कलादालन

निसर्गाच्या कुंचल्यातून...

Primary tabs

की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी... सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्‍यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव... गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली.. अशा ठिकाणी असलेले फुलपाखरांचे संग्रहालय आणि तेही तिथे आधी गेलेल्या पर्यटकांच्या आवडीनुसार प्रथम मानांकीत केलेले पाहून जरा आश्चर्य वाटले, आणि मनोमनी तिथे जायचे ठरवले. खालील सर्व छायाचित्रे इथे काढलेली... १. Image removed. २. Image removed. ३. Image removed. ४. Image removed. ५. Image removed. ६. Image removed. ७. Image removed. ८. Image removed. ९. Image removed. १०. Image removed. ११. Image removed. १२. Image removed. १३. Image removed. १४. Image removed. १५. Image removed. १६. Image removed. १७. Image removed. १८. Image removed. १९. Image removed. २०. Image removed. हे साहेब ही मधून मधून चिवचिवाट करून लक्ष वेधून घेत होते... २१. Image removed. ह्यांनी आमच्या सौ. च्या हातावर ठाण मांडले.. २२. Image removed. २३. Image removed. हे महाशय आंब्यांच्या फोडींवर ताव मारत होते.. एकंदरीत निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेली ही रंगीबेरंगी फुलपाखरे पाहताना ३-४ तास कसे गेले ते कळले नाही आणि हे संग्रहालय आमच्या निवडक स्थळांपैकी एक होऊन गेले. .
वपाडाव

काही दिवसांपुर्वी मदणबाण यांनी फुलपाखरांच्या फटूंचे धागे टाकले होते....
त्यासारखेच वाटतेय.... ही घ्या त्यांची लिंक....
www.misalpav.com/node/19592
www.misalpav.com/node/19641

jaypal

लै भारी फोटो. अजुन क्लोज अप आणि मोठे असते तर अजुन छान दिसले असते. फोटो नं ५ मधे ऑब्जेक्ट लहान वाटते कारण अनावश्यक पार्श्वभागाने जागा उगाचच व्यापली गेली आहे(वेस्ट्ज हो.असो चुका आणि शिका :-) )

अवांतर= मी पण भिंग घेऊन पाहील पण "ती" प्रेक्षणीय स्थळं नाही दिसली हो. पुढील लेखात दिसतील अशी अपेक्शा बाळगतो ;-)

मर्द मराठा

क्रमांक ५ च्या बाबतीतली सूचना एकदम मान्य.... गोल्डन सेक्शन हा फोटोग्राफीचा नियम पाळण्याचा थोडासा अयशस्वी प्रयत्न आहे..
वर डावीकडच्या पानांच्या जागी काही प्रेक्षणीय असते तर जमले असते कदाचित..

इतर प्रेक्षणीय स्थळे टाकायचा जरूर प्रयत्न करीन..

प्रचेतस

अमेरीकन फुलपाखरं आवडलीत ब्वा आपल्याला.

पाषाणभेद

२३ सावे फुलपाखरू NRI होते काय? नाही, आंबे आवडले त्याला म्हणून विचारले. बाकी काही हेतू नाही. अन बाकी एकदम नाजूक दिसत असल्याने एखाद्या आयटी कंपनीच्या बागेतले असावे असेही वाटते.

मर्द मराठा

नाही हो... भारतीय आंबे मिळण्याचे नशीब कसले ह्यांचे ... मिळतील ते मेक्सिकन, ब्राझीलियन आंबे खातात बिचारी...
नाजूकपणा बद्दल बोलाल तर.. की वेस्ट, मायामी अशा 'प्रदेशाला' साजेलसा जन्मजात नाजुकपणा असावा त्यांच्यात...

इन्दुसुता

सर्व फोटो आवडले. या जागे विषयी आणखी माहिती देखिल आवडली असती.

Pearl

सगळे फोटो छान आहेत.
२०. मधला पक्षी पण सुंदर आहे. मस्त मेक-अप करून आला आहे :-)

प्यारे१

कातिल फोटोज...
क्लास्स्स्स्स्स!

मयुरपिंपळे

अप्रतीम छायाचित्र. १६ नंबरच्या फुलपाखरासाठी

फुलपाखरु मी..
हा चंद्र कसा मग मिरवितसे
लावीत पिसे! :)

श्यामल

फोटो आणि फोटोतली फुलपांखरे अतिशय सुरेख आहेत.

चिगो

एकदम सुंदर, अप्रतिम फोटोज आहेत..

मदनबाण

सर्वच फोटो फारच सुंदर काढले आहेत. :)

२० वा फोटोतला पक्षी पाहुन मला कंप्युटर मॉनिटर बनवणारी व्ह्युव्हसॉनिक (viewsonic) ही कंपनी आठवली,कारण या मॉनिटरवर या पक्षाचे चित्र असते... हा त्यांचा लोगो आहे.

(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)
अधिक माहिती इथे मिळेल :--- http://en.wikipedia.org/wiki/ViewSonic

*पाववड्या माझ्या फोटुच्या लिंकांचा संदर्भ दिल्या बद्धल धन्स ! ;)