पाककृती

शेवग्याच्या शेंगांची भाजी ---

Primary tabs

साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट, मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर. कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला. चवदार होतात. शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल. ( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.) Image removed. Image removed. ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....;) ही घ्या भाजी ---- करा फ़स्त .... Image removed. Image removed.

कॄपया फ़ोटो कुणीतरी अपलोड करावेत --

जो करेल त्याला धन्यवाद.

अन्या दातार

फोटो क्र. १

फोटो क्र. २

फोटो क्र. ३

फोटो क्र. ४

सकाळ पेपरपेक्षा तुमचा टेबलक्लॉथ जास्त चांगला दिसला असता ;)

रेवती

छानच गं.
दहा पंधरा वर्षांपूर्वी अशी भाजी खाल्ली होती.
त्या शेंगा कोवळ्या नसाव्यात असा अंदाज आहे.
मला इथे कधीतरी नक्की मिळतील आणि अशी भाजी करू शकेन.
आधी भाकरी केल्या
भाकर्‍या न म्हटल्याबद्दल भारी वाटले.:)

सखी

भाजी व फोटु पण छानच, आम्ही पण रस्सा भाजी करतो. या विकेंडलाच आता भाकरी भाजी करते.

रेवती इंडियन ग्रोसरमध्ये फ्रोजन शेंगा चांगल्या मिळतात (माझ्या सा.बां.नी सांबार केले त्याचा व शेंगांचा मस्त वास सुटला होता). म्हणजे कोवळ्या शेंगांची सर त्याला येणार नाही (मी एकेकाळी १००-१५० शेंगा झाडावरुन काढलेल्या आहेत :( ) पण अगदीच न मिळण्यापेक्षा आणि इथल्या ताज्या भाज्या असतात त्यातल्या शेंगापेक्षा चांगल्या - कारण त्या तर इतक्या वाळलेल्या असतात की ते लाकुडच वाटते कधी कधी.

रेवती

येस्स. आता आणते भारतीय दुकानातून शेंगा.:)

गणपा

व्हेज नळ्या. :)

नुसत्या शेंगा कधी खाल्या नाहित. शक्यतो इतर भाजींत, वरण-सांबरमध्ये वा कोलंबी-सुक्या मध्ये घालुनच खाल्यात आजवर.

( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.)

ही टीप भारी. :)

चिंतामणी

>>>ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....

त्याच बरोबर ही सुचना सुद्धा भारी आहे.

घरी शेवग्याचे झाड आहे का????

इरसाल

किती भारी लागते म्हणुन सांगु.
माझ्या लेकीची आवडती भाजी आहे.

अवांतर : रश्याची आणी मसाल्याची कधी बनवलीय काय? ती पण जाम भारी.

चिंतामणी

तोंडाला पाणि सुटेल असे बोलू नका.

पाकृ ठेवा इथे.

अरुणा

करुन पाहायला पाहिजे .. :) कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले ....

प्यारे१

>>>कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले ....

अरुणा हा स्त्री आयडी आहे का?
असल्यास हा प्रतिसाद फाऊल म्हणून धरावा का?
नसल्यास हा प्रतिसाद अम्मळ अश्लील म्हणून आयडीच्या ख व मध्ये मोर्चा काढावा का? ;)

- चवळीच्या नि शेवग्याच्या शेंगा आवडणारा प्यारे :)

पिंगू

शेवग्याच्या शेंगा म्हणजे चव कसली सॉल्लिड असते..

मला तरी नेहमी शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला मिळते. कारण मावशी नेहमीच गावावरुन पाठवते.

- पिंगू

आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे.

भेंडीप्रेमी
परा

ही शेवग्याची नविन श्टाइल कळ्ळी... :-)

@आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे.>>> या मंग कदीतरी आमच्या मार्केटयार्डाच्या किरकोळ बाजारात, थित कवळं/जून सगळच भेट्टं...! ;-)

ऋषिकेश

अरे आजकाल त्या मॉलमधे दिसतात म्हणे!

योगप्रभू

धन्यवाद.
माझी आवडती भाजी.
कोवळ्या शेंगांचे अन आपले काय जमत नाय. गर खायला मिळत नाही त्यात.
पण बाजारात शेवग्याची नवी जात मिळते. जाडसर गरयुक्त आणि साल एकदम मऊ.
ही भाजी खाणे म्हणजे सुख. :)

पैसा

आमटी भाताबरोबर पण चांगली लागेल. मी नेहमी रसभाजी करते किंवा शेंगा आमटी, सांबार कशाततरी घालते. आता अशी करून बघेन.

जागु

छान भाजी. आम्ही अशी चिंच गुळातील रस्सा करतो शेंगांचा.

हरकाम्या

या शेंगा सगळ्या खायच्या की आतला गर फक्त खायचा. आतला गर खायचा तर या भाजीसाठी केलेली मेहनत फुकट
जायची.

शेंगांची भाजी छानच दिसतेय हो ताई.
पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना!
उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!!
:)

यकु

>>>पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना!
उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!!

----- शमत आहे! माझ्यापण.
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))

पाषाणभेद

शेवग्याच्या शेंगा उकडवून ताकात भिजत घाला अन ते ताकाचे पाणीही फोडणीला वापरा. एक वेगळीच चव येते शेंगांना. गावाकडे आमच्या घराजवळ एक शेवग्याचे झाड होते. तेथले काका न सांगता वानोळा द्यायचे.