पाककृती

कोळंबी भात (प्राँस राईस)

Primary tabs

नमस्कार मंडळी. समुद्री जेवण मनापासून आवडते, त्यात कोळंबी भात म्हणजे...... तोंडाला पाणीच सुटते. :) असो, ही घ्या पाकृ. साहित्य १०० ग्रॅ कोळंबी (सोलून आणि शिजवून) Image removed. २ लोकांना पुरेल इतका भात थोडं तूप घालून लावून घ्या (कुणाला बासमती आवडतो तर कुणाला ईतर जातीचा) तूप हे मसालेदार पदार्थांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी. १ ईंच आले ४ पाकळ्या लसूण कोथिंबीर आमचूर पावडर १ टेस्पून २ चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १ चमचा घरचा मसाला/गरम मसाला ४ लवंगा ३ वेलची १ छोटा तुकडा दालचिनी १ छोटा चमचा शहाजिरे १ छोटा चमचा मोहोरी १ दगडफूल ४ काळे मिरे २ तेजपत्ता १/४ छोटा चमचा हिंग १ मोठा कांदा १ मध्यम टमाटा चवीपुरते मीठ कृती १. कांदा उभा चिरून घ्या आणि टमाटा बारीक. २. आले किसून घ्या, लसूण बारीक चिरून घ्या. ३. वेलची, काळे मिरे, लवंग, दालचिनी, दगडफूल मसाला थोडासा भरडून घ्या. Image removed. ४. कढईत तेल तापवा. ५. तेल तापले की हिंग घालून मोहोरी आणि शहाजिरे घाला. ६. लसूण टाकून थोडा तळला गेला की मग भरडलेला गरम मसाला घाला. ५. उभा चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत परता. Image removed. ६. कांदा परतला की त्यात टमाटा, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, मसाला, आमचूर पावडर हे सर्व एकत्र करून मग आणखी मंद आचेवर ५-१० मिनिटे परता. आता यात कोळंबी टाकून पुन्हा एकदा थोडा वेळ परता. ७. आता कढईत भात टाका, मीठ घाला आणि चांगलं एकत्र करून ५ मिनिटे वाफवा. ८. कोथिंबीर पेरा आणि हाणा. ;) Image removed. Image removed. आपला, मराठमोळा
स्पा

फोटू पाहून खपल्या गेलो आहे

पियुशा

काय कातील फटु आहे ! जबर्या एकदम :)
पण शाकाहरी असल्याने आम्ही यात पनिरचे फ्राइड तुकडे घालु ;)

मी-सौरभ

आता कोकण ट्रिप करावी लागणार पोटभर कोळंबी खायला :)

मोदक

कधी जाणार आहेस..?

एकटा गेल्यास तिथे मासेमारीच्या गलबतांचा संप होवो, वाटेत ट्रॅफीक जॅम होवो अशा (धमकीयुक्त) सदिच्छा.

:-)

मोदक

खादाड

शेवटच्या फोटोत चमचा घालुन खावासा वाटला :)

Mrunalini

आई ग... मेले.... कोळंबी म्हणजे एकदम वीक पॉईंट..... मस्तच...

jaypal

फोटो + जबराट पा.क्रु.+ सुट्सुटीत सादरीकरण = आय$$$$टी वाल्याचा ऐट्दार धागा. लगे रहो...ममो भाय

vry good

स्वाती२

व्वा! सोप्पी पा. कृ. आणि जीभ चाळवणारा फोटो!

कपिलमुनी

येती सुट्टी सार्थकी लावण्याचे काम झाले ..

एक नंबर पाकृ ..

अवांतर : अलिबाग मध्ये एस टी स्टँड्च्या बाजुला 'फुलोरा' हॉटेल आहे ..तिथल्या कोळंबी भाताला तोड नाही ..

पुन्हा मांसाहारी ?

असो...

बाटली आणण्याचे कबूल केल्याने स्वतःवरती कंट्रोल ठेवल्या गेल्या आहे.

रेवती

बाटलीवाले वाक्य सोडून बाकी प्रतिसादाशी कधी नव्हे ते सहमत.

सुहास..

भेंडी !!

आयटी नवरा कुणीकडचा ;)

राक्या , आता तु आल्यावर कोण कोणासाठी पाकृ आणायची रे , लावतो का बेट ;)

(बाकी कोळंबीप्रेमी कोण ते समजल्या गेले आहे ;) )

कौशी

एक अतिशय आवडती रेसिपी.
आवडली.

टुकुल

शेवटच्या फोटुला बादलीभर लाळ गळाली

--टुकुल

रमताराम

ममो बायकू आयटीवाली हाय काय रे? नाय म्हजी आपलं सजंच इचारलं बर्का.

(खरं सांग, कांदा बायकूने चिरून दिला की नाही?)

मराठमोळा

नाय ब्वॉ ररा,

बायको आयटीवालीबी नाय आन कांदा बी म्याच चिरलाय. बायको कट्टर शाकाहारी हाय त्यामुळं असलं कायबी वशाट खायचं असलं की सम्दं मलाच करायला लागतया. ;)

गणपा

मकीचा एक तीर इथे बसला वाटतं. ;)

पण तु लक्ष नको देउस रे.. और भी आंदो.

मराठमोळा

नाय बा गणा,
तीर बसायला आपण टारगेट असायला हवं ना.. ;)
बाकी मिस मकींच्या तीरांबद्द्ल आमचे परममित्र निदे यांना संपर्क साधायला हवा. :)