जे न देखे रवी...

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

Primary tabs

तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं?
कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं?
तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर?
हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं?
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?
पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे?
मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं?
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी
असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?

-अविनाश ओगले

चतुरंग

सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली.
अत्यंत सुंदर!

(स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;))

चतुरंग

तळीराम

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?

क्या बात है! बहोत बढिया!

इनोबा म्हणे

काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा

खूप छान...
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?

ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी
असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?

किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..

बेसनलाडू

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?

छान!
(रिकामटेकडा)बेसनलाडू

विसोबा खेचर

ओगलेशेठ,

आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..!

एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :)

अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला...

आपला,
(ऋणी!) तात्या.

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

हेच म्हणतो !

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

यशोधरा

खूप सुरेख!! सगळ्या ओळी सुरेख जमल्यात.

फटू

खुप छान लिहिली आहेस कविता... कॉलेजचे दिवस आठवले रे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पुष्कराज

मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब

पुष्कराज

जयवी

अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !!

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास
न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं?
..........अप्रतिम !!

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते....
पुण्याचे पेशवे

मिसळपाव

का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.

बहुगुणी

...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.

मनिष

वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी
असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?

सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास!

- मनिष

प्राजु

ओगले साहेब,
इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/