पाककृती
गार्लिक प्रॉन्स
Primary tabs
साहित्यः
कोलंबी - १/२ किलो
लसुण - ३-४ पाकळ्या
हिरवी मिरची - १-२
ऑलिव्ह ऑईल - ३ चमचे
लिंबाचा रस - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तंदुरी मसाला - १/२ चमचा
हिंग - १/४ चमचा
बटर - १ चमचा
मिठ चवीनुसार
wooden skewers
कृती:
१. कोलंबी स्वच्छ करुन घ्यावी.
२. लसुण व हिरवी मिरची एकदम बारीक चिरुन घ्यावी.
३. एका भांड्यामधे कोलंबी काढुन घ्यावी. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल, लसुण, हिरवी मिरची, हळद, लाल ति़खट, तंदुरी मसाला, हिंग, लिंबाचा रस व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. हि कोलंबी १/२ तास फ्रिजमधे ठेवुन marintae करावी.
४. तो पर्यंत wooden skewers पाण्यामधे भिजवुन ठेवाव्यात.
५. १/२ तासानी कोलंबी फ्रिज मधुन बाहेर काढावी.
६. एका पॅन मधे थोडे बटर व ऑलिव्ह ऑईल गरम करण्यासाठी ठेवावे.
७. प्रत्येक skewer ला ३-४ कोलंबी लावुन घ्याव्या.
८. हे skewers पॅन मधे दोन्ही बाजुनी shallow fry करुन घ्यावेत. हे fry करताना त्याला वरतुन marination चा मसाला लावत रहावा.
९. २-३ मिनिटामधे कोलंबी शिजेल.
१०. गार्लिक प्रॉन्स तयार आहेत. हे skewers गरम असतानाच serve करावे.
४.
मला बटर गार्लिक प्रॉन्स आवडतात.
मस्त स्टार्टर डिश.
कृती आवडली.
अरे असल्या पाकृ टाकताना आमची दया येत नाही का???
अजून ब्रेकफास्टसुध्दा झाला नाही.
पोटात कावळे ओरडत आहेत आणि तोंपासु.
कातील फोटो...
वल्ली / ५० / मृत्युंजया - सरूटॉबाने ठरवा राव लवकर आता..
माझ्या एका पार्टीला तिथे प्रॉन्सचा फन्ना उडवला होता.. ;-)
थंड झाले किंवा शिळे झाले तरी चालतील पण पाठवा एकदा.
सहीच..... अतिशय आवडती डिश. :) :)
तोँपासू
अगदी तो.पा.सु.
आजही हि डिश करतो.
आमच्याकडे फ्रोझन टायगर प्रोंझ मिळतात.
चांगले मुठभर मोठे. साक्षात बंगालच्या उपसागरातून अवतरलेले
गवताळ असल्याने फक्त फटूंसाठी धागा उघडला आणि सार्थक झाले.
रुचिकलीका जागृत जाहल्या.
जबरद्स्त चवदार फोटु !!
गार्लिक प्रॉन्समधून गार्लिक कुठे गायब झाले आहे.. ;)
- (शाकाहारी) पिंगू
लसुण त्याच्या marination मधे होता आणि fry करताना पण लसुण होता. फोटो मधे एवढ नीट दिसत नाहिये. :)
काय आहे ना आजकाल पाककृती वाचण्यापेक्षा बघण्यावर जास्त भर द्यायला लागलोय... ;)
- पिंगू
आंम्हा गवताळ जनास भगवंता प्रमाणे यांच्याही फक्त दर्शनावरच समाधान मानावे लागते... :-)
पण तेही आज प्रत्यक्षभेटी इतके सार्थ झाले... ओले काजुगीर मिळाले(अता पुढच्या महिन्यात) तर या डिशचे स्मरण करुन खाणेत येतील... :-)
चमचमीत दिसते आहे पाककृती. अभिनंदन.
छायाचित्रात, किंचित कमी शिजलेले वाटताहेत.
छान पाकृ आणि जीवघेणे फोटो!
धन्यवाद.....कधितरी कोल्हापुरच्या दिशेकडे दोनचार प्रान्स उतरुन टाका.
प्रॉन्स खात नाही.. त्यामुळे नुस्ता लसनाचा गड्डा गॅसवर भाजून खाईन... :)
प्रॉन्स खात नाही.. त्यामुळे नुस्ता लसनाचा गड्डा गॅसवर भाजून खाईन... :)