कलादालन
माझी फोटोग्रफी
Primary tabs
गोव्यातली संध्याकाळ. मासे पकडून झाले. पण काम कूठ संपलय ?
काम संपलं मोकळा झालो.
दुबईचा बुर्ज खलिफा
आणी रातच्याला
रात्रीची दुबई. डावीकडे आहे तो पुस्सट बुर्ज खलिफा.
एडीट केलेला फोटो

मलाच दिसत नाहियत फोटू. संपादकांपैकी कुणी हाय का?
फक्त दोन फोटो दिसतायत .....
बाकी फक्त
दुबईचा बुर्ज खलिफा
आणी रातच्याला
रात्रीची दुबई. डावीकडे आहे तो पुस्सट बुर्ज खलिफा.
एडीट केलेला फोटो
:) :)
क्रमांक दोनचा आवडला..
पहिला फोटो त्यातल्या रंगांमुळे आवडला. बाकीचेही चांगले आहेत. शेवटचा कसा एडिट केला आहे कृपया सांगा.
सगळे फोटु दिसले :-) शेवटचाही छान एडिट केलाय... डॉक्टर नाव काय ठेवलत हो,या शोधक नजेरेच्या बाहुलीचं.. ? गोंदश हाय :-)
@दुबईचा बुर्ज खलिफा >>> असं का नाव दिलय..? काहि माहिती आहे का..?
अरेबिक मध्ये 'बुर्ज' म्हणजे मनोरा (टॉवर) आणि खलीफा हे युएईच्या अध्यक्षांचे शेख खलीफांचे नांव आहे.
मुलगा आहे नाव - राजवीर
@मुलगा आहे नाव - राजवीर >>> काय म्हणताय काय...? हे म्हणजे चरित्र नायकाची प्रत्यक्ष येंट्री झाली कि वो...! ;-)
असो... अभिनंदन... :-)
मस्त फोटो!
त्या छोटीला 'चीज' आवडणार नाही बहुतेक मोठं झाल्यावर ;-)
सुंदर फोटो.
इतक्या लहान बाळाच्या चेहर्यापाशी फ्लॅश मारत आहात का? तर तसे करु नये. लहान बाळाच्या डोळ्यांना फ्लॅश सहन होत नाही.
दुसरा फोटो आवडला.
एकतर एवढ्या जवळच्या अंतरावर फ्लॅशची गरजच भासू नये. भासत असेलच तर परावर्तीत प्रकाश (रिफ्लेक्टेड फ्लॅश लाईट) वापरावा.
(तो फ्लॅश आहे की 'सन गन' आहे, जी व्हिडीओ चित्रिकरणासाठी वापरतात ती आहे, ह्या बद्दल साशंक आहे.)
(असं मला वाटतं). फ़ोटो मारताना शटरचं बटण अर्धं क्लिक केलं की क्यामेरा एक प्रकाशशलाका समोर फ़ेकून किती अंतरावरच्या लक्ष्याला फ़ोकस करायचंय याचा वेध घेतो. काही क्यामेऱ्यांमधे हे काम फ़्लॅशच करतो. क्यानन एसेलारच्या हौशी मॉडेल्समधे ऑटो फ़ोकस सेन्सिंग लाइट वेगळा देत नाहीत. अजून महागातल्या मोडेल्समधे देतात. पण तो निकोनमधे अगदी तळाच्या मोडेल्समधेही देतात. मला आवडलेल्या चित्रदर्जाबरोबर हाही मुद्दा मी क्याननच्या पुढ्यात निकोन निवडायला मदतगार ठरला होता.
फ़ोटो सुंदर हो रा.घ.भाऊ ...
बरोबर.. पण हा फ्लॅशच आहे.. कॅननचे माहीत नाही पण निकॉनला हा लाईट, लेन्सजवळ असतो, या चित्रातला लाईट वरती, फोल्डेबल फ्लॅशवर आहे.
मला वाटतय, कि हा आरशात काढलेला फोटो आहे..
क्याननच्या काही प्राथमिक एसेलार मोडेल्समधे फ़्लॅशचा दिवाच कमी शक्तीची प्रकाश शलाका सोडून पाहून स्वचलित फोकस संवेदकप्रकाशाचं काम करतो. पण शेवटी तो फ़्लॅशचाच दिवा. कमी कमी म्हणून किती कमी प्रकाश फ़ेकणार! म्हणून या फ़ोटोत फ़्लॅशसारखा दिसतोय (असं आपलं मला वाटतं).
माझ्या प्रतिपादनानुसार हा आरशातला फ़ोटो नाही. रा.घ.द्वारा फ़ोकस केला जात असताना दुसऱ्या कुणीतरी मारलेला आहे [बहुदा निलेश देसाई नामक व्यक्तीने].
आरशातला फ़ोटो असता तर स्वचलित फ़ोकस संवेदकप्रकाश पडून झाल्या नंतर लेन्स लॉक होऊन मग फ़ोटो निघाल्यामुळे तो पांढरा प्रकाश इतक्या ठळकपणे दिसला नसता. आरशातला फ़ोटो फ़्लॅश वापरून काढला असता तर साधारण असा आला असता हे कबूल, पण एसेलार वापरणाऱ्या प्रकाशचित्रकाराला तान्ह्या मुलांच्या इतक्या जवळ जाऊन फ़्लॅश मारू नये हे भान असणारच.
ज्योती ताई, ही अर्धी कृष्णधवल नि रंगिताची किमया पिकासा वापरून करता येते.
रा.घ.भाऊ मौन सोडा आता -
निलेश देसाई नामक व्यक्तीला ओळखता काय ?
नाय, पन आपला असा होराय् का तो फ़ोटो काढणारी व्यक्ती निलेश देसाई असावी -
कळ्ळ कस तुम्हाला ?
आम्हाला एक तरी समाधान! 'बडवा'मधे तुम्ही तिथं आमची उत्कंठा ताणताय ... इथं थोडा आमा गरीबाला बी चानस् भेटला, बरं वाटलं. मागावरच हुतो तुमच्या जनु.
कोन हाए का हितं सांगू शकनारा - आमी ही ज्योतिषवाणी कशी काय केली?
>>>> कोन हाए का हितं सांगू शकनारा - आमी ही ज्योतिषवाणी कशी काय केली?
मी सांगू? अंदाजच बरं का.
--- निलेश देसाईंनी हाच फोटो शेअर केला असणार, अर्थात फेसबुकवर! तो तुम्ही तिथे पाहिलात.
निलेश देसाई आणि राजघराणं हे मित्र असतील.
अर्थात निलेश देसाई हे तुमचे मित्र असतील. राजघराणं आणि तुम्ही एकमेकांच्या फ्रेंडलिस्टमध्ये नसाल.
ताजा कलम: आम्ही कौन्तेय, राजघराणं, किंवा निलेश देसाई यांच्यापैकी कोणाच्याही फ्रेडलिस्टमध्ये नाही. :p
इमेज लोकेशन मधुन शोधला असशील..
शैलेन्द्र,
तुझ्या आधीच्या प्रतिसादात लिहिलं होतंस की हा आरशात काढलेला फ़ोटो आहे. पण माझी मनोमन खात्री होती की हा आरशातला फ़ोटो नाही, नि दुसऱ्या कुणीतरी वेगळ्या क्यामेऱ्याने काढलेला फ़ोटो आहे. त्याची कारणं मी माझ्या नंतरच्या प्रतिसादात दिलीत. पण आणखी एक कारण राहून गेलं ते म्हणजे आरशात काढलेल्या फ़्लॅशसहितच्या फ़ोटोंमधे चमकलेला फ़्लॅशचा दिवा या फ़ोटोत आलेल्या दिव्यापेक्षा जास्त प्रखर असतो. इतका की फ़ोटोची मजा निघून जावी. हा प्रकाश फ़क्त दिसावा इतकाच क्षीण असल्याने; क्यामेरा क्याननचा आहे हे सिद्ध झाल्याने नि क्याननच्या काही मॉडेल्समधे फ़्लॅशकडूनच स्वचलित-फ़ोकस-संवेदक-प्रकाश-शलाकेचं काम होत असल्याचं माहिती असल्याने माझ्या विधानाला बळकटी देण्यासाठी मी पुरावे गोळा करण्याच्या मागे लागलो. प्रस्तुत फ़ोटो दुसऱ्या कुणीतरी काढलेला असेल तर तो क्यामेराही वेगळाच असणार. म्हणून हा फ़ोटो आपल्या डेस्कटॉपवर घेऊन उजवी टिचकी --> तपशील पाहिले. क्यामेऱ्याच्या एक्झिफ़ तपशीलांत फ़ोटोचा दिनांक, वेळ, आयेसो, अपर्चर, झापडवेग, क्यामेरा नमुना, बनावट, रिझोल्यूशन इ.इ. बऱ्याच गोष्टी असाव्यात म्हणून. तर फ़ोटोवर पिकासामधे प्रक्रीया झाल्याने त्या सगळ्या आलरेडी गेलेल्या होत्या. पण फ़ोटोवर पिकासामधे प्रक्रीया झाली आहे नि ते काम निलेश देसाई या व्यक्तीच्या संगणकावर झालंय हे समजून आलं. आणि मी अत्यंत निरागसपणे या धाग्यावर तशा अर्थाचं मोघम विधान पेरलं. साध्याशाच भासणाऱ्या इंटरनेट संचारात आपण आपल्या पाऊलखुणा कुठे कुठे नि कशा कशा मागे सोडतो याचा विचार न केलेलाच बरा!
----------------------------
जेरेमि ब्रेट्ट (ऍज शेर्लॉक होम्स्))))))))
__/\__
मानला तुला
कसचं, कसचं ... :-D
सुंदर फोटुज!!
सुंदर फोटो ! :)
शेवटच्या फोटोत बहुतेक सिलेक्टीव्ह कलरचा वापर केलेला दिसतोय !
पहिला फोटो जास्त आवडला,
सुंदर फोटो...