भटकंती
कात्रज ते सिंहगड - (K2S) - नाईट ट्रेक - कोणी इच्छूक आहे का..?
Primary tabs
ट्रेकिंग ग्रूप मधल्या एका मित्राची NIM (Nehru Institute of Mountaineering) च्या बेसिक कोर्स साठी निवड झाल्याने त्याचा स्टॅमीना वाढवण्यासाठी आणि आम्ही सोबत म्हणून येते काही महिने दर शनिवारी (किंवा जसे जमेल तसे पण शनिवार नक्की) कात्रज ते सिंहगड ट्रेक करायचे ठरवत आहे.
हा एक थकवणारा पण विलक्षण आनंद देणारा ट्रेक आहे.
कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे...
संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...
वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...
पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली...
काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्या तार्यांनी भरलेले आकाश..
क्षणात चमकून लुप्त होणार्या उल्का..
दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड...
अशा अनेक आठवणी आहेत K2S च्या.. :-)
अधिक माहिती.
१) ट्रेक रात्रीचाच असेल.
२) रात्रीतून चालायचे अंतर - १८ ते २० किमी. (अंदाजे ५ ते ६ तास)
३) वाटेत साधारणपणे १८ डोंगर / टेकड्या आहेत. (हो. अ ठ रा)
४) प्रॅक्टीस म्हणून आम्ही भरपूर वजन पाठीवर बाळगणार आहोत. त्यामुळे सोबतच्या ट्रेकर्स च्या पाठीवरचे ओझे सांभाळायची तयारी आम्ही ठेवली आहे.
५) फर्स्टएड बॉक्स जवळ असणार आहे.
६) कमीतकमी ३ जण नक्की असतील.
७) ट्रेक रात्रीचा असल्याने टॉर्च अत्यावश्यक.
८) वरील कोणत्याही माहितीने "मला जमेल का..?" असा प्रश्न उद्भवू देवू नये - आम्ही आहोतच बरोबर. :-)
९) ही कोणतीही झैरात नाही - ट्रेकसाठी पैशाचा कोणताही व्यवहार होणार नाही.
कोणी मिपाकर इच्छूक असल्यास जरूर संपर्क साधावा.
माझी राहिलेली हौस आहे ट्रेकिंगची . वय ५९ .( महिने नाही वर्षे ) बी.पी व डी एम आहे.समजा माझं बरवाईट झालं तर तुम्ही तिघेच असाल .
आपल्याकडे कमीतकमी चार लागतात . काय करू ? येउ का नको ?
@ अत्रुप्त आत्मा: प्रतिसाद नको पण स्मायल्या आवरा. तुम्ही जाण्यास उत्सुक आहात की नाही याचा काहीही बोध होत नाहीये.
@चौकटराजा: स्वतःची हौस भागवायची म्हणून दुसर्याच्या गळ्याला फास का लावताय? सुज्ञपणे काय तो निर्णय घ्या ना तुम्हीच.
;)
असो. या उपक्रमास शुभेच्छा.
आमची नाईट ट्रेकची हौस आम्ही लहानपणी म्हशी चुकल्यानंतरच्या शोधात भागवून घेतली आहे. अगदी असंच रात्री तंगडतोड चालणं, काटेकुटे, दगडधोंडे तुडवणं. जोडीला बाबा, काका, तात्या अशा कुणाच्या तरी मुखातून झालेला उद्धार, "साल्यानो, ढॉरा राकायला जाताव का गोटया खेलाय आनि नदीत पवाय? म्हशी कुटं जातात त्याज्यावर लक्श नाय ठेवता येत?"
काकांची सवय लहानपणापासूनच काय..? :-D
एक लेख लिही रे..
शेखाडी ते बनेश्वर.. (शेजारच्या) काकांच्या सोबत. ;-)
पण तुमच्यासाठी तिकडे नाईट ट्रेकला इच्छूक काका कॅरी मॅट टाकणार नाही याची काळजी घ्या. ;)
@ अत्रुप्त आत्मा: प्रतिसाद नको पण स्मायल्या आवरा. >>> चित्रांचा अर्थ समजून घ्या,आणी स्वत:ला सावरा. :-p
@तुम्ही जाण्यास उत्सुक आहात की नाही याचा काहीही बोध होत नाहीये. >>>तो तुम्हाला कशाला व्हायला पाहिजे...? धागाकर्त्याला झाला कि नाही हे महत्वाचं...! (त्याला झालेला आहेच.. आंम्ही दुपारीच भेटलो होतो ;-) )
"त्या" चार जणाना पुण्य मिळतं की फाशी ?
आता फार घसरडे असेल...पण जाऊन या. मी ही हा ट्रेक यासरख्याच कारणासाठी केला होता....
BOL.
कधी निघणार आहेस? म्हणजे शनिवारी रात्री की शुक्रवारी रात्री? आणि भेटणार कुठे ??
मी प्रयत्न करतो... गेले ७-८ महिने कुठे ट्रेक झाला नाही, त्यामुळे आता जरा ओझं (स्वत:चं ;)) घेऊन मोहिमेला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल....... :) :)
तुला चेपूवर आमच्या ग्रूपवर अॅडवतो आहे...
Trekism.
व्हक्के.... :)
ट्रेकसाठी शुभेच्छा.. एक नवीन आयडीया दिलीय तुम्ही. आज ६ तारखेचा पोर्णिमेचा चंद्र जरा जास्तच उजळ असणार आहे, म्हणे..
मी येतोय.
-सूर्यपुत्र.
बस जगह और वक्त बता दो, बंदा हाजिर हो जायेगा !!!
'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' ही म्हण आठवली.
वप्या, तूच रे तूच ह्या कलियुगात शब्दाला जागतोस.... बाकी कुण्णी कुण्णी नाही रे!
वप्या मस्त जोक मारलास रे
सग्ळ्यंना टेंपोत बस्वु का रे... बसा की शांत...
अन अरे फेण्या एका ट्रेकला गेलास म्हणुन लै माजलाएस का... एकेकाला बघतो रे...
छ्या.. वप्या तू या वेळी तरी येशील असे वाटले होते....
(काडी लावण्यात आली आहे... :-o)
अन्याचा सल्ला मानून (चौरांना दिलेला) योग्य तो निर्णय घेतो आहे. ;)
ट्रेकला शुभेच्छा :)
मी येतोय, कसे कुठे ते कळविणे !!
मीही येतोय
माझीही यायची तीव्र इच्छा आहे पण श्री. चौकटराजांसारखीच समस्या आहे. त्यातून सध्या भारतापासून कोसोदूर आहे. तेंव्हा क्षमस्व.
भविष्यात कधी तसा योग आलाच तर जरूर सामिल होईन. (एक अनुभव म्हणून)
सध्या अनेकानेक शुभेच्छा.
पेठकरकाका, तुम्ही एकदा इकडे याच.. तुमच्यासाठी खास ट्रेक ठरवू.. :)
- पिंगू
कुठं अंधाराचं जाताय?
__/\__
एखादी आज्जीबाईने बटवा, पायाला चोळायचे तेल, रक्तचंदन, लिमलेट्च्या गोळ्या.. गेलाबाजार एखादी मुळी तरी दिली असती उगाळून लेप लावण्यासाठी. नाहीतर तू..
;-)
शिकावू नववाहनचालक श्री सूड..
मिपापेक्षा चेपू वर जास्त अॅक्टीव्ह असणारे माननीय सुहासचंद्र झेलेसाहेब..
माननीय श्री रा रा सूर्यपूत्ररावजी साहेब..
म्हशीचा टोणगा श्री वपाडाव..
AMK ला तसल्याच म्हशीचा आणि रेड्याचा टोला खाता खाता बचावलेले श्री सागर दादा..
लाल टोपी आनंदाने घालून घेतलेले (पक्षी- Redhat Employee) पिंगूशेठ
ट्रेकचा प्लॅन खालीलप्रमाणे,
स्वारगेट ला रात्री ०८:०० ला जमायचे.
स्वारगेट ते कात्रज जुना बोगदा PMT ने - बस कोणती / कशी / किती वाजता आहे अजून कळायचे आहे.
कात्रज जुना बोगद्याला पोहोचून चालायला सुरू करायचे.
पहाटे / सकाळी सिंहगडावर पोहोचणे - ज्यांना सिंहगड बघायचा असेल ते नितीन व चिराग बरोबर जावू शकतात - मी मागे थांबलेले मेंबर (कोणी असेल तरच) गोळा करत अतकरवाडी / वाटेवरच्या गावात थांबेन. फायनल टीम सिंहगड बघून आली की त्यांच्यासोबत पुण्याकडे - जर कोणी मेंबर वाटेत थांबलेच नाही तर मी पण सिंहगडावर येईन.
सोबत बाळगायच्या गोष्टी,
टॉर्च - स्पेअर सेल सकट
कमीतकमी २ लिटर पाणी
रात्रीचे जेवण आपापले.. आपल्या सोबत.
ग्लुकोज पावडर / ग्लुकॉन D (बरोबर असुदे)
स्नॅक्स / न्युट्रीशीयन बार - ज्याला हवे त्याला.
स्पोर्ट्स शूज फुलपँट आवश्यक.
पेन बाम / स्प्रे - शक्यतो लागणार नाही पण बरोबर असुदे.
बाकी ट्रेकला आवश्यक त्या गोष्टी एका भक्कम सॅकमध्ये.
स्वारगेट ला PMT मध्ये बसल्यानंतर कोणतेही दुकान मिळणार नाहीये, त्या तयारीने रहा.
सोबत विडी-काडी / रंगीत द्रव्य आढळल्यास ती वस्तू अथवा बाळगणारा दोन्हीपैकी एकाला कात्रज येथेच "जय महाराष्ट्र" केला जाईल.
आणखी काही माहिती हवी असेल तर बोला..
(मुद्दाम इथे प्रतिसाद देत आहे.. आणखी कोणी येणार असेल तर ही माहिती वाचून सरळ स्वारगेट ला भेटले तरी चालेल.)
म्हणजे विडी-काडी अथवा रंगीत द्रव्य तुमच्यासोबत व या वस्तु कात्रजपर्यंत घेऊन येणार्यास "जय महाराष्ट्र" असे का? ;)
काडी म्हणजे नेमकी कुठली?
काडेपेटीतील काडी, दर्भाची काडी, काड्या लावणारे मित्र असल्यास त्यांनी लावलेली काडी, दात कोरायची काडी, कानात घालायची काडी यापैकी नक्की कोणती हे स्पष्ट होईल काय?
श्रीयुत मोदक यांची वरील प्रतिक्रिया वाचून त्यांना आजपासून 'मिपाचे नारायण' अशी पदवी प्रदान केली जात आहे ऽऽऽऽ!!
समस्त गावकर्यांनी नोंद घ्यावी.. ड् ड् ड् डंगऽऽऽडंग ऽऽ डंग ऽऽ !!!
थांबा..... ढॅण्ण्ण्ण्ण्!
(हे पाच वेळा म्हणावं वेगवेगळ्या अँगलनं)
'मिपाचा नारायण' ही पदवी मा. ना. किसन शिंदे यांना आधीच दिली गेली आहे. आणि ही पदवी मोदकला देता येणार नाही.
श्विक .... फिश्विक.... खिश्विक!
सांभाळून हो यकू... मला नारायण करून Unlimited Access देतो आहेस.
तस्मात्...
मंगलाक्षता सुरू असताना पाटाखाली फटाका फुटल्यास...
गळ्यातील फुलांच्या हारावर निशीगंधासोबत तपकीर / शिंकरी आढळल्यास...
सनई वादन सुरू असताना अचानक स्पीकर वर "Many Many Happy Returns" हे गाणे लागल्यास...
मो S S S S S ठ्या गिफ्ट बॉक्समध्ये लिमलेट ची गोळी सापडल्यास...
अचानक पैज लावून जेवणार्या मंडळीमुळे जेवण संपल्यास...
आणि
बायकोच्या गळ्यात बांधायच्या काळ्या दोर्याला आधीच मारलेली घट्ट गाठ आयत्यावेळी सोडवता न आल्यास..
मी जबाबदार नाही. :-D
लग्नानंतर काय काय होवू शकते ते व्यनीत बोलूया.. ;-)
खिशात पंचांग आहे ना? ;-)
मुहूर्त मिळतोय का पहा ;-)
बाकीची पण बरीच कामं करायचीत तुम्हाला
तुम्ही आधी चोळखण आळीत जाऊन या ;-)
आणि हो, त्या गोणेश्वर छापखान्यावाल्याकडे जाऊ नका ;-)
माणसे ठेवलीत या सगळ्या कामांना... किती दिवस ब्लू कॉलर वर्कर रहायचे..? प्रमोशन नावाची गोष्ट हाय का नाय..?
खास मित्रांची लग्ने (सर्वांनाच) अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही जातीने लक्ष देतो.. :-D
@सोबत विडी-काडी / रंगीत द्रव्य आढळल्यास>>> म्हणजे पान/तंबाखू चालेल तर.....! ;-) मायला...मग येता येइल की माला ;-)
>>सोबत विडी-काडी / रंगीत द्रव्य आढळल्यास ती वस्तू अथवा बाळगणारा दोन्हीपैकी एकाला कात्रज येथेच "जय महाराष्ट्र" केला जाईल.
मला ही अट माहीत नव्हती.... :P
-सूर्यपुत्र.
सूर्यपुत्रा.. अजून विचार कर..
वीकेंडला "बसायची" निकड असेलच तर ट्रेकहून आल्यावर तुला कोणत्याही बारमध्ये "Thums up on the Rocks" सकट कंपनी देतो.
ट्रेकमध्ये केलेल्या गमती जमती / किस्से तिथेच सांगतो तुला. :-)
'बसायची' निकड नंतर भागवू म्हणतो... :)
-सूर्यपुत्र.
आता येणार नाही पण पुढ्च्या ट्रेकला यायचे झाल्यास आताच इचरीन म्हंतो -
कानातील मळ काढायची काडी व ओव्याची बिडी तसेच रंगीत वाळा व संत्रा सरबत चालेल का ? की त्यालाही जय महाराष्ट्र ???/
>>सोबत विडी-काडी / रंगीत द्रव्य आढळल्यास ती वस्तू अथवा बाळगणारा दोन्हीपैकी एकाला कात्रज येथेच "जय महाराष्ट्र" केला जाईल.
त्यापेक्षा "कात्रज येथेच त्याचा कात्रज केला जाईल" म्हणा ;)
शुभेच्छा हो सगळ्यांना. वृतांत टाका.
बाकी कधी KS2 वैग्रे पण भरवा, आम्ही पण येऊ की उत्साहाने.