पाककृती

कणकेचे लाडू

Primary tabs

साहित्यः-१) एक वाटी कणीक. २)एक वाटी गुळ. ३)अर्धी वाटी तूप. ४)पाव वाटी किसलेले सुके खोबरे. ५)एक चमचा खसखस. ५)पाव चमचा वेलचीपूड. कृती :-प्रथम कणीक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे व हातानेच त्याचा चुरा करावा.खसखस थोड्या तुपात भाजून घ्यावी.एका भांड्यात जूळ घेऊन त्यावर पाणी शिंपडून त्याचा दोन तारी पाक करावा.त्यात खोबरे,खसखस,वेलचीपूड व कणीक घालावी.सर्व मिश्रण नीट एकत्र करावे व लाडू वळावे. हवे असल्यास लाडवात सुका मेवा घालावा.(मिश्रण कोरडे पडत आहे असे वाटल्यास त्यावर थोडे दुध शिंपडून लाडू वळावे.) Image removed. सौजन्यः-दैनिक तरूण भारत.
पैसा

आधी फोटो नव्हता बहुतेक! आता छान दिसतायत. पण कृती तरूण भारतमधून घेतलीय का?

रेवती

अगदी. त्याने लाडू चुरचुरीत लागतो.

आमची आई करायची नेहमी, पण तुपात कणीक भाजून घेतली की थोडे कोमट असतानाच त्यात गुळ
घालायची व एकत्र मळून लाडू वळायची...छानच लागतात.

रामपुरी

एका भांड्यात जूळ घेऊन
साहित्य न वाचल्याने "जूळ" चा अर्थच लागेना. :) म्हटलं हे काय नवीन. मग साहित्य वाचल्यावर कळालं जूळ म्हणजे गूळ :) :)

निश

ज्योति प्रकाश जी, अप्रतिम पाकॄ.
एकदम मस्त लागतो हा लाडु खायला.