फुलगोबीची सुकी भाजी
Primary tabs
या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...
================================================================
तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची?
सामग्री :: (२ जणांसाठी)
मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल.
कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या. धुतलेल्या फ्लॉवरवर अर्धा चमचा हळद घाला.

गाजर धुवुन, बारीक चिरुन घ्या. मग कढइ शेगडीवर मंद आचेवर ठेवा. कढइ गरम झाल्यावर त्यात अंदाजे २ चमचे तेल घाला. तेलात थोडीशी मोहरी अन जिरे घाला.

फोडणी बसेपर्यंत एका थाळीत चिरलेला गाजर, १/२ चमचा काळा मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा लसुन-आलं पेस्ट मिसळुन घ्या.

नंतर हे सर्व त्या कढइत परतुन घ्या.

आता त्यात हळदयुक्त फ्लॉवर घालुन चमचाने हलवा. त्यात चवीनुसार थोडेसे मीठ घाला.

हे सर्व मिश्रण १० मिनिटे शेगडीवर (मंद आचेवर) ठेवा. फ्लॉवर ओली असल्याने लवकर शिजते. हे मिश्रण जास्त वेळ शेगडीवर ठेउ नये, त्याने फ्लॉवरचा "शिरा" होउ शकतो. (जसा पोहे जास्त भिजवल्याने होतो तसा).
ही झाली फुलगोबीची सुकी भाजी तयार. कोथिंबीर असल्यास वरुन घालता येते.

मित्रांनो, फ्लॉवर ही सगळीकडे सहज उपलब्ध होत असल्याने एकदा ही भाजी करुन बघायला काहीच हरकत नाही. करा, चाखुन पहा अन मला सांगा.
(कुणीतरी सांगितलेच आहे पाण्यात उडी मारली की पोहता येतेच, हेही तसेच आहे)
जाणकार/सुगरण मिपाकर गृहिणींच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत/प्रतिक्षेत.
- आपला वपाडाव
सही.. एकदम सोप्पी आणि लगेच होणारी पाककृती.... टिपिकल आयटी पाककृती :) ;)
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने भाजी छानच दिसतेय. रेवतीआज्जे नोंद घेतली ना? ;)
बाय द वे, लसूण न घालता कोबीची सुकी भाजी??
लसुण असुनही तो वेळीच (फोडणी बसेपर्यंत) लक्षात न आल्याने त्याला बगल दिल्या गेली आहे. अन तसेच भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाबाबतही झाले. पण लसणाची कमतरता आलं-लसुण पेस्ट वापरल्यामुळे भासली नाही.
अग्गोबाईऽऽ!
समजलं हो बाळ वपा. आता तुझाच नंबर.
भाजी चांगली झाल्याने तुझी नावनोंदणी करून घेतली आहे.
पदार्थ जास्तवेळ शिजवल्यास त्याचा लगदा होवू शकतो हे तू फोडणीच्या पोह्यांचे उदाहरण देवून स्पष्ट केल्याने आपणास पोहेही करता /बिघडवता येतात हे चाणाक्ष उपवर आयटीवाल्या मुली ओळखल्याशिवाय रहायच्या नाहीत.;)
तरी सल्ला देणे हे माझे कामच आहे म्हणून एक सांगू इच्छिते. सर्व्हिंग प्लेट ही शेवटच्या सादरीकरणासाठीच ठेवावी;)
जसे, आपण लग्नाचा शालू (अथवा सूट) विकत घेतला तरी लग्नाच्या दिवशीच नेसतो, तसे काहीसे.
अवांतर: पराने बोध घेण्याची आवश्यकता.
चाणाक्ष नजरेत पकडल्या गेलंय... असो.
रुमवर असलेल्या ग्रॉसरीचाच (लिमिटेड आहे) वापर केला असल्याने ते झाले आहे. पुढील वेळी ही गोष्ट ध्यानात ठेवुन फटु काढले/डकवले जातील.
असो, सुरुवात उत्तम आहे, फोटो खास मिपावर टाकण्यासाठीच काढलेले आहेत हे स्पष्ट दिसतंय. बरे आलेत, पुढच्या वेळी सुधारतील अशी अपेक्षा आहे.
आणि बाळ वप्या, अरे 'रुमवर असलेल्या ग्रॉसरीचाच (लिमिटेड आहे) वापर केला असल्याने ते झाले आहे.' - अरे त्याला कटलरी म्हणतात रे, ग्रोसरी नाही..
आणि पुणे-नांदेड पट्ट्यात ही अशी भाजी करत नाहीत, लाल तिखट घालुन, ती पेशलिटि विदर्भाची, तरी देखील तु ट्राय केलास आनंद वाटला. हे प्रयोग इथं परत आल्यावर पण सुरु ठेवणार आहेस का कसे ते कळवावे.
५० रावांचे अणुभवाचे बोल लगेच आले. वपा अजून स्वैपाकघरात पुरेसा रुळलेला नसल्याने कटलरी, ग्रॉसरीमध्ये गोंधळ होत असावेत. तरी आता मंडळात नाव नोंदणी झाल्याच्या आनंदाने लवकरच सराईत होवून जाईलच.
मालक, अहो तेच ते मला क्रॉकरी/कटलरी असंच म्हणायचं होतं.... असो, चुक सुधारल्याबद्दल धन्स....
पुढील वेळी अजुन चांगले फटु काढण्याचा प्रयत्न केला जैल...
आई शॉट्ट !
काय ती रेसेपी अन काय ते फटु !
" रेवती आज्जीच्या विवाह मन्डळात तुझे स्वागत आहे " ;) लगे रहो ;)
" रेवती आज्जीच्या विवाह मन्डळात तुझे स्वागत आहे " लगे रहो
स्वागत नेहमी आतली मंड्ळी करतात, म्हणजे पियुषातै आधीपासुनच नाव नोंदवुन आहेत तर...
अवांतर - रेवती आजै फक्त मुलांनाच मदत करतात असं ऐकलं होतं, हो ना ओ प्यारे ?
येकदम सोपी ब्याचलर पाककृती.
आता यापासून स्फूर्ती घेऊन येणार्या स्पा आणि सूड यांच्या नव्या पाकृंच्या प्रतिक्षेत. :)
भारीच आहे.
आधी मला वाटले फ्लॉवर च्या भाजीच्या बाजूला सजावटी साठी गुलाबाची फुले का ठेवली आहेत? नन्तर पहिले अरे ती तर डिश वरची डिझाईन आहे ! :-)
सर्व्हिंग प्लेट ही शेवटच्या सादरीकरणासाठीच ठेवावी;) >> सहमत आहे.
@पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... >>>


@मग ती फ्लॉवर धुवुन घ्या. >>>
@फ्लॉवर ओली असल्याने लवकर शिजते>>>
ब्याचलर पाककृतीचे स्वागत.... :-)
अवांतर- काही खास प्रतिक्रीयांच्या शोधात...
मालक, आपल्या दुकानातील स्मायल्या (जमल्यास) किरकोळ भावाने आम्हाला वापरण्यास द्याव्यात असे सुचवतो....
थोडीफार बार्गेनिंगही करेन म्हणतो....
रास्त भावात दिल्यास जादा माल इकडेसुद्धा घेतला जाईल!
@किरकोळ भावाने आम्हाला वापरण्यास द्याव्यात असे सुचवतो....
थोडीफार बार्गेनिंगही करेन म्हणतो.... >>>
कशाला..? कशाला..?... घ्या तश्याच... फ्री मंदी
http://www.easyfreesmileys.com/facebook-smileys.html
भले शाब्बास !!
निदान आता तरी ब्याचलर रेशिपीच्या धाग्यांची झैरातींचे धागे अशी संभावना होणार नाही. ;)
छान ,
सजावट आवडली, एक दम व्हॅलेन्टाईन डे ला बनवावी शी वाटली ;)
>>>>... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"...>>>
हे..." तेल गरम है लगादो तडका"... अस हव होत का?
बाकी वपा सेटल होने के तैय्यारी मे....चलने दो चलने दो ।
लगेच तुमच्या मागचं काम कमी झालं म्हणुन आनंदी नका होउ, लगेच चलने दो चलने दो,
उलट हा असा स्वयंपाक करावा लागणं,
१. एकाच प्लेट मध्ये सगळा स्वयंपाक करावा लागणं (नशीब तीच प्लेट नाही ठेवली फोडणी करायला ),
२. भाजीत लसुण घालायला विसरणं,
३. चिरलेल्या कांद्याचा फोटो न काढायला वेळ न मिळणं,
४. चखण्याची सोय आणि भाजी एकत्र करुन घरकाम करणा-या सासुला अन नोकरी करणा-या बायकोला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेणं (पिशवी भरुन प्लॉवरची भाजी केली बास )
हे सगळं पाहुन जरा दया यायला हवी तुम्हाला किंवा इतर कुणाला तरी, त्या बिचा-याची.(धागा असा, मुद्दामच टाकला आहे त्यानं, बाकी इतर स्वयंपाकाचे फोटो खुप चांगले आहेत, पण ते पब्लिक शेअर केले नाहीयेत, पायनापल पुलाव थोडा करपला आणि पायनापल शि-यासारखा दिसतो आहे , इव्हन घडीच्या पोळ्या करताना व्हिडो पण आहे, वल्ली, प्यारे, सौरभ, स्पा, सुड यांना विचारा हवं तर.)
अंअंअंअं ... हो... हो हो.. हो!
५० फक्त म्हणताहेत ते अं अं अं बअर.. बरो.. अं बरोबर आआआआहे...! हो ना रेएएएए सूड?
;)
प्रतिक्रिया वाचून कोणा पुणेकर स्त्री सदस्याने दिलीये अस वाटल. ;)
परभणीला जाऊन वप्या 'फुलवर'ची भाजी शिकला... असो. ;)
एका भाजीच्या प्रयोगात फार मोठ्या अपेक्षा ठेवल्यात रे बाबा.
नुसताच चकणा ?
ह्याच्याबरोबर बॅचलर पेशल्ल खेक्डा भजी हवी होती ना ?
नुसताच चकणा ? >>> हे घ्या खायला
हेच म्हणतोय. नुसताच चाकणा? सोबत काय घेतलं होतं, त्यासमवेत चव कशी होती यावरही प्रकाश पडला पाहिजे. इथं रेवतीच्या मंडळात नावनोंदणी असल्यानं ही माहिती व्यनितून दिली तरी चालेल. ;)
आमच्या संस्थेत दारुड्यांची नावनोंदणी केली जात नाही. तो जरी वाईन उत्सवाला गेल्याचे फोटू असले तरी फक्त द्राक्षं चिरडायलाच गेला होता हे सांगून वेळ मारू नेऊ झालं.
ते माहिती आहेच. नव्हे, खात्री आहेच. पोरं खपवायची आहेत शेवटी तुमच्या मंडळाला. पण काये ना... की पोरीही आजकाल सावध असतात. या बिचाऱ्यानं इथं काही लिहावं आणि मग पंचाईत व्हावी असं नको व्हायला. :)
आजकाल बरेच हसवताय आम्हाला. काय विशेष?
अहो काका, वाईन महोत्सवाला जाऊन येतो वैगरे म्हणून उलट मुलींच्या उड्या पडतील. सुका कट्टा होता म्हणून महिला उपस्थिती नव्हती असे दिवस आलेत हल्ली. पूर्वी मुलाला काही व्यसन वैगरे ... ?? असा प्रश्न यायचा. आता तर मुली म्हणजे व्यसने किं दरिद्रता असा प्रकार असतो. ;)
या सर्वावरुन एक्सेल फाइलमध्ये भरमसाट नोंदी असाव्यात असं न्रिक्षण नोंदवतो...
हा नियम फक्त मुलांना की मुलींना पण? तिथले माहित नाही, पण इथे पाशवी शक्ती मुलांच्या खांद्याला खांदा लावून अपेयपान करतात. तसे केल्याने त्या फॉरवर्ड (ड पूर्ण) होतात म्हणे. त्यामुळे विवाहमंडळाच्या विदागारात नक्की कुणी मुली आहेत की तसे व्हायच्या आधीच मार्केटिंग चालू आहे अशी शंका मनात डोकावून गेली.
>>सामग्री :: (२ जणांसाठी)
ब्वॉर्र्र! ही दुसरी व्यक्ति कोण हे जाणून घेण्यास आवडेल ;) त्यावरुनच रामदास काकांच्या "एका भाजीच्या प्रयोगात फार मोठ्या अपेक्षा ठेवल्यात रे बाबा." या वाक्याचा अर्थ लावता येईल. कसे??
बाकी वप्या मार्गाला लागला ब्वा. :)
पर्भणीत नवीन मेस वगैरे चालु करणार असशील तर लवकर पत्ता कळवणे!! ;)
बाकी सादरीकरण छान! या भागात तुझा हा धागा पाहुन ताड्कन उडलो आहे जागेवरुन.
मान्यवर लोक्स कुठे गायब झालेत?
र वप्या
बाला डोले पानावले र
'फुल'गोभीवा ना मारो.. ना मारो वपाडवा. ;)
@'फुल'गोभीवा ना मारो.. ना मारो वपाडवा.

अपेक्षित प्रतिक्रीया.. ;-)
मस्त रे वपाडावा! ही झॆरात आहे का? की रेवतीच्या मंडळाचा प्रवेश अर्ज? आणि साहित्य २ माणसांसाठी कशाला आहे ते?
भाजी झकासच !! ब्याचलर रेशिपी असल्याने एक टीपः फ्लॉवर निवडताना जरा चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात घालत चल. म्हणजे एखादी अळी असेल तर दिसून यील. आता हिरव्या देशातल्या भाज्यांवर अळ्या असतात की माहित नाही, इथे असतात म्हणून ही टीप. ;) आता मीही एखादी रेशिपी टाकावी म्हणतो.
अरे, हे आधी सांगायचं नाही का, आता
असतील हिरव्या देशात अळ्या अन
असतील गेल्या भाजीत अन
असतील खाल्या त्या वपाडावनं,
(कसं कवितेसारखं वाटतंय ना )
जगबुडी नाय का यायची मग, कसले मित्र तुम्ही, धरुन ठोकला पायजे एकेकाला,
हेच सांगणार होते.उकळलेल्या पाण्यात मीठ टाकून फ्लोवेर २ मिंट ठेवायचा. अळ्या बाहेर येतात. जर हे वाचूनच कसंतरी होत असेल (म्हणजे उलटी आल्यासारखं वै) तर तसं करू नये नाहीतर संपूर्ण आयुष्य फ्लोवेर खाणार नाही. जाऊ देत एवढ मटन मासे आवडीने खातो, गेल्या ४-५ अळ्या पोटात तर काय बिघडत? नै का? ;)
साध्यापाण्यात थोडी ह्ळद घालुन त्यात फ्लॉवर बुडवुन ठेवावा.
असो.
वपाडाव- भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
पहिला प्रयत्न अगदी छानचं जमला आहे :)
अशाच पाकृ येऊ द्या :)
पहिला प्रयत्न आहे पण जमलीये की चांगली!
पहिला प्रयत्नात छान जमली भाजी..
फोटो पण मस्त...
चला फोडणीत फ्लॉवर न्हालं!! (न्हाली/न्हाला)
.
फोटो सुंदरच आलेत.पहिला हळद टाकलेला फोटो पाहून वाटल कि हीच भाजी , मी आपली त्यात गाजर शोधत होते किती वेळ.
माझ्या हातून फ्लोवर नेहमी बिघडतो. आता ह्या पद्धतीने एकदा करून बघायला पाहिजे.
ब्याचलर पाकृ.. :)
बाकी सूड, वपा, स्पा यांनी मिळून एखादं हाटेल काढायला वाव आहे ब्वॉ..
म्हंजे फ्लॉवर भाजी चपाती, भेळ नाष्टा, आणि गोडधोड सगळंच एकाच ठिकाणी मिळेल. ;)
कुणीतरी मिसळीची सोय करा रे..
तुम्ही त्यांना जॉईन झालात की सी-फूडची पण सोय होईल. ;) बघा ब्वा. सध्या हॉटेलिंगला लई डिमांड आहे
>>बाकी सूड, वपा, स्पा यांनी मिळून एखादं हाटेल काढायला वाव आहे ब्वॉ..
माझी काहीच हरकत नाही. पण वपा पर्भणीत, स्पा डंबोलीत आणि मी इकडे त्यामुळे कसं जमतंय बघायला हवं. ;)
अन्या म्हणतोय तसं तुम्ही पण आलात तर मासेखाऊ मंडळींची पण सोय होईल.
गण्प्याच नाव राहिल कि.
तुम्ही त्यांना जॉईन झालात की सी-फूडची पण सोय होईल. Wink बघा ब्वा. सध्या हॉटेलिंगला लई डिमांड आहे
असेच म्हणतो ...
ममो प्लीज जॉईन द क्लब :)
मी कॅश काउंटर सांभाळीन म्हणतो ;)
आणि मी चवप्रमुख.
ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या, प्रत्येक महिन्याला माझी रॉयल्टी तेवढी द्या. ;)
(कन्सल्टंट) अन्या
काय हे...
मी पैशे गोळा करणार ते काय तुमाला द्यायला व्हय???
मेनु मि ठरवणार.
ठरवा तुम्हीच पण फक्त लिहायला टंकनिक बोलवा....
नाहीतर गोची व्हायची....
मेन्यु कार्डात भाज्यांच्या ऐवजी भजी यायची...
उदा :: कर्ल्याची भजि, वंग्यचि भजि, अलु मतर, गोबि मसला, वेग्रे वेग्रे....
फु ट लो...
अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, रसगुल्ल, पुर्नपोलि इ.इ.
गजर हल्वा वाचुन मेल्या गेले आहे....
अलुवदि, गजर हलवा, गुलाब जमुन, रसगुल्ल, पुर्नपोलि इ.इ.
बसुंदी,रसमलै,
मसल डसा,इड्ली संभार,मदूवडा,धोक्ला,कन्द उतत्पा
'गजर हलवा' वाचुन ठार मेलिये. :-D
मी जपानी,थाइ,चायनिझ्,इटालियन पदर्थहि ठेवणार आहे.
म्रुणालिनिने पास्ता छान केलाय म्हनुन ति पण लिस्ट्मध्ये आहे.सोत्रि यांनि जपानी फूड खाल्ल आहे आणि अपेयपानावरचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे म्हणुन तेहि.गणपाला बरच काहि येत.म्हणुन तोहि टिममध्ये आहे.हि झालि किचेनची (स्वंपाकघराची) टिम.शेफ चेतन त्यांना मार्गदर्शन करतिल.अजुन कोणाकोणाला यायचय टिममध्ये?
मी मात्र मिपाकरांनी काढलेल्या हाटेलात एक मिपाकर म्हणून आजन्म फुकट गिळायला येणार हे नक्की. ;)
असेच म्हणतो
@ वपाडावः या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येतो तुझ्याकडे सुकी भाजी खायला.
मंजे आता पब्लिक मेनु वाचून गोंधळुन जाणार.
मेनुतलं नाव चुकलयं की आपण चुकीचं बोलतोय हाच प्रश्न पडेल बर्याच जणांना ;)
यातून एखाद्या डिशचा 'तैलबैला' होणार हे नक्कि :)
हे शेफ चेतन कोण आता ?
अय्य... तुल शेफ्चेतन कोन्ते महित नै क?
अरे ये पिस्पिओ नै जन्ता...
अरे बापरे!
ये शेफ चेतन को नही जानता!! कमाल झाली!
अवांतरः वप्या, धाग्याची शंभरी लवकर गाठु आपण, काळजी करु नकोस!
ते शेफ असावेत, पण मध्येच कसे उगवले ? रेफरन्स द्यअ अभ्यासस कमी पडतोय.
@ मोहन राव
हम्म ..........अच्छा म्हण्जे तुम्ही पण " सूपार्या " घेता तर ?
धाग्याची १०० गाठून देन्याची (ह्.घ्या.) ;)
काही जणांना की नै कुणाचं चांगलं होत असेल तर लगेच पोटात दुखायला होतं बघ.... ;)
बादवे, तो सुपार्या घेवो नै तर बत्तासे नै तर नारळं त्याचं तुला काय.... :p
तुला सौर्यानं हाक दिलिये ना, मग पसर की पदर त्याच्याम्होरं... :p
तुम्ही हलक्यातच घेणार ते माहिती अस्ल्याने तळटिप द्यायची वाचते....
तुला सौर्यानं हाक दिलिये ना, मग पसर की पदर त्याच्याम्होरं...
हॉ ;)
बादवे मी पदर पसरेन नै तर ओढनी ;)
तुम्ही काय पसरल होत शर्ट कि बनियान ;)
त्याने लुंगी पसरली! ;)
वप्या,
लेका; पर्भणित जाऊन असले धंदे करतोस काय रं मर्दा???
काय डॉयळॉक हे....
एका फटक्यात मला व्हिलन अन स्वतःला हीरो करुन टाकलसं ;)
तू बी सुपारी घ्यायला लागलास व्हयं???
लोक म्हंतात तेच खरं
"दोस्त दोस्त ना रहा......"
नविन आलेत इथे.
नविन आलेत इथे.
भटजी, अहो जीव घेणार का बाळाचा... (क्या बच्चे की जान लेगा ? या धर्तीवर वाचावे)
बादवे, कन्द उतत्पा म्हंजे कांदा का कंदमुळे वाले कंद...
>>कन्द उतत्पा म्हंजे कांदा का कंदमुळे वाले कंद...<<
तुला जे हवे ते समज........ कंदा पासुन केलेला उत्तापा पण असेल.....
@भटजी, अहो जीव घेणार का बाळाचा... (क्या बच्चे की जान लेगा ? या धर्तीवर वाचावे)
राम..राम..राम...अहो व-पाडाव ते कळफलक नवं प्रशिक्षणार्थीं अ-शुद्ध शब्द लेखनाचे इडंबन हाय हो...
बादवे, कन्द उतत्पा म्हंजे कांदा का कंदमुळे वाले कंद...>>>
नानवेज काही नाही कारे मेन्युत?
गरिबांनी गरिबांसाठी चालविलेले गरिब हॉटेल आहे ते... नावही ठरलंय...
गरिब महल (रथ)
हसल्या गेले आहे.
सगळ्यांच्या टारगटपणाला ऊत आलाय नुसता!
पर्भणीतले गरिब का?
मंजे तू असं म्हणतोयस का की शाकाहार करणारे सर्व गरीब असतात???