कलादालन

खरबुजाचा आस्वाद

Primary tabs

संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे. परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता. Image removed. इथल्या खगोलशास्त्रज्ञांना हा एखाद्या ग्रहाचा फोटु वाटायचा Image removed. या नक्षीकामाची सुरुवात बुडातुन होऊन ती वर वलयाकारात पसरत गेली होती Image removed. सालीवरच्या रेघा रेघांच्या कलाकुसरीत मजा होती. कुठे शार्क, तर कुठे पंख पसरलेला समुद्रपक्षी तर कुठे पालथी पडलेली पाल असे असंख्य आकार दिसत होते. एका बाजुला सीमारेषा देखिल होती. Image removed. काही नक्षी जरा विरळ होती आणि शिकाऊ कलाकारान संगमरवरावर काढलेलं ओबड धोबड नक्षीकाम भासत होतं. Image removed. काही ठिकाणे समुद्रात उभ्या असलेल्या नौका आणि त्यांच्या आजुबाजुला तरंगणारी होडकी असा देखावा दिसत होता. Image removed. देठाच्या अगदी लगतचा भाग तुळ्तुळीत होता. थोड्या अंतरापासून आडव्या रेषांची वलयाकार नक्षी सुरू झाली होती आणि पुढच्या रेषा त्या वलयांकित रेषांना लंबरेषेत वर गेल्याहोत्या Image removed. जिथुन नक्षी सुरू झाली तिथुन मोठा प्रवाह रेषांना वेगाने बाहेरच्या दिशेने भिरकावत असलेले दिसत होते. Image removed. Image removed. पलिकडच्या भागाचे निरिक्षन केले असता काही मानवी आकृत्या आणि चक्क ईंग्रजीतील 'ए' हे अक्षर दिसुन आलं. Image removed. फोटु टिपताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. मग अचानक भूकेची जाणीव झाली आणि लगेचच आज संकष्टी असल्याची आठवण झाली. इतका वेळ मी खरबुजाकडे 'त्या' नजरेने पाहिलच नव्हतं. कॅमेरा बाजुला ठेवला आणि सुरी हातात घेतली.
नंदन

फोटो आवडले आणि वर्णनाची शैलीही.

सहज

हनी ड्यू!!!! भारीच फोटो व वर्णन.

खरबुजात हे दोन प्रकार दिसतात एक अगदीच तुळतुळीत असतात व एक असे नक्षीदार बाह्यआवरण.

बरेच दिवसात नवे स्पेशल सर्वसाक्षी प्रवासवर्णन आले नाही आहे. तेवढे जमवा! :-)

५० फक्त

मस्त फोटो, मला तरी हे एवढं जमलंच नसतं, मी आधी सुरीच हाती घेतली असती.

आयडियाची कल्पना येकदम झाक हाय... :-)

फकस्त अता येकच चिंता...ती म्हणजे सगळ्या नवउत्साही फोटु-ग्राफरांनी रोज एकेक फळ घेऊन येऊ नये... नायतर आंम्हाला त्याचे विडंबना-पोटी सुरी घेऊन इथेही फ्रुटसॅलेड करावे लागेल...कॉलिंग वल्ली,बरोबर ना हो... ? ;-)

मोदक

झकास फोटू, झकास वर्णन.

देठ दिसणार्‍या फोटोमध्ये देठाजवळ समुद्रकिनार्‍याला धडकणार्‍या लाटांची सुबक आणि नाजूक नक्षी तयार झाली आहे असे वाटते.. :-)

गवि

दिव्यदृष्टी आहे तुम्हाला असंच म्हणेन...

अफलातून धागा.. जाम आवडला आहे...

जयवी

असा विचार डोक्यात येऊन तो अंमलात आणणं..... तो ही इतक्या सुंदर तर्‍हेने...... !! मानना पडेगा !!
तुम्हा फोटोग्राफर्स ना कशात काय दिसेल ते सांगता येणार नाही....... ;)

प्यारे१

व्वा वा वाह..!
मान गये आपकी पारखी नजर को|
मस्त फटु.

गणपा

कलाकाराची नजर ती कलाकाराचीच. :)
माझ्या सारख्या येरागबाळ्यासाठी हे 'खाण्याचे' काम नोहे. ;)

काय मस्त दिसत आहेत फटू.

ते फुग्याला दोरे गुंडाळुन नक्षीकाम करतात, तसलाच प्रकार दिसतो आहे एकदम.

(फटू आंतरजालाव्रुन घेतले आहेत.)

विजुभाऊ

खरबुजाचा एक भन्नाट प्रकार मी केला होता.
खरबुजाचे तुकडे सिग्नेचर मध्ये दोन तास मुरवत ठेवले. त्यावर किंचित मीठ भुरभुरवले.
एकदम झक्कास प्रकार झाला होता

गणपा

हॅ हॅ हॅ.
खरबुजे को देख टरबुजाने रंग बदला होगा. ;)

सोत्रि

खरबुजे को देख टरबुजाने रंग बदला होगा.

:D

- (रंग न बदलणारा) सोकाजी

विजुभाऊ

अरे कलिंगडासोबत फ्लेवर्ड व्होडका असते रे. हा हन्त हन्त हन्त............
( अवांतर..... तू मला गटणे भौ म्हणालास तर मी तुला काळा डॉन म्हणेन)

अगदीच राहावले नाही म्हणून अवांतर करत आहे.

अवांतर..... तू मला गटणे भौ म्हणालास तर मी तुला काळा डॉन म्हणेन

आता तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला 'माधवी' किंवा 'पावसाची परी' म्हणावे, तर ते माझ्याकडून होणार नाही.

पिंगू

मस्त.. फोटो पाहून दाद दिल्याशिवाय राहावत नाहीये..

- पिंगू

पैसा

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!!!

निश

बुंबास्टिक मस्त दिसताहेत फोटो

ईन्टरफेल

मस्त.. फोटो पाहून दाद दिल्याशिवाय राहावत नाहीये.. >> पिंगु +१

मीनल

सर्व लेखन आवडले. फोटोंचे Description ही Class !!!!!!!

फार सुंदर छायाचित्रे. मायक्रो लेन्स वापरली आहे का? काय पॉवरची?