पाककृती
मसाला बांगडा
Primary tabs
बांगडे
लागणारा वेळ: ३० मिनिटे
लागणारे जिन्नस:

- ४ बांगडे
- अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
- ३ टेस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १ टेस्पून धणे पावडर
- २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १ टेस्पून मिठ
- केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
- १ टीस्पून तेल
- बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरत ठेवावे.
- केळीची पाने स्वच्छ करून त्यांच्या उलट बाजूला ३-४ थेंब तेल लावून ठेवावे.
- तव्यावर थोडेसे तेल टाकून गरम करायला ठेवावा.
- आता एक बांगडा एका पानाच्या तुकड्यावर ठेवावा आणि पान दुमडून घ्यावे.
- तापलेल्या तव्यावर ही गुंडाळी टाकून प्रत्येक बाजूने १०-१२ मिनिटे शिजवावे.
- सर्व्ह करावे..
मस्त्...मॅकरेल म्हणजे बांगडा का??? चायनिज ग्रोसरि स्टोअर मध्ये बघितल्या सारखा वाटतोय...
आज सोमवार आहे गं ,असे अत्याचार नको करु गं प्लिझ :(
"अरे बांगडू" आठवले.
बांगडा एकदम टेम्पटींग दिसतो आहे. (मला बांगड्याची अॅलर्जी असल्याने मी कधी त्याचा तोंडाला लागत नाही)
तसाच तो खूप टेस्टीसुध्दा असतो.
(मत्स्यप्रेमी) चिंतामणी
वेल्कम बॅक दिपाली. :)
बांगडा = कमकुवत बिंदू.
:(
आणि
बांगडी = ?
ही घे बांगडी, ;)
तारली (सार्डीन) चित्र जालावरुन साभार.
दिसतय छान ! लागेलही छानच !!!
बांगडा चमचमीत दिसतो आहे. मसाला बांगडा म्हणजे अंगचेच कालवण (मसाला) असेलसे वाटले होते. असो.
पारशी लोकांच्या 'पात्रानी मच्छी' प्रमाणे कृती दिसते आहे. अर्थात, त्यांचा मसाला वेगळा असतो.
झक्कास दिसत आहे :) फोटो पण मस्त :)
बांगडा आवडत नसल्याने माझा पास....
+1
दिसतय छान ! लागेलही छानच !!
लपलप झाली जीभ !!
दोनदा झाला!
फोटु पण दिलखेचक आला आहे
धन्यवाद...मलापण हा बांगडा ठिकच वाटला, भारतातला जास्त चांगला लागतो.