जे न देखे रवी...
तुला माहित आहे ?
Primary tabs
तुला माहित आहे
तु कधी गोड दिसायचीस
मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु हळुच लाजायचीस
आणि लाजुन हसल्यावर
गोडच गोड दिसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी रूसायचीस
तुला मी नकटे म्ह॑टल्यावर
तु गाल फुगवुन रूसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी हसायचीस
तुला टपोर्या मोगर्याचा गजरा दिला की
तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी जळायचीस
तुझ्या मैत्रिणीला मी
गाडीवरून घरी सोडायचो
तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी भाव खायचीस
तुला कोणी प्रपोज केले की
तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे
असे सा॑गुन जायचीस
आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
मस्त आहे.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
तुला टपोर्या मोगर्याचा गजरा दिला की
तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !!
हे छान
(मोगर्याच्या गजर्याची फॅन)
तुला टपोर्या मोगर्याचा गजरा दिला की
तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !!
मलाही ह्याच ओळी जास्त आवडल्या! :)
तात्या.
तुला टपोर्या मोगर्याचा गजरा दिला की
तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !!
पुढील कविता लेखनाला शुभेच्छा !!!
आहे कविता...!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
तुला मी नकटे म्ह॑टल्यावर
तु गाल फुगवुन रूसायचीस !!
हे मस्तच !! और भी आन दो :)
ताई खुपच सुंदर कविता आहे.....
मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु हळुच लाजायचीस
आणि लाजुन हसल्यावर
गोडच गोड दिसायचीस !!
(गोड मुलगा)
मदनबाण.....
मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु हळुच लाजायचीस
आणि लाजुन हसल्यावर
गोडच गोड दिसायचीस !!
खुप आवडलि...............
आपला मयुर
गेल्यासारखं वाटलं शीतल :)
तुला माहित आहे
तु कधी भाव खायचीस
तुला कोणी प्रपोज केले की
तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे
असे सा॑गुन जायचीस
आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
हे मस्त एकदम ढग ढग वाटले
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत