरच्यांचे देठ खुडून घ्या (ज्यांना तिखट हवे असेल त्यांनी कापुन घ्या ! मी नंतर तडका देताना लाल मिरच्या टाकल्या आहेत.)
(पुढे सर्व काही मंद आचेवर )
४ ) थोड तेल, थोड हिंग (ही आमची चॉईस ) टमाटे आणि मिरच्या कूकर मध्ये परतावुन घ्या.
५ ) डाळ आणि मेथी नीट पणे मिक्स करुन घ्या. ( इथे पाणी घालण्याचे प्रमाण सांगत नाही, मेथीला पाणी लागत नाही, मात्र डाळ शिजण्यासाठी लागते , स्वता ठरवायचे आहे . )
६ ) कूकर ला शिट्ट्या दोवु द्यात ( मी एकच दिली :) ) मध्यंतरात , लसुन सोलुन घ्या, पेस्ट बनवा वा आमच्या पध्दतीने चिरडुन घ्या ;)
७ ) ईकडे कुकर थंड झाल्यावर (कडवट सुगंध आला पाहिजे मेथीचा पण जरा व्यवस्थित :) )
७ ) मग तडका एके तडका !!
८ ) वर शिजवलेली डाळ टाका ..एक उकळी येवु द्यात
९ ) गरमा-गरम मेथी डाळ तयार !! ( मी काही सोबत चपात्या बनविल्या, वाटाणा-बटाटा पुलाव सकाळीच केला होता)
या मंडळी जेवायला
येतोच रे संध्याकाळी उपास सोडायला. :)
मी पण येते उपास सोडायला!मस्त!
:)
आयला, मस्तच की :)
पण तुम्ही दाळ कोणती वापरली आहे
मला तर तुरीची दिसत आहे ,मग ती फक्त एका शिट्टीमध्ये कशी शिजली ?
वा रे आयटी हमाल...आणि हसबंड..
ही श्री सुहास यांनी आयटी हमालांसाठी सुरु केलेली 'झुनका भाकर' टाईप योजना तर नव्हे? ;)
यकदम तडका मारके पाकृ रे.
बाकी पोळ्या तू बनवल्यास ह्यावर अंमळ विश्वास ठेवणे कठिण जात आहे.
तो आय टी मध्ये आहे हे गृहितक आधी लक्षात घे , म्हणजे मग अंमळ विश्वास ठेवणे कठिण जाणार नाही.
बाकी पोळ्या तू बनवल्यास ह्यावर अंमळ विश्वास ठेवणे कठिण जात आहे.
हॅ हॅ हॅ
असेच म्हणतो
जबराट दिसतोय रे तडका
मस्त पाकृ.
मेथीच्या भाजी ऐवजी मेथ्या ( मेथी दाणे ) पाण्यात भिजवून त्याला मोड येउ द्यायचे ( १.५ दिवस लागतात ).
हे मोड घालून सुद्धा छान वरण होतं.
ट्राईड आने टेस्टेड! बेश्टच.
नकळत कशाला? त्याच्या समोरच घ्या की करून काय ते..
अजून असेच पदार्थ येवू द्या.....
पाककृती छान आहे. पण मेथी कुकरला न लावता डाळ शिजवुन मग एकत्र केली तर शिजायला फारसा वेळ लागणार नाही. स्वाद जास्त चांगला येईल. तुरडाळ एक शिट्टी मध्ये शिजली हे बघुन एकदम आनंद झाला :)
बाकी बेत मस्त आहे
मेथी डाळ तर आवडतेच. फोटोतही मस्त दिसतेय. ताट बघून जेवायला बसावसं वाटतंय :)
बाकी हिंग आणि मेथी तडक्याऐवजी डाळ शिजवतांनाच टाकलेय ही वेगळीच पद्धत वाटतेय. मी हे दोन्हीही तडका देताना टाकते.
@ पियुशा: बहुदा डाळ भिजवून घेतलेली असल्याने एका शिटीवर शिजली असेल. पण २-३ तरी शिट्या लागतातच.
फोडणीत थोड्या डाळमेथ्या घातल्या तर स्वाद आणखीन छान येईल :)
ल्यप ल्यप....
खि..खि...खि...
पाक्रु खुपच छान दिसत आहे आणि सोपी आहे.
मस्तच रे..फक्त चव कशी आहे हे मात्र तुलाच माहीती ;-)
सही रे.... भेटू लवकरचं :) :)
आनंद आहे, धुक्यातली दाळ मेथी मस्त दिसत आहे एकदम.
अवांतर - काही बॅचलर आयडिंना तुर डाळ एका शिट्टित (कुकरच्या) शिजत नाही हे कळते हे पाहुन, ....असो.
@५० फक्त
अवांतर - काही बॅचलर आयडिंना तुर डाळ एका शिट्टित (कुकरच्या) शिजत नाही हे कळते हे पाहुन, ....असो
असो. का म्हणे? ..
ड्वाले पाणावले असतील नै ;)
घ्या रुमाल घ्या ;)
( सध्या रुमालाचा स्टॉ़कच करुन ठेवते ) ;)
आमची पियू कि नै स्वनापक खूप छान करते.म्हणूनच कळल तिला हे सगळ.
एकदम मस्त पाकृ...माझी ऑल टाइम फेवेरेट... :) संध्याकाळी उपास सोडायला हाच मेनु फिक्स.... फक्त इथे मेथी मिळत नाही त्यामुळे पालक वापरला जाणार आहे.. :)
फोटो छानच आहेत आणि भाजी/डाळ पण छान असणार हे रंगावरून कळतंय. मेथी जरा चिरून घेतली तर डाळीत चांगली मिक्स होईल आणि खाताना मोठी पानं खावी लागणार नाहीत. थोडा बदल म्हणून कधीतरी टोमॅटोऐवजी चिंच आणि गूळ घालून पण बघ.
डाळ एका शिट्टीत शिजण्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतायत हे बघून मला आश्चर्य वाटलं. कोणीही जर हॉकिन्स कूकरचं माहिती पुस्तक वाचलंत तर फक्त एक शिट्टी करा असंच लिहिलेलं आहे. शिट्टी झाल्यावर ५/६ मिनिटे गॅस बारीक करून ठेवायचा. मी रोज, भात+डाळ्+भाजी/बटाटे या ३ गोष्टी एकाच वेळेला या प्रकारानेच शिजवते. २० वर्षात एकदाही कच्च्या राहिलेल्या नाहीत.
अभिनंदन!
तुमच्या पत्नीचे.
नवर्याला बरे कामाला लावले आहे.;)
डाळ एका शिट्टीत कशी शिजली? घरचीच असल्याने प्रोसेसिंग नसेलच.
त्यामुळे असा फरक पडतो का? फोटो मस्त आलाय. अगदी घरगुती!
मेथीलाही हिरवे रंगवतात हे वाचून विचित्र वाटले. पुढच्यावेळी नीट बघूनच मेथी घेईन.
गाजरं, कलिंगड शिवाय धान्ये वगैरे विकताना फसवतात असे आपण ऐकतो. मेथीही त्यातून सुटली नाही.:(
चविष्ट दिसतेय. तुझ्या बायकोने अगदी सुगरण पोरगा पटवला म्हणायचा!! (म्हंजे तुच हो! गैरसमज नको.)
नविन धंदा सुरु केल्याबद्दल अभिनंदन..
- पिंगू
रेसिपी आवडली..
फोटो तर एकदम खासच...
मस्त आवडता पदार्थ...
पण काहि जण याला डाळ मेथी असेहि म्हणतात..
दिपालीदेवी म्हणजे मीच कां?? :D
बाकी पाकृ मस्त दिसतेय, असलं आयतं जेवण मिळालं तर काय !!!
पुलावपण भारी दिसतोय.
दिपाली :)
मूर्ख आहेस लेका. उगा कष्टलास की.
अरे तुझ्याकडं 'ते रेडिमेड' मिळालं नाही का 'आमच्याकडं मिळतं' तसं? जरा बघायचं ना देसी सुपरमार्केटात ;)
हात मेल्या!! इथं पण मीठ घातलं नाहीचेस ना भाजीत!! :)
मस्त पाकृ...
वरील प्रतिसादात बर्याच जणांनी 'एका शिट्टीत डाळ कशी शिजली?' असा प्रश्न केला आहे..
तर मंडळी,
तो सुहास.. आहे.. मुरलेल्या धोरणी लोकांसारखा.. त्याची डाळ लगेच शिजते (शायद उसके दाल मे कुछ काला नही है ;) )
बाकी कुणाची डाळ कधी व कशी शिजते हा स्थळ काळ, स्टोरी/पाकृ मधील पात्रे, आणि 'दाल मे कितना काला है' त्यावरुन तरत असेल. :)
प्राजुतै,
भाजीत मीठ नसले म्हणून काय झाले, संसार तर अळणी नाही ना हे महत्वाचे.. ;)
तू धंदा बदललास काय मराठमोळ्या?? नाही म्हणजे आयटी सोडून वकिल-बिकिल झालास का काय?
तेलवाली तुरडाळ धुवून भिजत ठेवली की एक शीट्टी आणि काही काळ मंद आंचेवर ठेवल्यास छान शिजते.
तुरडाळीच्या प्रतीवरही शिजण्याचा कालावधी ठरत असतो असा अनुभव आहे.
डाळ मेथीची पाककृती झकास आहे. मेथीची भाजी चिरून घेतली की जास्त कडवट लागते. (कोणाला तशी आवडते.) पण पाने हाताने खुडून शिजवल्यास तेवढी कडू लागत नाही. तसेच, मेथीत दोन प्रकार येतात. एक सर्वत्र मिळणारी, मोठी पाने असलेली मेथी जी कमी कडू असते तर दुसरी वाळूतली किंवा समुद्राकाठची लहान पाने आणि लहान जुड्यांमध्ये मिळणारी, चवीस उजवी पण जास्त कडू, अशी मेथी.
मेथी दाणे भिजवून, मोड आणून केलेली डाळमेथी तर भन्नाटच लागते.
मेथी उष्ण आणि रक्तशुद्ध करणारी असते.
मस्तच!
करून बघितली.लई भारी झाली.अफलातून.मी थोडासा सांबर मसाला पण टाकला त्यात.
खूपच छान रेसिपी.