जे न देखे रवी...

शिवस्तुती

Primary tabs

अति शितल मृदू शांत
चंद्र्मा तो ललाटी
जटी जया उगम पावे
जन्हवी पुण्यदाती
लेपुन तनू भस्मा
स्वात्मनंदा विराजी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी

अणू रणू व्यापणारी
लोचने तीन दिव्य
करी धरी ड्मरू
आणि त्रिशुळ भव्य
अति धवल दिव्य कांति
तेजसी ती प्रकाशी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी

अर्धांगी आदी शक्ती
वाम अंगास ज्याच्या
जगत वंद्य पुत्र
गणपती स्कंदराजा
देखणा करी प्रपंचा
शिव विरक्त योगी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी

अविरत जपी रामा
भक्त श्रेष्ठा दयाळा
शरण तव येता
उद्ध्ररसी कृपाळा
सहज तरूनी जाइ
प्राथ्रितो जो शिवाला
नमन तव करीतो
शंकरा विश्वनाथा

नृत्यनिपुण नटराजा
मोहसी तू जगाला
तांडव परि करीता
विश्व जाते लयाला
करून हरण प्राणा
निजधामासी नेसी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी