पाककृती
मायक्रोव्हेवमधील कैरीचा छुंदा
Primary tabs
साहित्य:
१ कप कैरीचा कीस
दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे)
१ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून भरडसर जीरेपूड
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टेस्पून पाणी
पाकृ:
एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे.
आता त्यात साखर व १ टेस्पून पाणी घालून सगळं एकत्र करावे व ५ मिनिटे बाजूला ठेवावे.
मायक्रोव्हेव मध्ये बाऊल ठेवून हाय पॉवर वर ३ मिनिटे शिजवावे.
बाऊल बाहेर काढून मिश्रण गार होऊ द्यावे.
मिश्रण थोडे चिकट व एकतारी असले पाहिजे.
पूर्ण गार झाले की त्यात लाल तिखट व जीरेपूड घालावे व मिक्स करावे.
काचेच्या बर्णीत भरावे.
हा छुंदा तुम्ही चपाती, थेपले, पराठे व रोटीबरोबर खाऊ शकता.

फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटले.
अगदी हेच म्हणतो.
शेवटचे छायाचित्र तर खास 'तोंपासु' प्रकारातील आहे. अभिनंदन.
याच्या बरोबर जर का तव्यावरुन पानात पोळी वर तूप(लागेल तेवढं...) असा बेत जमला,तर मला पोळ्या खायची नशा होते... कळतच नाही किती खाल्ल्या... भन्नाट टेस्टी प्रकार आहे हा...
काय भारी दिसतंय....!
वा! छानच.
जबरा....
मानले ब्वा तुम्हाला :-)
आमच्याकडे हाच पदार्थ तिखट न घालता फक्त गोड करतात. ही पाकृ सोपीसुद्धा दिसतेय, एकदा करून बघेन.
ओह्ह्ह्ह्ह्ह्ह!!!!!!!!!!!
प्लिझ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ अशा रेसेपी टाकु नका हो तै , हापिसात ५ वाजेपर्यंत थांबणे जिवावर येते अगदी अस काहिस पाहील की ;)
कहर कहर दिसते आहे एकदम पाकृ !
आता इकडे भरडसर जीरेपूड शोधणे आले.
आहा.. हा छुंदा जिभेला लावी पिसे...
- पिंगू
मस्तय गं.... करुन बघायला पाहिजे.
सगळ्या पाकृ झकास.
अमृत
साध्या गॅसवर करता येईल काय? बाकी वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
अमृत
कैर्या पाडून झाल्या-झाल्या प्रतिसाद टंकायला घेतला होत, पण नेट गंडलं.. आता मस्तपैकी बनवून आणि खाऊन प्रतिसाद टाकतोय..
धन्यवाद, सानिकातै.. पाकृ बनविण्यात आणि आवडण्यात आली आहे.. :-)
मस्त , मस्त,मस्त.
हाच पदार्थ सोलर कुकर मध्ये कसा करता येईल?
सर्व मिश्रण काचेच्या वाडग्यात ठेवून, तो वाडगा सोलार कुकरात ठेवायचा आणि सोलार कुकर उन्हात ठेवायचा.
अरे कुणीतरी सोलार कुकरची पाककृती टाका... ;)
- पिंगू
नाही. 'सोलार कुकर' कसा बनवितात माहित नाही.
हा घ्या सोलर...
आणी तुम्ही छुंदा घेऊन त्या खाली बसलात,की कुकर ;-)
सर्व मिश्रण काचेच्या बर्णीत ठेवून, ती बर्णी कडक उन्हात ठेवायची ७-८ दिवस छुंदा चांगला मुरला की खायला तयार :)
खूपच सुरेख दिसतोय छुंदा... तोंडाला पाणी सुटले!
घरी आणल्या आहेत कैर्या, करून बघणार नक्कीच :-)
आवरा !! ;)
भन्नाट !!
तू फोटोच इतके भारी टाकतेस ना........ जीव कासाविस होतो गं....... !!
जबरी... भन्नाट... !!!!!
अरे इथे लक्षच गेल नाही.
भन्नाट दिसतोय.
शाळेत असताना डब्यातल्या चपात्यांपैकी एका चपाती आड हा छुंदा/मुरांबा दडलेला असायचाच.
मी काल हा झटपट छुंदा केला. आणि खूपच आवडला. :-)
नेहमीप्रमाणेच भारी..
पिकलेल्या आंब्यापासूनच्या विविध पाकृंचीही वाट पाहतो आहे. या सर्व गोडाच्याच असाव्यात असं नाही..
अन्यत्र दिलेली इच्छा कम विनंती कम प्रतिक्रिया इथे पुन्हा पेस्टवतो आहे..
आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याचेही अशा प्रकारे काही चटकदार (आमरस , पन्हे हे नेहमीचे सोडून) पदार्थ बनवता येत असले तर कोणीतरी कृपया सांगावे. बदल होईल जरा. आणि घरीही आंब्यापासून काहीतरी अनवट बनवून सरप्राईझ देता येईल.
अननसाचे सार असा प्रकार ऐकला होता. मधे गणपाने आंब्याचं सासव दिलं होतं.
आंबे, कोकम अशा कोंकणातल्या मेव्यापासून बनणार्या पदार्थांची मालिका ऐन मे महिन्यात मिपावर येईल तर काय बहार येईल.
या इच्छेपायी तेवढ्यासाठी वेगळा विनंती धागा काढण्यास कचरतो आहे म्हणून इथे टंकले.
काल आम्ही घरी पोचण्याआधीच संपला.
भाचा त्याच्या आईला (माझ्या बहिणीला ) विचारतो कसा?
आई, कैर्यांचं काय केलं??
आई म्हणे छुंदा!
मी कुतुहलानं : कुठं आहे?
सगळे मिळून : आहे नाही होता....!
भाच्यानं काढलेल्या कैर्या धारातीर्थी पडल्या.
देव, त्यांना सद्गती देवो.
:(
वारल्या गेल्या आहे !