जे न देखे रवी...

कवितेच्या कवितेची लावणी....

Primary tabs

रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी,
टाकोटाक कशिदा मी काढीला,
नाक नका मुरडू माझ्या कवितेला..||

नवी कोरी कविता लाखमोलाची
भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची,
गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू...

लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात..
अवचित आली माझ्या मनात की मनात..
कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू...

भीड नाही ठेवली टीकाकारांची,
मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची,
कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...

अरुण मनोहर

टाळ्यांचा कडकडाट! =D>
नवी कोरी कविता लाखमोलाची
भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची,
गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला

नाक कशाला मुरडायचे ह्या छान विडंबनाला? उत्तम.

बेसनलाडू

(लावणीप्रेमी)बेसनलाडू
याला विडंबन म्हणावे काय?
(पृच्छक)बेसनलाडू

चतुरंग

उत्तम विडंबनांची जननी ठरावी ह्यात नवल ते काय?
(ह्याच गाण्याचे केशवसुमारांनी केलेले विडंबनही प्रेक्षणीय आहे!)
(स्वगत - केसु हल्ली बरेच दिवसात फिरकला नाही.. बॉडी दुखते आहे वाटतं? :? :P )
चतुरंग

अमोल केळकर

नवी कोरी कविता लाखमोलाची
भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची,
गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू...

विशेष आवडले

शितल

मस्त विड्॑बन केले आहे आणि केशवसुमारा॑नी ही या आधी अगदी सह्ही विड॑बन केले होते.