पाककृती

झटपट नाश्ता-गुळ पोहे.

Primary tabs

साहित्यः-१)जाडे पोहे. २)खवलेले खोबरे. ३)बारीक किसलेला गुळ. ४)चिमूटभर मिठ. ५)साजुक तुप. Image removed. कृती :-प्रथम जाडे पोहे धुवून घ्यावे. किसलेला गुळ व खवलेले खोबरे एकत्र करुन चांगले मिक्स करावे. Image removed. त्यातच चिमूटभर मिठ घालावे.मिक्स केलेले साहित्य धुतलेल्या पोह्यात चांगले मिक्स करावे.खायला देतांना त्यावर चमचाभर साजुक तूप घालून द्यावे. Image removed. आमचे कडे गूळपोहे हे गोकुळाष्टमी दिवशी कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवतात . तसेच दिवाळीला पण करतात.
रेवती

हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला.
एरवी दडपे पोहे, हातफोडणीचे पोहे, फोडणीचे पोहे, दूध गूळ, दही दूध, चिंचेच्या कोळाचे नारळाचं दूध घालून,फोडणीच्या मिरचिचे, तळणीच्या मिरचिचे, तेल मीठ, तिखटाचे वगैरे प्रकार माहित होते.
काही दिवसांपूर्वी पोह्याचे थालिपिठ, कटलेट्स असे प्रकारही ऐकले.

५० फक्त

दुध, गुळ आणि पोहे हा एक पुर्ण नाष्टा आहे, खोबरं आणि तुप घालुन खालेले नाहीत कधी.

सर्व्ह करताना तुप गरम करुन घालावं असं वाटतं, कारण गार तुप घालुन ते पोह्यात मिक्स होइल की नाही शंका आहे. नाही तर गुळ तुप एकत्र करुन मग ते पोह्यात मिसळावं, अजुन एक ऑप्शन यावर साय टाकली तर जाम भारी लागतो हा प्रकार.

बिस्कुट ,खारी, केक यांसारखे जंक फूड पेक्ष्या असले अस्सल भारतीय व पौष्टिक पदार्थ केवव्ही चांगले... :)

पैसा

खास कोकणी प्रकार! ते पोहे गावठी तांबडे असतील तर त्यांची चव काय वर्णावी!

ते पोहे गावठी तांबडे असतील तर त्यांची चव काय वर्णावी! +१

प्रकार साधाच पण टेस्टी लागत असणार,यात शंका नाही...कोळ-पोहे पण असेच झटपट होतात,आणी मस्त लागतात.. आंम्ही पाली जवळच्या एका दुर्गम खेड्यात ९ कि,मि.चालत गेलो होतो...आणी गेल्या गेल्या तिथल्या यजमानीण बाईंनी, ''अहों,कामं काँय करांचीच असतात...दिंवसभर...!आधी हे पोटात दडपा..!'' असें म्हणुन आमच्या समोर एका परातीत,भाजलेले तांबडे पोहे,आणी मिसळच्या शांपलशी साधर्म्य असणारा कोळ खायला ठेवला.मला वाटलं हे काय कोरडवाहू प्रकरण आहे..पण दोन बकाणे मारले,आणी नंतर परात अर्धी कधी झाली...ते कळलं देखिल नाही...त्यावरुन आमच्या 'त्याच' मातितल्या मित्रानी-'' जीथे पोचायला पडतात कष्ट,तिथले कोळ-पोहे बेश्ट'' अशी म्हण' ही सुनावल्याचे अठवते...

दही काल्याचा हा नैवैद्य आहे.
ह्या निमित्ताने मुंबापुरी मधील दही हंडी डोळ्यासमोर आली.
पु ले शु