पाककृती

हरियाली चिकन

Primary tabs

साहित्यः ५०० ग्राम चिकन साफ करुन, थोडा लिंबाचा रस व किंचित गरम-मसाला लावून १५-२० मिनिटे मॅरीनेट करणे. १/२ वाटीपेक्षा थोडेच जास्त ओलं खोबरं + मुठभर कोथिंबीर + मुठभर पुदिन्याची पाने + तीन-चार हिरव्या मिरच्या असे एकत्र करुन वाटणे. (हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घेणे) २ छोटे कांदे बारीक चिरून १ टेस्पून आले+लसूण पेस्ट २-३ तमालपत्र, ३-४ दालचिनीच्या काड्या, २-३ हिरवे वेलदोडे, ३-४ लवंगा १ टेस्पून धणे पावडर १-१/२ टेस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार तेल १ चमचा बटर (ऐच्छिक) Image removed. पाकृ: प्रथम एका नॉन-स्टीक भांड्यात तेल तापवून खडा मसाला परतून घेणे. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे. Image removed. त्यात आता बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईस्तोवर परतणे. Image removed. कांदा चांगला मऊ झाला की त्यात तयार केलेले हिरवे वाटण घालणे. मीठ, गरम-मसाला व धणे पावडर घालून एकत्र करणे. Image removed. मसाला चांगला मिक्स झाला की त्यात चिकनचे तुकडे घालणे. आवश्यकतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवणे. Image removed. चिकन पूर्ण शिजले की एक चमचा बटर सोडावे. Image removed. झटपट असे हरियाली चिकन तयार आहे. कांद्याच्या सॅलॅडसोबत सर्व्ह करा. कांद्याच्या पातळ चकत्या करा व त्या मोकळ्या करा. त्यात थोडा लिंबाचा रस, लाल-तिखट, मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करा कांद्याचे सॅलॅड (लच्छेदार प्याज) तयार :) Image removed.
जयवी

अहाहा.... काय ती रेसिपी....कसले सही फोटो आणि प्रेझेंटेशन...... कशाकशाची तारीफ करावी गं.... !!

निश

सानिकास्वप्निल जी,मस्त आहे पा़ककॄती.
नक्कि करुन बघणार.

५० फक्त

नेहमीपेक्षा वेगळं म्हणुन सांगतो, यावेळी फोटो जरा गंडले आहेत.

jaypal

झक्क्कास (५० फ्क्त शी फोटो बाबत सहमत) मला पालक आवडतो म्हणुन मी हिरव्या चटणीत पालक देखिल घालतो.

भारतात आलात की एक पार्टी ठेऊन आम्हाला बोलवा बुआ! किती ते नुसतं जळवायचं...! अभिनंदन.

मीनल

चिकन नाही पण मला ते मणी फार फार आवडले. जयू ताई ने पाहिले का?

जयवी

मीनल..... अगं हो...... ती मोत्यांची रांगोळी आहे....किती सुरेख आहे ना..... !! मी म्हटलं ना.....प्रझेंटेशन एकदम सहीये :)

इरसाल

रैवारी मारतोच उभा आडवा हात..................घरुन झणझणीत हिरव्या मिरच्या अनायसेच आलेल्या आहेत, करुन टाकू साग्रसंगीत.

प अमोल

चिकन पाहुन भुक लागली

*********अमोल*******