पाककृती
सिंधी चिकन
Primary tabs
साहित्य:
५-६ चिकन ड्रमस्टिक्स
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून तिखट
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून मीठ
१/२ कप दही
४ कांदे उभे चिरुन
२ टोमॅटो चिरुन
४-५ लवंगा
६-७ मिरे
१ टी स्पून धणे
१/२ टी स्पून जीरे
१ टीस्पून खसखस (मी वापरली नाही)
१/४ कप पुदिन्याची पाने
१ इंच आल्याचा तुकडा
५-६ लसूण पाकळ्या सोलून
२-३ टे स्पून तेल
कृती:
चिकनला हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि दही लावून कमितकमी एक तास मुरवत ठेवावे.
भांड्यात १ टे स्पून तेल घालून मध्यम आचेवर तापत ठेवावे. तेल तापले की आच मंद करुन त्यात लवंग, मिरे, धणे, जीरे, खसखस घालवी. १-२ मिनिटे परतुन तेलातून बाजूला काढून ठेवावे. भांडे परत आचेवर ठेवून आच वाढवावी. उभा चिरलेला कांदा घालावा. कांदा तपकिरी रंगावर परतून घ्यावा आणि बाजूला काढावा.
लवंग, मिरे, धणे, जीरे, खसखस, परतलेला कांदा,आलं, लसूण, पुदीना आणि टोमॅटो मिक्सर मधे वाटून घ्यावेत.
भांडे परत मध्यम आचेवर ठेवावे आणि त्यात १ टे स्पून तेल घालावे. तेल तापले की बाजूला ठेवलेले चिकन २-३ मिनिटे परतावे.
चिकन खाली लागू नये म्हणुन २-३ टे स्पून पाणी घालून परतावे. पाणी आटले की वाटण घालून परतावे. २ कप पाणी घालावे. झाकण लावून चिकन शिजवावे. चवीप्रमाणे गरज वाटल्यास मीठ घालावे.

व्वा व्वा... सोमवारची निळ आणि अशी भन्नाट पाककृती. लगे रहो :) :)
जबरदस्त !!!!!!!!
मस्त.. :)
तात्या.
झकास
मस्तच.
(कराचीप्रेमी)चिरोटा
शब्द्ळ ना।ईळ्त फुट्ळ्ट ,ल्ळइ भारळि पाक्ळ्क्रुतिळ...
वाह! मस्त :)
आणि फोटो कसले क्लास काढलेत (खास करून दुसरा आणि तिसरा).
बा.डी.स. (फुक्कट मे पंगा कोन लेंगा ;-))
अवांतर = "सिंधी" चिकन असुन पण मसाल्यांची भारी रेल चेल दिसतेय
आभिनन्दन! :-)
चालु द्या.....आसेच्....छान सुरवात सोमवार ची :-)
नेहमीच्या चिकनपेक्षा वेगळी पाककृती.. झकास..
ट्राय केली . भारि आहे.