भटकंती

वासोटा किल्ला

Primary tabs

महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस तापोळा लेक आहे या लेक च्या पलिकडे आहे वासोटा किल्ला
अन्या दातार

छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५, ९, १०, १६ व २६ हे विशेष आवडले. पुढचा किल्ला कोणता??

प्रचेतस

+१.
सहमत आहे.
फोटो फारच आवडले.
पिकासावर टाकले आहेत का फ्लिकरवर?
फ्लिकरवर असतील तर गणेशाला दिसायचे नाहीत मात्र.

५० फक्त

श्री. अन्या दातार, तुम्ही, फक्त फोटो क्र, ५,९,१०,१६ व २६ हे फोटो आवडले असं बोलुन बाकीच्या फोटोंवर अन्याय करता आहात ? मी आताच श्री. गणेशा यांचे बरोबर फोटो क्र. ३,४,१३, आणि ४२ मधल्या विशिष्ट प्रकाशरचना आणि अँगल बद्दल एक तास चर्चा केली.

विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात.

त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते.

असो, आपल्या प्रतिसादावरुन आपली सौंदर्य विषयक विचार पद्धती काहीशी वेगळी असल्याचे लक्षात येते.

हंस

<विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात.>

अहो ५० राव, त्याच फोटोच्या उजव्या कोपर्‍यात बघाना! मला लाल किल्लापण दिसत आहे, दिसतोय का तुम्हाला?

५० फक्त

माझा मॉनिटर बिघडला आहे, माफ करावे.

मोहनराव

त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते.

हहपुवा! अजुन येउद्यात हो वासोटा वाले!! पुलेशु!
फोटो क्र. १५ मध्ये नक्की कशाचा फोटो काढायचा होता? ती सुबक ठेंगणी कोण? गाईड होती का?

इरसाल

ओ मोहन्राव ....
बुरुजाच्या मागे दिसतोय तो कुतुबमिनार्चा शेन्डा काय ?

मालोजीराव

....अहो त्यापेक्षा १४ क्र. चा फोटू बघा ना राव...कसला क्लोज व्ह्यू आहे महाबळेश्वर पठाराचा आणि त्या पठाराच्या ते ते बघा तिकडं त्या पोईन्टकड ते कपल काय करतंय...१४ नंबर च्या फोटो मध्ये १४ फेब्रुवारी चा डेमो देत असावेत ! या फोटोतले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत...या फोटू साठी वेगळा धागा असायलाच हवा !

इरसाल

ह्यो कसा काय सुटला म्हनायचा. १४ जोळ यु र्हायली ना बाप्पा.

आन्जासा.

पक पक पक

पुढचा किल्ला कोणता??


:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

'कासोटा '

मी-सौरभ

धाग्यासाठी घेतलेले परीश्रम बघून डोळे पाणावले... :)

कॉमन मॅन

महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस तापोळा लेक आहे या लेक च्या पलिकडे आहे वासोटा किल्ला

माहितीबद्दल आभारी आहे. छायाचित्रे आणि वर्णन, दोन्हीही सुरेखच :)

गवि

थरारक..

नि:शब्द..

कौतुक आहे..

५० फक्त

हे म्हणजे, बार मध्ये डॉक्टरला बियर पिताना पाहुन विचारल्यासारखं झालं ? ,

काय आहे किसन देवा, हा प्रतिसाद प्रत्यक्ष गविंनी नसेल दिला, त्यांनी टंकनिकेला सांगितलं असेल, ' हे बघ बै, हे चार धागे आणि हे चार प्रतिसाद, देउन टाक, आता झाली तिची थोडी चुक, करतील गवि इंसेंटिव्ह कट पगार दिवसाचा, हो किनई ओ गवि ?

गवि

हॅ हॅ हॅ..

पुण्यवान लोकांना फटु दिसत आहेत आणि वर्णनही.. हे प्रतिक्रियांवरुन कळत आहे..

प्यारे१

खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

बाकी महाबळेश्वर काय / कोण आहे?
त्याची खालची बाजू म्हणजे नक्की कुठली बाजू?
बाजू म्हणजे हात सुद्धा असतो. खालचा हात म्हणजे नक्की कुठला अवयव?
तापोळा म्हणजे काय/ कोण?
लेक म्हणजे मुलगी. कुणाची मुलगी?
तापोळा लेक म्हणजे तापोळा मुलगी का?
लेकच्या पलिकडे आहे वासोटा किल्ला !
वासोटा म्हणजे उलटा कासोटा का?
किल्ला म्हणजे मोठी किल्ली का?

रामदास

हा तुमचा पहीला लेख आहे . फोटो टाकण्यासाठी फ्लिकर/पिकासाचा वापर करावा. ते नेमके कसे करावे याबाबत बरीच चर्चा आपल्या संस्थळावर झाली आहे त्याचा वापर करावा. सोबत थोडेसे वर्णन वगैरे लिहून चांगला लेख तयार होईल.
अवांतर :
श्रीमंत प्रतिनिधींचा
किल्ला अजिंक्य वासोटा
तेलीण मारी सोटा
बापू गोखल्या सांभाळ कासोटा
तो हाच किल्ला आहे का ?

कॉमन मॅन

श्रीमंत प्रतिनिधींचा
किल्ला अजिंक्य वासोटा
तेलीण मारी सोटा
बापू गोखल्या सांभाळ कासोटा

वरील काव्यात्मक ओळी फारच सुरेख आहेत. आवडल्या.. :)

आम्ही आमच्या आगामी कवितेत तेलीण, सोटा आणि कासोटा या शब्दांचा अवश्य वापर करू.. :)

प्यारे१

>>>>कवितेत वापर करू..

मुळात कविताच का करु????
प्रश्न पडण्याचं कारण http://www.misalpav.com/node/20641

कॉमन मॅन

मुळात कविताच का करु????

वरेल प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही कारण ते आम्हाला माहीत नाही..! :)

बाय द वे, आम्ही आपल्या प्रश्न विचारण्याच्या हक्काचा आदर करतो, आपणही आमच्या कविता करण्याच्या हक्काचा आदर करावा असे वाटते. सदर कविता आपल्याला आवडेल, न आवडेल, कळेल, न कळेल याबाबतचे आपले मतप्रदर्शन अर्थातच स्वागतार्ह आहे.

लोकशाहीचा विजय असो..

नावडलेले कावळे
आवडलेले शहाळे
रातराणीच्या अंधारात
हुडहुडणारे हिंदोळे..!

या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)

व्वा...! काय सोटा काढलाय हो...!
वि-हंगम दृष्य आहे हो या किल्ल्याचं...फक्त फोटोंची किल्ली हरवलेली दिसतीये ;-)

अमृत

हा सर्वोत्तम आहे असे म्हणावे लागेल.... थोड्या शुद्धलेखनाच्या चूका सोडल्या तर भट्टी मस्त जमली आहे... आणखी येऊ देत... पु.ले.शु....

ता.क. - आशा आहे पुढिल लिखाण दृष्य लिपीचा वापर करून कराल....

वपाडाव

मी तर अजुनही तेथपर्यंत पोचु नै शकलो...
पुस्तकात कमीत कमी पान दुमडुन ठेवता येते, पुस्तक मोठे अन वाचण्याजोगे असेल तर...
पण इथं काय करायचं?
मी १० फटु बघतो, थोडंसं निवांत होतो, एखादा ग्लास पाणी पितो अन मग पुन्हा धागा वाचाया लागतो...
अख्खा दिवस जाणार वाटतं हा धागा वाचण्यात...
असो, छान माहिती... हळुहळु संपुर्ण धागा वाचुन काढेन...
बाकी, अन्याशी किंचित सहमत....

इरसाल

मि. वप्स,
मग तो क्रम्शः मधला १००१ वा फटु कवा बग्नार ?

वपाडाव

ते कासव नै का हळुहळु चालत जातं अन शर्यत जिंकतं... तसंच मी संपुर्ण धागा वाचुन काढेन...
अन संपादक मंडळ मला या पराक्रमाबद्दल बक्षिस पण देइल...

इरसाल

इ बबो...............
हबिनन्दन बक्षिसाबद्दल.............

मी-सौरभ

तुला बक्षीस म्हणून काही माणणिय मिफाकरणींनी अशुद्ध लिहीलेलं शुद्ध करण्याचा अधिकार देणार आहेत असे ऐकून आहे ;)
आमच्याही शुभेच्चा!!

हंस

<तुला बक्षीस म्हणून काही माणणिय मिफाकरणींनी अशुद्ध लिहीलेलं शुद्ध करण्याचा अधिकार देणार आहेत >

हे म्हणजे "भीक (आपलं.... बक्षिस!) नको पण कुत्र आवर" म्हणी सारखी गत झाली.

सुहास झेले

सुंदर फोटो. डोळ्याचे पारणे फिटले.... !!

कंचा क्यामेरा हाये....?? घ्यावा म्हणतो..... :)

मी-सौरभ

महाराष्ट्राचे हे उत्तुंग वैभव बघून ड्वाले पानावले

मंग चस्मा पुसून घ्या. अजून बरचं काही पहायच्य तुमाला. :)

अहो! डोळे मिटले हो! अगदी कायमचे! आता काय दिसेल ते तुम्हीच बघून घ्या! आमच्याच्याने आता हे सहन नाही होणार! ;)

अन्नू

असे जिवघेणे फोट्टु कप्युटरवर बघण्यापरिस.... Smiley

मोहनराव

चाकरमान्यानु, जरा धाग्याकडं लक्ष द्या की!! लोकं डुसकी फुडाया लागल्यात!!

पिंगू

काय दिसत नाय ब्वा.. वाटत आमचे डोळे गेले.. देवा वाचव रे.. ;)

- पिंगू

कपिलमुनी

चाकरमानी !

सदस्यं कालावधी
3 वर्षे 26 आठवडे

अवघड आहे राव !!!!

मराठे

असा एक धागा यावा मधून मधून म्हणजे दुपारचा वेळ कसा छाsssssन जातो.

वपाडाव

असा एक धागा यावा मधून मधून म्हणजे दुपारचा वेळ कसा छाsssssन जातो.

म्हणजे धाग्यातील फटु पाहुन हपिसातला सगळा शीण(थकवा) कसा बाजुला सारल्या जातो... असंच म्हणायचंय ना मराठे तुम्हाला...

कवितानागेश

हे सगळेच्या सगळे फोटो खरे तर मीच काढले होते, पण तिथेच कुठेतरी एका शेतात घुसून ;) स्त्रॉबेरी वेचताना, माझा कॅमेरा हरवला. :(
अत्ता कळतंय कुठे गेला ते.
पकडा पकडा पकडा... माझे फोटू चोरलेत....... :P

वासोटा किल्ला निवांतपणी पाहीन म्हटलं म्हणून धागा उघडला नव्हता.
डोळ्याचे पारणे फिटले. :)

-दिलीप बिरुटे

होबासराव

माहितीबद्दल आभारी आहे. छायाचित्रे आणि वर्णन, दोन्हीही सुरेखच :)

फार पूर्वी मी वासोट्यावर गेलो होतो.सुरेख किल्ला आहे. बघता क्षणी प्रेमात पड़तो.

sagarpdy

किल्ल्यावरून नागेश्वराचा काढलेला फोटू केवळ अप्रतिम!

होबासराव

फोटो क्रमांक २, ५ आणि १७ दिसत नाहियेत

अजया

ते खंड्याचे किलर फोटो होते राव.

होबासराव

चाकरमानि दादा / तै तेव्हढे खंड्याचे किलर फोटो पुन्ह्यांदा टाकता का ?

234, 245, 728 नम्रतल्या फटुत काय हाय त्ये.

फोटू नम्र 454, 988,1540 अन 54326 टाकल्या बद्दल तीव्र निषेढ.
वो सम्पादक्स म्णढळ, जरा लक्ष्य द्या कि वो.

होबासराव

234 आणि 728 मध्ये मला वाटत त्या जळवा आहेत ह्या जळवा वासोटा जंगल पार करतांना कधि अंगाला चिकटतात कळतच नाहि.

होबासराव

योगिराज त्या पिवळ्या रक्त पिण्यापुर्वि असतात हो...मला तरि फोटोत त्या काळपट दिसताहेत. तुम्हि मॉनिटर एकदा रिस्टार्ट करा बघु.

है का आता?
मोबल्या बंद करून चालू केला तर हिवऱ्या दिसायल्यात.

कुछ तो गडबड है दया,

पता लगाओ.

अजया

चष्मा धुवुन बघ गौरी.दिसेल.

होबासराव

धन्स चाकरमानि आता त्या किलर खंड्याचे फोटो दिसताहेत.