पाककृती

वालाच्या शेंगा अन चपात्या

Primary tabs

राम्राम मंडळी... स्पा सारख्या आमच्या पाड्यावरच्या नवशिक्या होतकरु मित्रांसाठी ही पेशल पा कृ: वालाच्या शेंगांची रस्सा भाजी अन घडीच्या चपात्या. साहित्य : १) वालाच्या शेंगा ( नीट निवडुन , नाकी काढुन , कापुन) ( इकडे मिळतात तशा , पणं आमच्या मातोश्रीनी नीट साफ करुन वाळवुन डबा भरुन दिलाय. त्या शेंगा मी कुकर मध्ये वाफवुन घेतल्या) २) २ हिरव्या मिरच्या ३) १ मोठी लसुण पाकळी ४) मुठभर शेंगदाणे ५) १ जुडी कोथिंबीर ( निवडुन ) , कोण रे तो कोथिंबीरीच्या काड्या बोलला तो. नको असलेल्या काड्या आमच्या बिका ला द्याव्यात. ६) १ चमचा तेल , फोडणी साठी ७) हिंग-जिरे-मोहोरी-हळद इ. ठेवलेला मसाल्याचा डबा. ८) मीठ कृती: वालाच्या शेंगा कुकर मध्ये शिजवायला लावा , अन तोवर चटणीची तयारी करा. प्रथम २ हिरव्या मिरच्या अन मुठभर शेंगदाणे भाजुन घ्या. Image removed. तिकडे कुकरच्या २ शिट्या झाल्या की कुकरच्या खाली असलेला गॅस बंद करा. कोथिंबीर , भाजलेल्या २ हिरव्या मिरच्या अन मुठभर शेंगदाणे , लसणाची पाकळी मिक्सर मध्ये टाकुन चटणी करुन घ्या. Image removed. एका कढईत थोडे तेल तापवायला ठेवा, तेल तापले की हिंग-जिरे-मोहोरी याची फोडणी द्या. अन मग त्यात चटणी + हळद टाका. हे सगळे मिश्रण चांगली एकजीव होईल अशा पद्धतीने चमच्याने / कलथ्याने ठवळत रहा. Image removed. २-५ मिनिटात हे चांगले परतले गेले की चटणीच्या रिकाम्या भांड्यात थोडे पाणी टाकुन ते भांडे चांगली विसळुन घ्या , तेच पाणी भाजीत वापरता येईल. तिकडे गार झालेला असेल कुकर. तो उघडा अन त्यातल्या शेंगा कढईत टाका अन गॅस मोठा करुन वरुन झाकण ठेउन द्या. भाजीला चांगली उकळी आली की गॅस बंद करुन टाका. Image removed. आता भाजी चांगली शिजेपर्यंत चपाती साठी कणीक भिजवायला घ्या. ज्यांना चपाती जमणार नसेल त्यानी यापुढील भाग ऑप्शनला टाकला तरी चालेल असे लोक मौ भाताबरोबर ( स्पा ऐकतोयेस ना :-) ) ही भाजी खाउ शकतात. तर , एका स्वच्छ ताटात कणीक घ्या , प्रमाण : ४ पोळ्यासाठी साधारण पणे ५-६ मुठी कणीक पुरावी असा माझा अंदाज. Image removed. थोडे थोडे पाणी टाकत ही कणीक भिजवा. Image removed. चांगली तिंबवा कणीक ;-) , त्यासाठी आपण बॉसला चांगले बुकलुन काढतोय अशी कल्पना करा. Image removed. मग त्या तंबलेल्या कणकेचे साधापण टे टे चे चेंड्युच्या ( पिंग पाँग बॉल ) आकाराचे गोळे करा अन त्यांना कणकेत लडबडुन घ्या. ( छ्या ... दमलो ब्वॉ टंकुन टंकुन , लोक मेगाबाय्टी प्रतिसाद कसे टंकतात बुवा ? ) तर ... Image removed. ह्या गोळ्याला पोळपाटावर ठेवुन पुरीच्या / लंबगोलाकृती आकारात लाटुन घ्या. Image removed. ह्या आकाराला दोन बोटांनी खालील प्रमाणी फुलपाखरा सारखा आकार द्या. Image removed. मग हे २ भाग एकावर एक ठेवुन कडा चांगल्या जुळवुन घ्या. Image removed. एककडे गॅस चालु करौन त्यावर तवा तापायला ठेवा. चार पदरी पोळी पायजेल का , तर मग अजुन एक घडी मारा. Image removed. बनलेल्या या आकाराला पुन्हा एकदा कणकेत लडबडुन घ्या , म्हणजे चपाती लाटताना पोळपाटाला चिटकणार/चिकटणार नाही. लाटण्याने पोळी लाटा. Image removed. चपाती चांगली गोल जमली की नै ? मग .. सोप्प आहे ते. Image removed. दुसरी चपाती लाटता लाटता , तव्यावर टाकलेली चपाती अधुन मधुन उलटत रहा. दोन्ही बाजुन चपाती चांगली शेकली गेली पाहिजे. Image removed. अशा पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या चपात्या करुन घ्या. एका ताटलीत भाजी अन ताटात चपात्या घ्या , लॅपटॉप वर एखादा झकास पैकी पिक्चर लावा अन ओरपा. Image removed. समाप्त.. ;-)
शुचि

हाहा ज्यांना त्रिकोणी घडीच्या पोळ्या येत नाही त्यांनी फुलपाखरी घडीच्या कराव्यात ;) ......... आम्ही तर बुवा त्रिकोणी घडीच्या करतो.

ती चटणी खतरनाक आहे. भाजीत घालण्याआधीच संपेल.

"मौ" शब्द वाचून ड्वाले पाणावले.

कुंदन

प्रयत्न करुन बघा शुचितै , नुसती चटणी आणि चपाती करण्यापुर्वी असलेला कणकेचा गोळा हे कॉम्बिनेशन कसे लागतेय आठवणीने कळवा.

रेवती

भाऊजी, पोळी मस्तच जमलिये. अगदी गोल गरगरीत.:)
भाजीचे फटू असे लांबून का काढलेत?
आणखी तोंडीलवणे म्हणून शिनेमा लावायचा का?;)

कुंदन

>>भाजीचे फटू असे लांबून का काढलेत?
माझा स्मार्ट फोन भाजीत पडु नये म्हणुन ...
पुढच्या वेळी दुसर्या स्मार्ट फोन ( Sony Ericsson-Xperia Arc ) ने अधिक सुस्पष्ट फोटो काढु.

यकु

____/\___!!!

आज पुरले नवस, धन्य काळ हा दिवस.

स्पाचं ठिक आहे ( तो काहीही किडे करतो ;-) ) , पण कुंदनराव स्वयंपाक घरात शिरले म्हणजे आजवरचे 'स्वयंपाक येणारा/री किंवा न येणारा/री नवरा-बायको, 'स्त्री मुक्ती, 'आयटी वाईफ' समस्त धागे सार्थकी लागले. :p :p :p
चलो, पराषेठ बोला आता तुम्ही काय करुन दाखवता ? ;-)

भाजीची रेसीपी छान....वाटण ही मस्त झाले आहे....
पोळ्याही छान जमल्यात....(.कशाची तयारी आहे ही,) :p

स्पा

चामारी बिस्कुट
कुंदन
लैच रे म्हणजे हे ..... :D

चटणी जबर्या दिसतेय ..
पोळ्या पण मस्त गोल गोल... :)
आता इकडे पाड्यावर आलास कि जरा २ आठवड्यांचा क्र्याश कोर्स घे बाबा जरा ;)

सहज

लॅपटॉप ऐवजी मोठ्या स्क्रीनवर पिक्चर पाहत ओरपल्यास चव बदलेल का? कुठले प्रमाण कमी जास्त करावे का?

हम्म दोन , तीन हिरव्या मिरच्या... चला आता इथे पिक्चर शोधला पाहीजे. "हरियाली और रास्ता" युट्युबर आहे का?

कुंदन

त्याऐवजी तुम्ही हे का ट्राय करत नाही ?
एका ग्लासात एनो घ्या , त्यात पाणी टाका अन लॅपटॉप ऐवजी मोठ्या स्क्रीनवर पिक्चर पाहत ओरपा. ;-)

कुंदन, चपात्या आवडल्या. चार पदरी पोळ्या इतिहास जमा होत असतांना त्याचे सूक्ष्म पदर उलगडून सांगितल्यावर कंठ कसा भरुन आला. :)

वालाच्या शेंगाची रस्सा भाजी आणि चपात्याचे फोटो आवडले. अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

५० फक्त

मला तर मुळात शेंगाच दिसल्या नाहीत, नुसती चटणीच दिसली परतलेली. असो.
वाल म्हणजेच बिरडं ना, डोंबिवलीअला मानपाडा रोडवर एका पोळी भाजी केद्रात यांची उसळ खाल्लेली आहे जाम भारी होती.

स्पा

डोंबिवली अला

तुम्हाला डोंबिवलीला म्हणायचं आहे का ?

- ७५ फक्त

पैसा

लै झ्याक! भाजी टेस्टी असावी असा अंदाज आहे, आणि पोळ्या तर अशा झाल्यात की वा! मस्त! फक्त या वेळेला क्रमशः का नाही?

रमताराम

'तिकडे' कोथिंबीर मिळते वाट्टं.
खाण्याचा आस्वाद घेताना ल्यापटॉप समजू शकतो, पण चटणी बनवताना तिथे ल्यापटॉप का आहे? की त्यावर पाकृचा लाईव डेमो वगैरे चालू होता नि इकडे तुम्ही त्याबरहुकूम चटणी बनवत होतात? ;)

चपाती मस्त गोऽल जमली आहे. बहुतेक गृहिणींनादेखील इतका अचूक आकार जमेल की नाही शंकाच आहे. (पळतो आता.)

सूड

भाजी झकासच झाली असणार, प्रश्नच नाही. पण पोळ्या म्हणजे हल्लीच्या पोरींच्या तोंडात मारतील अशा गोलगरगरीत लाटल्यात. ;)

कुंदन

म्हणजे त्याचे असे आहे , पोळीचा आकार अंमळ वेगाळाच होता.
त्यावर ती ताटली आहे ना ( नंतर त्यात भाजी घेतली) , ती पालथी मारली. ;-)

मला वाटलेच होते पोळीला आकार दिल्या गेला आहे म्हणून.

पाकृ छान जमली आहे रे कुंदोबा.

बाकी 'तिकडे कुकरच्या २ शिट्या झाल्या की कुकरच्या खाली असलेला गॅस बंद करा.' ह्या अप्रतिम सल्ल्याबद्दल धन्यवाद.

sneharani

ते आम्हाला कळालच, मुळात इतकी गोल चपाती आलीच कशी?तेव्हा चपातीचा फोटो निरखून पाहिला अन् मग गोल चपातीच गुपित कळालं! ;)
बाकी पाकृ. छानच!मस्त!!
:)

पियुशा

पण पोळ्या म्हणजे हल्लीच्या पोरींच्या तोंडात मारतील अशा गोलगरगरीत लाटल्यात.

त्या पोळ्या पाहुन डाऊट आलेलाच होता ;)
त्यावर ती ताटली आहे ना ( नंतर त्यात भाजी घेतली) , ती पालथी मारली
सुडा हे वाचलस ना ?

सूड

>>सुडा हे वाचलस ना ?
वाचलं की !! पण तुला नक्की काय खटकलंय 'गोलगरगरीत लाटल्यात' म्हटलं ते की 'हल्लीच्या पोरींच्या तोंडात मारतील अशा गोलगरगरीत लाटल्यात' म्हटलं ते ? म्हटलं प्रतिक्रिया टंकण्याआधी हे सपष्ट करुन घ्यावं. ;)

गणपा

भाजीतल्या शेंगा दिसेच ना राव. आणि त्या उकडुन कशापायी घ्यायच्या त्यांचा लगदा नाही का व्हायचा?

बादवे आपकी पोळी के गोल आकार का रहस्य क्या है?
मनीच्या बाता : घे मेल्या शिक कुंद्या पासुन काही?

कुंदन

गणप्या , लेका तुम्हा तंगड्या तोडणार्‍यांना शेंगा शिजवल्या काय अन नाही शिजवल्या काय , काय फरक पडतो.
शिजवायच्या यासाठी की स्पा सारख्या मौ भात्-मेतकुट खाणार्‍यांनाही खाता याव्यात म्हणुन.

स्पा

स्पा सारख्या मौ भात्-मेतकुट खाणार्‍यांनाही खाता याव्यात म्हणुन.

कुन्द्र्या हाड मौ करू का?
ये आता परत इथे...
नाय पोकल बांबूचे फटके दिले ना..

नाना चेंगट

आता कळळ तु दुबैत हाटीलात नोकरीला आहेस

कुंदन

त्याच हाटीलात रे , आधी तु होतास ना त्याच.
मॅनेजर सायेब बोलत होते , नान्या होता इथे , मंदी बरोबर गेला इथुन. ;-)

सुहास..

ते पण शेफ च्या हाताखाली ;)

( म्हणुन हाफुस च्या नावाने रडत असतो ;) खातय मार आज ! )

नाना चेंगट

मग काय आता पर्यंत फक्त वाट्या मारुन मारुन पुरी बनवत होता.

कालच म्हणे त्याला भाजी करायला शिकवली तर लगेच धागा काढून टॅव टॅव करतंय

नेहरिन

शेंगांची पेस्ट केली का ???? कुठे दिसतच नाहित शेंगा.

नेहरिन

शेंगांची पेस्ट केली का ???? कुठे दिसतच नाहित शेंगा.

बाकी भाजी छान आहे .

कुंदन

>>कुठे दिसतच नाहित शेंगा
टाकलेल्या हो वालाच्या शेंगा पेस्ट न करता. त्या कॉपी होउ शकत नाहित , तस्मात त्यांची पेस्टही नाही. ;-)

पुण्यात मिसळ खाता तेंव्हा पोहे दिसतात का त्या फरसाणाखालचे , नाही ना ? ;-)

स्मिता.

वालाच्या शेंगांची भाजी मस्त दिसतेय, पाहून तोंपासु. अशी हिरव्या चटणीची भाजी आमच्या खान्देशात बर्‍याच वेळा केली जाते.
बाकी लाटलेल्या पोळीचा आकार बघूनच कळतंय की तो आकार ताटलीमुळे आलाय ;)

कुंदन

>>अशी हिरव्या चटणीची भाजी आमच्या खान्देशात बर्‍याच वेळा केली जाते.

मग पा कृ टाकण्यासाठी आपण कोणाची वाट बघत होतात ? ;-)
मागे दिपालीला पण बोललो होतो मी आपल्या खान्देशात करतात त्या चटणीवाल्या भाजीची पा कृ टाक म्हणुन.

कुंद्या बाकी कसाही असला तरी स्वैपाक उत्तम करतो. तेवढ्या एका गुणामुळे चांगल्या घरी पडला हो!

- (कुंद्याच्या हातचं जेवलेला)

कुंदन

>>स्वैपाक उत्तम करतो
धन्यवाद रे बिप्स.
फक्त तिकडे घरी काडी टाकु नका ही , नाय तर ४-८ दिवस सुट्टीला आल्यावर स्वैपाक पण करावा लागेल घरी. ;-)

दाणे लावून भाजी... मस्तच एक्दम, सोबत कैरीचं गोड लोणचं आणि पापड- बिबडे असले की कसला झकास बेत जमतो.
चपात्या काय भारी आल्यात.

हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कोथींबिर, लसूण चटणी घालून केलेली शेंगांची भाजी चविष्ट 'दिसते' आहे. मलाही प्रश्न पडला की शेंगा कुकरला का लावाव्या लागतात? त्या पेक्षा चटणी परतल्यावर थेट कढईत/पातेल्यात घालून वाफेवर शिजवल्या तर भाजी जास्त चांगली होईल.

कणकेत मोहन (तेल) घातलेले नाही त्याच प्रमाणे घडीच्या आतही तेल लावलेले नाही. अशाने वातड होतील पोळ्या.

कुंदन

खाली अदिती ने सांगितल्या प्रमाणे मी चपात्या वातड होण्यापुर्वीच संपवतो.
आधी भाजी तयार करुन ताट वाढुन ठेवतो , पुरेश्या चपात्या बनविल्या की लगेच ओरपायला सुरुवात करतो.

कुंदन, पुढच्या वेळेस ताटली मारताना डैरेक तव्यावर मार. म्हणजे समजा पोळी/चपाती पोळपाटाला चिकटलीच तरी ते आमच्यासारख्या काडेचिराईतांना समजणार नाही.
पेठकर काका, असल्या डाएट चपात्या बनवल्यावर लगेचच चापायच्या, म्हणजे वातड होईपर्यंत त्या शिल्लकच रहात नाहीत.

आता इथे निवडलेले वाल नाहीतर आई शोधणे आले.

स्मिता.

अय्या, तुमच्याकडे वाल मिळत नाहीत का?? आमच्याकडे तर मिळतात बै ;)

आम्ही काय, वाल निवडून देणार्‍या प्रत्येक व्यक्तीस आई म्हणू हो! पण आमच्याकडे मेलं दाण्याचं कूट आणि पोह्याचे पापडही मिळत नाहीत. निवडलेले वाल कुठून मिळणार?

आम्ही काय, वाल निवडून देणार्‍या प्रत्येक व्यक्तीस आई म्हणू हो! पण आमच्याकडे मेलं दाण्याचं कूट आणि पोह्याचे पापडही मिळत नाहीत. निवडलेले वाल कुठून मिळणार?

काय गं ए हिह, तुला तुझ्या घरात स्वयंपाकघर कुठे आहे ते तरी माहिती आहे का ?

सुहास..

तुला तुझ्या घरात स्वयंपाकघर कुठे आहे ते तरी माहिती आहे का ? >>>

आधी 'स्वयं'पाकघर ,म्हणजे काय हे विचारायला हवे होते परू बाळ ;)

©º°¨¨°º© नखरा ©º°¨¨°º©

व्यवहारातली व्याख्या: घरातली कर्ती, पुरूष माणसं हमखास सापडण्याचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर.
किंवा
पुस्तकी व्याख्या: जिथे चणे, दाणे, कुरमुरे, वेफर्स, चिवडा वगैरे सापडतात त्याच्या आजूबाजूच्या जागेला स्वयंपाकघर असे म्हणतात.

व्यवहारातली व्याख्या: घरातली कर्ती, पुरूष माणसं हमखास सापडण्याचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर.
किंवा
पुस्तकी व्याख्या: जिथे चणे, दाणे, कुरमुरे, वेफर्स, चिवडा वगैरे सापडतात त्याच्या आजूबाजूच्या जागेला स्वयंपाकघर असे म्हणतात.

__/\__
श्राद्धाच्या जिलब्यांचे तुकडे अ‍ॅड करायचे राहीले गं. आणि आता तू हिरव्या देशात गेल्याने कोक चे कॅन्स, पिझ्झाचे बॉक्सेस, बर्गर खालचे टिश्युज इ. इ. पण यादीत अ‍ॅड करा.

बाकी कर्त्या पुरुषाविषयी सहानुभुती आहेच आणि राहील. काय पाप केले होते बिचार्‍याने काय माहिती.

असो...