कलादालन
टॅटिंग
Primary tabs
टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं......... जुनं प्रेम पुन्हा उफाळून वर आलं :)

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="469" alt="" />

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="360" alt="" />

" width="480" height="360" alt="" />
फारच नाजुक आणि भयंकर पेशंसच काम दिसतय.
सुरेख.
भयंकर पेशंसचं काम आहे!!
मस्तच!!
छान एकदम भारी!
भरपूर मेहनत घेतलेली दिसतेय.
तुमच टॅटिंगच काम जाम आवडल!
जयवीतै जरा निट ओळख करून दे गो.
सुंदर
सुंदर निगूतीची कला
लहानपणी माझ्या बर्याच फ्रॉक्सवर आणी माझ्या बाहुल्यांच्या ही फ्रॉक्सवर :P माझी आई अशाच टॅटिंगच्या लेस लावून द्यायची...त्याची आठवण झाली :)
कधी तिच्याकडून शिकून नाही घेतले पण आता मात्र नक्की शिकेन :)
तुम्ही केलेल्या टॅटिंगचे काम खुप आवडले आहे :)
गणपा, हो........ खरंच फार पेशन्सचं काम आहे शिवाय खूप वेळही लागतो. पण तयार झाल्यावर जे काही दिसतं ना....... त्यामुळे सगळी मेहेनत सार्थकी लागते :)
प्रीत, अन्नु, जाई, पाषाणा....... शुक्रिया :)
परा...... ह्याला शटलवर्कही म्हणतात. बाकी वीणकामासारखं हे पटापट वाढत नाही ना....... म्हणून हे फारसं लोकप्रिय नाही. भरपूर मेहेनत लागते. दोन गाठी मारुन ह्याची एक गाठ तयार होते. ती अशी गाठ असते की गाठ असूनही दोरा व्यवस्थित हलतो. ही गाठ येणंच महत्वाचं असतं. एकदा ही आली की बाजी जिंकली :)
हे करतांना फार काळजी घ्यावी लागते. म्हणजे सुरु करायच्या आधी हात, बोटं अगदी स्वच्छ धुवावे लागतात. कारण सगळं काम गाठींचं असल्यामुळे ओढतांना ती हाताच्या मळाने काळं होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात तर घामामुळे थोड्या थोड्या वेळाने हात धुवावे लागतात. पण मजा येते.
जमलं तर व्हिडियो टाकेन :)
म्हणजे टकुर्यात काहितरी शिरेल तरी.
वेटिंग फॉर व्हिडो...
टाकाच तुम्ही व्हिडियो!!
व्हिडियोच्या प्रतिक्षेत....:)
निवेदिता.... अगं टाकलाय की व्हिडियो :) पुढच्या पोस्टस बघ :)
प्रचंड पेशन्सचं काम, म्हणजे आम्ही फॉर्म भरण्याआधीच नापास. छान झालंय.
हं .........ही घ्या लिंक.
http://www.youtube.com/watch?v=T4orFe4kaLw
अशक्य प्रकार आहे हा. आयुष्यात एक गाठ मारता आली तरी पुष्कळ. :P
येथे पाहिजे जातीचे..
व्हिडोच्या लिंक ऐवजी व्हिडोच इकडे देत आहे.
अगदी असेच म्हणतो.
धन्य आहेस बै.
मारा की. कुणी अडवलंय? ती एक मारलीत तर बाकीच्या या गाठींकडं पाहण्याची वेळ येणार नाही. ;)
अगदी हेच म्हणायला आले होते.
आधी तुम्ही मारा वो श्रामो.
तुमच्याकडे बघुन तो पण मारेल.
परा, श्रामो....... ह्या टॅटिंगमुळे तुमच्या गाठी जर जुळल्या तर मला धन्य धन्य वाटेल हो...... :)
आईग्ग! सुरेख आणि नाजूक.
याची छोटी छोटी फुलं तयार करून साड्यांवर, बाळंतविड्यावरील झबल्यांवर लावली जात असत ते आठवतय.
______/\_______
बापरे! सॉल्लिड पेशन्स आहेत तुझ्याकडे!
रेवती...... हो....... ह्याची कॉलर पण खूप छान दिसते. शिवाय लेसेस पण एकदम क्लासी दिसतात :)
प्राजु..... :) ह्म्म्म्म्म...... फक्त काही काही बाबतीतच ;)
छानच दिसतय.
खरच आताशा एका ठिकाणी बसून काही करायला किंवा सलग वेळ मिळतच नाही त्यामुळे कितीतरी आवडत्या गोष्टींचा सध्या विचारही करत नाही... पुन्हा कधीतरी करायला मिळतिल अशी खरोखरच अजूनही वेडी आशा ठेऊन आहे.
तो पर्यंत तू केलेल्या वस्तू बघणे एन्जॉय करेन.
तेव्हा असेच शेअर करत रहा.... :)
ह्म्म्म्म....... खरंय तुझं. जेव्हा मनासारखा मोकळा वेळ मिळत नाही...... तेव्हा खूप चुटपूट वाटते ना...!! पण तुझ्या वेड्या आशेला असंच जागं ठेव ;)
नवीन काही केलं तर नक्कीच शेअर करेन.
असेच म्हणते
असेच म्हणते
हे आमच्या मातोश्री करीत असत.

त्या शटलचा टिक्टिक आवाज अन ते सुंदर पॅटर्न्स ही लहानपणाची आठवण आहे..
:)
भयंकर पेशंसचं काम आहे..
सहावी-सातवीला आम्हाला मराठी शिकवणार्या वैद्यबाई ऑफ लेक्चरला वर्गात आल्या की हे अअसलं करत बसलेल्या असायच्या . अर्थात गोंधळ वाढला की हाताबरोबर तोंडाचा पट्टा पण चालू व्हायचा. पहिल्या बाकावरच्या चिमण्यांना बाईंच्या कलेचं कौतुक करुन त्यांना इंप्रेस करायचा तेवढाच चान्स मिळायचा.
:)
सूड....... कसलं नाव घेतलं आहेस रे...... !!
बाकी....... पहिल्या बाकांवर नेहेमी चिमण्याच बसतात. चिमणे सगळे मागे....... दंगा करायला......हो ना....!!
अगदी दंडवत, लोटांगण घालायला पाहीजे तुमच्यापुढे.. अत्यंत सुंदर दिसतं आहे हे टॅटिंग-काम, आणि रंगही मस्त निवडलाय.. मला तर हे मळल्यावर धुवावं कसं, हाच प्रश्न पडलाय..
उत्कृष्ट कला.. सुंदर.. व्वा!!
पहिली गोष्ट म्हणजे इतक्या मेहेनतीने केल्यावर ते आपण मळूच देत नाही. म्हणजे........ टेबलवर घातलं की त्यावर प्लास्टिक कव्हर वगैरे घालतो. किंवा काम झालं की लगेच उचलून ठेवतो. इतकंही करुन रोज वापरायचं असेल तरी काहीच बिघडत नाही. साधे कपडे जसे धुतो तसंच धुवायचं काहीही खराब होत नाही. शक्यतोवर साबणाच्या पाण्यातून न पिळता काढायचं.
धन्य आहे तुझी! हे बारीक विणत बसायचं म्हणजे....
चिगो, पैसा..... :) तहे दिल से शुक्रिया !!
ह्म्म...... बारीक आणि चिकाटीचं नक्कीच आहे........पण ते करत असतांना.......असं नाजुक वाढतांना फार छान वाटतं. त्यामुळे उत्साह कमी होत नाही. पण हा.......... एकदा एखादी गाठ चुकली किंवा जोडतांना वगैरे चुकलं की संपलं......... ते सुधारणं म्हणजे महाकठीण काम. सवय झाली की मात्र चुकण्याचं प्रमाण जवळजवळ नसतंच.
सुंदर डिझाइन आहे. आणखीही नविन डिझाइन्स पहायला आवडतील.
नवीन काही केले की नक्की टाकेन.
मस्त दिसतय डिझाईन!! खुप बारीक विणणे कष्टाच काम आहे हा अनुभव रुमाल विणण्यातून आला आहे!!
अजुन डिझाईन पहायला आवडतील!!
:)
शुक्रिया :)
एखादे तरी फुल करून बघेन म्हणते. पण पेशन्स ??????
काय बर करावं?
मीनल..... अगं तुला जमलं तर नक्की आवडेल करायला. मग पेशन्स पण येतो आपोआप :)