पाककृती

कालवाचे दबदबीत.

Primary tabs

साहित्यः-१)कालवं २)खवलेले खोबरे. ३)बारिक चिरलेला कांदा. ४)थोडासा उभा चिरलेला कांदा(भाजण्यासाठी). ५)हळद. ६)मालवणी मसाला. ७)चिंच/टॉमेटो/आमसुलं. ८)मिठ चवीपुरते. ९)एक च्मचा धणे. १०)५-६ काळी मिरी. कृती :-प्रथम कालवं साफ करून घ्यावी. Image removed. Image removed. Image removed. त्यात बारिक चिरलेला कांदा,हळद,मालवणी मसाला घालून चांगले ढवळून शिजत ठेवावे.(पाणी घालू नये.झाकण ठेवून त्यावर पाणी घालून वाफेवर शिजत ठेवावे.) Image removed. Image removed. एका कढईत थोडे तेल घेवून त्यात धणे व काळी मिरी परतून घ्यावींअंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालावा व तांबूस होईपर्यंत परतावा.व मग त्यात खवलेले खोबरे घालावे.चांगले भाजुन घ्यावे.व नंतर जरा जाडसर वाटून घ्यावे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. कालवं शिजली की वाटलेलं खोबरे घालावे.मिक्स करून चांगले शिजवावे.वरून कोथिंबीर घालावी. Image removed. Image removed. Image removed.
गवि

अहा..

क्या बात है... मस्तच..

बादवे धबधबीत मधला "त" लुप्त असतो (सायलेंट) असं पुलंनी कुठेसं लिहिलं आहे..

ते वाक्य हसवणूक मधील माझे खाद्यजीवन या प्रकरणात आहे.
पण तो त उच्चारी लुप्त असतो, लेखी नाय काय !!!

गणपा

शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला.

आणि कालवांचं आमलेट (पोळा)!
गणपा, आता तू मेल्या नाय नाय त्या आठवणी काढू नको!!!
:(

शुचि

हे बरय आपण आठवण काढायची आणि गणपांवर खापर फोडायचं :)

गणपा

गावाला कालवं शोधायला खडकाय जायचो.
ताज्या ताज्या शोधुन आणलेल्या कालव्याचा भज्या, कांदा + बेसन + टोमेटो टाकुन केलेल्या वड्या आणि सोबतीला मस्त खाजरीची/ताडाची ताडी हिरवी मिरची मारके...... आहाहा काय पण आठण केलीत पिडांकाका.

नंदन

>>> शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला.
हाय! दबदबीत, भज्या, पोळ्या इ. नावं वाचूनच हृदयात कालवाकालव झाली :(

मला वाटतं शिंपल्यात असतात त्या तिसर्‍या आणि मुळे....
कालवं दगडांत किंव्हा कपारींना क्लिंग करून असतात....

गणपा

कालवं दगडांत किंव्हा कपारींना क्लिंग करून असतात....

बरोबर.

समुद्रातल्या खडकात अश्या पद्धतीने चिकटलेली असतात.

प्रचि जालावरुन साभार.

गणपा

तुमच्या परक्या भाषेतले शब्द आम्हाला कळत नाहीत... पण शुद्ध मराठीत त्यांना 'ऑईस्टर्स' म्हणतात. :)

पैसा

गोव्यात पण कालवं मिळतात. कालवं वरून खडबडीत असतात तर शिनाणे मोठ्या शिंपल्यांसारखे, पण एकाच काळसर हिरवट रंगाचे.

अमेरिकेत मिळतात कां कालवं? तिसर्‍या पाहील्या होत्या ९९ ranch मधे...

न मिळायला काय झाले ? अमेरिकन खातात कि ऑयस्टर.
९९ रांच कशाला, सेफवे मध्ये पण मिळायला हवे (असा अंदाज)

जागु

वा छान रेसिपी. मी नेहमी कालवांचे सुकेच करते. कधी कधी वड्या लावते.

इरसाल

हुम्म्म्म.....
चालु द्या..... पण उपवासाच्याच दिवशी का हो ? म्हणुन प्रतिसाद नाही...............