कलादालन

प्राणी, पक्षी आणि निसर्ग..

Primary tabs

राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..) सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल.. Image removed. त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अ‍ॅटीट्युड कळून येईल.. ती मारे लाडात त्याला खेटतेय, आणि गेंडूसाहेब आपले "स्वांतसुखाय वायुगमन" करताहेत.. ;-) इथे काझिरंगातले दुसरे मुख्य रहिवासी आहेत.. Image removed. अ‍ॅलेप्पीला एका होम-स्टे मध्ये त्यांच्याकडील पिंजर्‍यात हा "चायनीज कोंबडा" होता. लैच रंगीबेरंगी.. Image removed. कोचीच्या जेट्टीवर एका होडीवर हे साहेब होते. नाव माहीत नाही ब्वॉ.. जाणकारांनी सांगावे. Image removed. हे दोन डोक्यांचं बदक.. Image removed. आता जरा चिमणरावांची ऐट बघा.. Image removed. हा माझ्या गावी घराच्या गच्चीवरुन पाहीलेला सूर्यास्ताच्या वेळीचा प्रकाश-सोहळा... Image removed. आणि अ‍ॅलेप्पीजवळच्या मरारी बीचवर सूर्याची आणि ढगांची प्रकाश-लीला Image removed. पुन्हा भेटूयात...
पियुशा

क्लास फोटुज :)
चिमणरावांनी दीलेली पोज विषेश आवड्ली गेली आहे ;)

सर्व छाचि फार छान.
चिमणरावांचा क्लोजअप मस्त.
छाचि ३ : हा गोल्डन फीजंट आहे. मुंबईच्या राणीबागेत पूर्वी होता.
छाचि ४ : भुरा बगळा, वंचक, pond heron. कोणत्याही पाणाथळीजवळ हमखास दिसणारा.

यशोधरा

मस्त फोटो. चिमण्याचा फोटोचा अ‍ॅंगल झक्कास!

मेघवेडा

असेच म्हणतो.

सगळेच फोटो मस्त आहेत. चिमण्याचा लै आवडला!

सुहास..

महाप्रंचड आवडेश रे !!

ते दोन डोक्या च बदक खरे आहे का बे ????????????????

चिगो

>>ते दोन डोक्या च बदक खरे आहे का बे ????????????????

नाही रे भौ.. मला काय "इंडीया टिव्ही" वाला समजला का काय तू यार ? ;-)

आचारी

सगळेच फोटो एकदम मस्त आलेत...........सूर्यास्ताच्या वेळीचा फोटो तर भन्नाट

सौरव जोशी

चिमणराव फार आवडले, अगदी दिमाखदार

सुचना: फ्रेमच्या मध्ये असायला हवे होते.... असो पण तरीही क्लास...!

चिगो

सुचना आवडली.. फार जवळ न जाता आल्याने, झूम करतांना हात थोडा हलला व चिमणरावांची शेपटी उडाली.. :-(

Maharani

आज काल चिमण्या दुर्मिळच झाल्या आहेत पुण्यात....त्यामुळे आता फोटोच काढुन ठेवावे लागतील त्यान्चे पुढ्च्या पिढ्याना दाखवायला................बाकी फोटो मस्त आले आहेत....

५० फक्त

चिमणा आवडला, अतिपरिचयात अवज्ञा झालेल्यांपैकी एक. इतर फोटो जबराच आहेत.

प्यारे१

क्लास्स्स्स!

गणेशा

सर्व फोटो अप्रतिम .. एकदम झक्कास

धागा कसा वाचायचा राहिला कळालेच नव्हते

प्रचेतस

पेढे आणा रे, हत्तीवरून साखर वाटा, गुढ्या तोरणे उभारा.

गणेशाला चक्क आज फोटो दिसले आहेत.

अन्या दातार

आज सूर्य पूर्वेला डुबला तर नाही ना? ओकांनी नाड्या/भानामतीचे धागे काढणे बंद तर केले नाही ना? मुंग्यांनी मनोगताचा सर्व्हर तर खाल्ला नाही ना? घासूगुर्जी जपमाळ तर घेऊन बसले नाहीत ना?? सोकाजीने दारु तर सोडली नाही ना?? प्रासने संशोधन तर सोडले नाही ना?? दाभोळकर, लागूंनी देव मानायला तर सुरुवात केली नाही ना? शंकराचार्य नास्तिक तर झाले नाहित ना?

तरीसुद्धा गण्याला फोटो दिसले कसे?