कलादालन

फोटोशॉप किडे - भाग १

Primary tabs

मिपाकरांसाठी फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न
आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू

फोटोशोप उघडा
file --- open --- तुम्हाला हवी असलेली image

हा फोटो मी घेतलाय

आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा

आता एकावर एक असे २ layer बनतील
आता त्याच window मध्ये सर्वात शेवटी जो भाग गोल वर्तुळाने highlight केलाय , त्या बटनावर क्लिक करून " black न white " option सिलेक्ट करा '

आता आपली कार अशी blackn white दिसेल
त्यानंतर डाव्या बाजूला तो टूल बॉक्स आहे त्यातला खोडरबर (इरसेर) सिलेक्ट करा

आता काम सोप्पय ... जेवढा भाग आपल्याला रंगीत हवाय तेवढ्या भागावर तो इरसेर फिरवा , म्हणजे कृष्णधवल भाग निघून जाईल

हे final output

आहे कि नाही एकदम सोप्प
असो भेटूच पुढील भागात काहीतरी नवीन घेऊन :)

पैसा

फेणे गुर्जी बहुत धन्यवाद! सोप्पं आहे!

g1

पण हे होमवर्क फोटोशॉपमधे केलेलं नाही. पिकासामधे केलंय.

अन्या दातार

चांगला उपक्रम. फक्त क्रमशः मध्ये अडकलं नाही म्हणजे मिळवल!

पियुशा

फेणे गुर्जी धन्स __/\__
तुमचे किडे आवडले ;)

मी-सौरभ

तुमचे किडे आवडले

त्यांची चटणि पण छान असते. करुन बघा.

चौकटराजा

प्रिय मन्या,
आपण आमच्या लहानपणीचा हिरो फास्टर फेणे उर्फ बन्या याचे भौ आहात असे वाटते.
मन्या बन्या . वा ! यमक ही मस्त जुळले की !
तर त्याच काय आहे मनुभ्हौ ,
आपण या मिपाकराना सोताच्या स्माईल्या बनवायला शिक्वा . gif animation
त्या स्माएल्या हलणार्‍या असतील.
मी अशी माझी एक स्माईली बनविली आहे. ज्यात चौकट राजा चा लोगो हसतो. काही दिवसात ती मिपा वर दिसू लागेल.
माझ्या तरी निरिक्शणाप्रमाणे आपल्या आय डी चा लोगो व त्याच लोगो ची स्माएली बनविणारा मी मिपावर पहिलाच आहे.
आपला
चौकट राजा

प्रचेतस

झकास हो फेणे काका.
अजून येऊ द्यात.
फोटोशॉपचं व्हर्जन कुठलं वापरलंत?

धन्यवाद श्री मन्या फेणे.

फोटोशॉप मधील प्रसाधनात्मक (कॉस्मेटिक) युक्त्या शिकवाच पण एकूणातच ही चमत्काराने भरपूर अशी संगणक प्रणाली कशी वापरावी ह्याचे पायरी पायरीने मार्गदर्शन केलेत तर ज्ञानात भर पडेल आणि मिपाकरांची सृजनशीलता उमलून त्याचे निरनिराळे अविष्कार कलादालनात पाहावयास मिळतील.

गवि

जबरी रे मनेश... ही युक्ती बेहद्द आवडली आहे... अशाच नवीन नवीन युक्त्या शिकीव..

अमृत

आपल्या उपक्रमास शुभेच्छा!

अमृत

यकु

आवडलं रे मफे.
लिक्विफाय सारखे अजून भारी भारी किडे दाखव की.. एक व्यंगचित्रकार मित्र हाताने व्यंगचित्र काढतो आणि ते स्कॅन मारुन फोटोशॉपमध्ये रंगकाम, कर्व्ह वगैरे करतो ते पाहिलं होतं बघ..

मी-सौरभ

सुरवात उत्तमच आहे. अजून पुढे काय काय शिकवतोयस ते बघुया.

पु.ले.शु.

५० फक्त

अजुन एका उत्तम उपक्रमाची सुरुवात.

आमचे अजुन एक श्री. स्पाजी, नावाचे मिपाकर आहेत, ते सुद्धा या क्षेत्रात उत्तम काम करतात अशी वदंता आहे, त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

पूर्वाश्रमीचे चि.स्पांडुकुमार यांनी नामांतरा नंतर टाकलेल्या या पहिल्या जिल्बीला आम्चा जोरदार सलाम....!

मन्नू पेहेचान हुआ,करके फोटोशॉप किडे...मन्नू पेहेचान हुआ,करके फोटोशॉप किडे...
मन्नू ने चाल छुपाई,खाल छुपाई, दे दी सलामी रे....
स्पा मन्नू नाम हुआ,करके फोटोशॉप किडे... ;-)

ओ मन्नू रे...ओ मन्नू रे... तेरा गल्ली गल्ली में चर्चा रें
अरे बना फोटो का,बना शॉपं का पर्चा रे... ;-) ओ मन्नू रे...ओ मन्नू रे...

लिम्का-सा फिगर, टँगो सी नशा...टँगो सी नशा...
है तेरे मटके मे फोटू मजा...है फोटू मजा...
हाय हम ना जाने इसके हूनर सारे...
हाय हम ना जाने इसके हूनर सारे... ये है इंटू किडा ;-)
ये बिमीसाल हुआ,करके फोटोशॉप किडे...
पड गये इसके पिछे, आयटम बड्डे बडे :-p

ही जिल्बी अवडण्यात आलेली आहे... पुढिल जिल्बी खाण्यास उत्सुक आहोत... त्यामुळे पुढचा वेढा टाकेपर्यंत ग्यास बारिक ठेवावा बंद करु नये... ;-)

स्पा

:)

तुमच्या लक्ष अशण्यावरही आमच लक्ष आहे ;)

सुहास झेले

सही... फोटोशॉप सीएस६ बीटा व्हर्जन आलंय, त्यात अजून काय नवीन नवीन फिचर्स आहेत हे सुद्धा सांग रे

:) :)

गणपा

जे बात रे फेण्या..
मागे केलेला नवस आता फेडायला घेतो. :)

- मामा

सूड

स्पा काका, छान लेख हो !!

गणपा

काय हे सुडोबा.. बिचार्‍याने ज्या कारणास्तव नाव बदलले होते त्याचा पार विचका केलास की. :)

सूड

हो रे हो. मी काका म्हणायला नको होतं.

शैलेन्द्र

लाय्य्य भारीए...

फोटोशॉपची सी डी आहे का तुझ्याकडे? मला लोड करायचय..

कवितानागेश

आपल्याला किडे करण्याशिवाय अजूनही बर्‍याच गोष्टी येतात म्हणे.
त्याबद्दल देखिल लिहिणार का आपण? ;)

अवांतरः बाकी किडे म्हटले की मला 'प्रार्थनाकिटक्स'च आठवतात. चविष्ट झाले होते..... :(

प्यारे१

>>>अवांतरः बाकी किडे म्हटले की मला 'प्रार्थनाकिटक्स'च आठवतात. चविष्ट झाले होते..... :(

संपल्यामुळे दु:खी आहात का? शेफ टारु ला आमंत्रण द्यावे लागेल परत...

मोहनराव

धन्यवाद माहितीबद्दल स्पा उर्फ मन्या फेणे!!

आचारी

धन्यवाद ! .....अशीच उपयुक्त माहिती अजुन येउ द्या !

भिकापाटील

धन्यवाद काका माहीती आवड्ल्या गेली आहेच्च.

वपाडाव

माहितीपुर्ण धागा...
बादवे, स्पावड्या हे नाव लै भारी होतं हे जाता जाता नमुद करतो...

मदनबाण

ह्म्म्...फोटो शॉपचा वापर आवडला.
असेच अगदी GIMP वापरुन देखील करता येते.
हल्ली नविन एन्ट्री लेव्हल डिएसएलआर मध्ये सिलेक्टीव्ह कलरचा पर्याय मिळतो,तो सुद्धा वापरताना मजा येते.

सोत्रि

फोटोशोप उघडा

मुदलात हे फोटोशॉप उघडायला इन्स्टॉल करावे लागेल. चकट्फु डाउनलोअड कुठे मिळेल तेही सांग.
पराला साकडे घातले असते पण सध्या तो सन्माननिय झाल्यामुळे उच्च्भ्रू झालाय ;)

असो, बाकी ही लेखमाला भारीच आहे ही गाजणार ह्यात शंका नाही.
मीही हे किडे शिकायला उत्सुक आहे.

- (विद्यार्थी) सोकाजी

स्पा

चकट फु फक्त torrants वरूनच मिळू शकत :)

नंदन

उत्तम उपक्रम, एम. एफ. ;). पु. भा. प्र.

प्रास

जमल्यासारखं वाट्टंय.....

जरा बघा बरं फेणेगुर्जी, गृहपाठ बरा झालाय का ते?

एस

आपल्याला फोटोशॉप मुळीच जमत नाही. आता प्रयत्न करून बघण्यात येईल. धन्स!