कलादालन
चंद्रकोर आणि चांदणी
Primary tabs
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते.

वाह आकाशात केवळ एक चांदणी आणि तिच्या सोबतीला चंद्रमा.
मस्त जोडगळी टिपली आहे.
आवांतर : क्षणभर वाटलं की देवकाकाच साक्षीदेवाच्या रुपाने पुन्हा प्रकटले की काय? ;)
खरंच मस्त फोटो.
उद्या प्रयत्न करेन काढायचा. आज लक्षात आले होते, पण काही कारणास्तव राहून गेले :(
मस्त फोटो!
गणपाच्या अवांतराला लाईक केले आहे.
फोटोवर संस्करण करुन बाकीचा भाग काळा केला आहे का?
या निमित्ताने नाईल यांनी त्यांचा टेलेस्कोप, आयफोन वगैरे वापरुन शनी ग्रह अगदी त्याच्या कडी(कड्या / रिन्ग्ज) सकट कॅमेरात पकडला होता ते आठवले.
शनिमहाराजांचे दर्शन घडविल्याबद्दल आभार! आधी हा फोटो पाहिला नव्हता.
फोटोवर संस्करण करुन बाकीचा भाग काळा केला आहे का? - हेच मनात आले आहे, आज मी सुद्धा प्रयत्न करुन पाहीन.
सहजराव/ ५० शेठ
संस्करण वा चलाखी केलेली नाही. नमूद केल्याप्रमाणे विस्तिर्ण अशा क्षितिजावर जेव्हा मी ३०० टेली म्हणजे डिजिटल एस एल आर परिमाणात ४५० टेली वापरतो तेव्हा साहजिकच आकाशाचा निवडक भागच चौकटीत येतो. आणि चंद्रकोर व ती चांदणी जवळ वाटले, मधे/ अगदी जवळ दुसरा तारा/ चांदणी नव्हते. यामुळेच फोटो घ्यावासा वाटला. आय एस ओ ४०० सेटींग वापरले. परवाच्या मानाने कोर व चांदणी हे अंतर काल कमी होते. आज ते आणखी कमी असण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रयत्न अवश्य करा. दातार शेट , तुम्हीही प्रयत्न करा.
फोटो असंस्कृत आहे??
असंस्कारीत म्हणा की. असंस्कृत म्हणजे काहीतरीच वाटते.
असो, नक्कीच प्रयत्न करुन तुम्हाला पिडणार. हीहॉहॉहॉ
उत्तम
छान! टिपला फोटो
आवडले.
फोटो पेक्षा ते प्रत्यक्षात जास्त जवळ दिसतात त्यामुळे ते दृश्य जास्त प्रभावी वाटते