फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष
Primary tabs
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या रांगोळ्या :-)
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
या वेळच्या रांगोळ्यांमधे गेल्या दोन महिन्याच्या सिझन मधे काढलेल्या सर्व रांगोळ्या आहेतच. परंतू त्यातल्या स्पेशल आणी वेगळ्या आहेत त्या अधी डकवल्या आहेत... सप्तपदीच्या रांगोळ्या आणी काही स्पेशल ,वेगळ्या अगदी भरपूर वेळ देऊन काढलेल्या रांगोळ्यापण या वेळच्या भागात आहेत. आणी तश्याही सप्तपदीच्या दोनच आहेत...कारण दरवेळी त्यासाठी लागणारा वेळ,तसं काम करवून घेण्यास उत्सुक असलेला ''यजमान'' ...हे सगळच गणित जमतं असं नाही...कारण १ सप्तपदीची रांगोळी(गालिचा) काढायचा म्हटला तर...अदल्या दिवशी मार्केटयार्डातून फुलं घरी आणणे- १तास+ वेगवेगळ्या फुलांचं कंटींग-४ ते५ तास+ दुसर्या दिवशी(लग्न दिवशी) कार्यालयात मुहुर्त कितिचा आहे हे पाहुन ,,,त्याप्रमाणे अगदी कधी कधी पहाटे ५ वाजल्यापासून...सप्तपदी काढायला लागणारा वेळ ३ ते ४ तास= सगळे मिळून सात ते नऊ तास इतका वेळ या एका सप्तपदीला मोडतो...(अगदी पावला गणिक १तास असं म्हणायलाही हरकत नाही :-) ) त्यामुळे सप्तपदीच्या रांगोळ्या दोनच आहेत.... बाकिच्या नेहमी प्रमाणे.. :-)
१)सप्तपदी...

शेवटचा हात मारताना...
अता चालवली पहा वधू....... ''ईषे एकपदी भव.....''
शेवटच्या सातव्या पदी... सखा सप्तपदी भव...।
२) घरी येणार्या नव दांपत्यासाठी पायघड्या...


३)घरी प्रवेश केल्यावर-नामलक्ष्मी पूजना साठी... स्पेशल रांगोळी


४)आता इथुन पुढे नेहमीच्याच पुजेच्या आहेत..पण तरिही स्पेशल आहेत.. :-)











आणी आता दी ऐंड विथ लव्ह स्मायली

यावेळेसचे सगळे फोटो--- सॅमसंग प्राइमो मोबॉइल कॅमेरा... :-)
झकास.. एकदम झकास......
अत्रुप्त आत्मा साहेब, निवळ्ळ लाजवाब.
कौतुक करायला शब्ब्दही अपुरे आहेत.
निवळ्ळ लाजवाब.
निवळ्ळ लाजवाब.
निवळ्ळ लाजवाब.
सेम टू सेम !
लैच भार्री.
एक निरागस प्रश्न: ते त्या पायर्यांवरच्या फुलांवरुन चालत कुठे जाणार आहेत?
@ते त्या पायर्यांवरच्या फुलांवरुन चालत कुठे जाणार आहेत?>>> त्यांच्या स्वतःच्या घरात...
अरे हो...आता कळलं असं का वाटलं..ते..? फोटू वरच्या मजल्यावरुन घेतला...त्यामुळे वरुन खाली जाण्यासाठी असा भास होत असेल... पण तसं नाही...हो यक्कूशेठ ... खालच्या पायरीवरुन वर त्यांच्या घरात जाण्यासाठी असं ..आहे हो ते..सगळ :-)
निव्वळ लाजवाब!
@ पप्या,
लग्न कर आता.
अरे सत्यनारायणाची पूजा आहे घरी लग्नानंतरची.
पायर्या चढून सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा.
कळ्ळं???? :)
सत्य नारायणाची पुजा म्हणे ! :p
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!:p
जागरण गोंधळ ?
आधी पूजाच.
(ही ती अथवा ती ही नव्हे. सत्यनारायणाची.)
नंतर काय जो गोंधळ बिंधळ, जागरण जे काही असेल ते! ;)
इयत्ता ६ वीत उत्तर दिलंय सगळ्यां समोर. घाबरतो का काय कुणाला! ;)
काकाच्या लग्नाचा वाढदिवस होता.
कुणीतरी म्हणे आज ह्यांच्या मीलनाला अमुक अमुक वर्षे झाली.
मी म्हटलं असं कसं? आधी पूजा मग..... :)
निरागस होतो हो तेव्हा.! :) :)
सॉल्लिड.........
शब्दच अपुरे पडत आहेत तुमची स्तुती करायला.
चला आता इकडे फुले शोधणे आले
भटजीबुवा, लाजवाब रांगोळ्या..
- पिंगू
सगळ्याच पुष्पवल्ल्या खास आहेत!
मस्तच हो.सगळी काटे नसलेली फुले.
कसल्या सुंदर आणि रेखीव रांगोळ्या आहेत! नवदांपत्यांच्या पायघड्यांची सजावट तर फारच आवडली, तसंच बाकीच्या स्पेशल रांगोळ्याही स्पेशल्लच.
भटजीबुवा, या रांगोळ्या बघून यजमान आणि देवबाप्पासुद्धा अगदी प्रसन्न होत असणार :)
झक्कास. गुर्जींनी आता हनीमूनसाठी बेड सजवण्याचे तेवढे बाकी ठेवलेले दिसतय.
रांगोळ्या लैच दिलखेचक १० पैक्की १२ मार्क. :)
@गुर्जींनी आता हनीमूनसाठी बेड सजवण्याचे तेवढे बाकी ठेवलेले दिसतय. >>> काही यजमान इचारतात ,ती पण सुपारी घेतो. ;-)
ही पुढल्या धाग्याची नांदी का? ;)
@ही पुढल्या धाग्याची नांदी का? >>> :-D गंपा... आमचा नंदी करायचा इचार हाय काय..? ;-)
सु आणि रे आणि ख.
आपल्याला बुवा इतक्या सुंदर कलाकृतीवर पाय द्यायला आवडला नसता. :)
मस्तच
छानच !! बाकी वरुन पाचव्या फोटोत फुलांवर चालणार्या त्या बै पाहून फुलांची दया आली. ;)
+१.
भटजींना नम्र विनंती किमान वर वधु यांच्या आकारमानाकडे पाहुन फुले निवडावीत अशी नम्र विनंती. किमानपक्षी सुर्यफुल वगैरे जरा सहनशक्ती असलेली फुलं निवडत चला भटजी.
बाकी, तुमच्या कलाकारीबद्दल वादच नाही, उत्तम उत्तम आणि उत्तमच.
गुर्जी... अप्रतिम कला आहे तुमच्यात
एकूण एकूण फुलांची रचना आवडली
आणि प्रत्येक वेळी वेगळ डिझाईन
__/\__
त्रिवार प्रणाम
बाकी सूड आणि ५० शी सहमत, मॉडेल वेगळ वापरायला हव होतंत असो
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
ढिस्क्लेमर देत जा हो पन्नास फक्त.. मरायची पाळी आली हसून हसून
+१
मला तर ते सासूसासरेच वाटले पहिल्यांदा.
पण रांगोळ्या सुरेखच!
:) :) :) :) :)
आमचा सलाम घ्या गुरुजी!
शॉलिट्ट ! :)
लय भारि ..
कसला हौशी आहे तो नवरा ..मस्तच .. :)
ती पायर्या पायर्या वर तर रांगोळीची पायघडी ......कसल सुरेख वाटतय ..दिल्खुश एकदम ....
काश ......:(
_/\_
अप्रतिम कलाकारी हो बुवा.
क्लास सुरू करून शिष्य घडव रे.. नाहीतर स्वतःच्या लग्नात मुंडावळ्या सांभाळत फुलं रचत बसावे लागेल. :-D
(तिथेपण स्माईली सोडल्या नाहीस रे बुवा..)
@(तिथेपण स्माईली सोडल्या नाहीस रे बुवा..) >>> :-D काय करणार? मी त्यांना सोडतो रे,पण त्या मला सोडत नाहीत... ;-)
+१.. हे मात्र अगदि खरे..:)
किमान यासाठीतरी घरी पूजा ठेवावी लागेल.
(आता फूल ना फुलाची पाकळी शोधणं आलं!)
बहोत बढिया... बहोत खूब... कल्पकता आणि रंगसंगती खूप आवडली....
अमृत
तुमच्यातली कला तुमच्या व्यवसायाला पुरक आहे!
उत्तम कलाकारी! सगळ्या रांगोळ्या आवडल्या
जबरदस्त ,रंगसंगती अप्रतिम साधली गेलिय :)
अहाहा.......... मानाचा मुजरा सरकार....... !!
डोळ्यांचं पारणं फिटलं........ :)
+१
अशक्य सुंदर कला आहे तुमच्या हातात.
ही कला अशीच बहरत रहावो ही देवाजवळ प्रार्थना
वाव्व....ह्या रांगोळ्या स्वप्नवत वाटत आहेत. सुंदर, अप्रतिम,सुरेख, ....... आणखी शब्दच आठवत नाहीत.
सुंदर आहेत या फुलांच्या रांगोळ्या. :)
फुले * सुद्धा आप्ल्या सुबक रांगोळीने त्रुप्त झाली असतिल..
फुले = आडनाव म्हणुन नाही.
खुप खुपच सुंदर आहेत सगळ्या रांगोळ्या.
सुरेख............अप्रतिम...........रंगसंगती झकास......:)
अत्यंत मनोहारी रांगोळ्या आहेत! डोळ्यांचे पारणे फिटले! :)
(फूलप्रेमी)चतुरंग
अ.आ. अजून एक चांगला (कमीत कमी स्माइली असलेला ;)) धागा आवडवला.
:)
जमल्या आहेत रांगोळ्या. फारच छान
एकदम सुबक, सुंदर पुष्परांगोळ्या गुर्जी.. लाजवाब..
सुरेख....अगदी सुरेख आहेत पुष्प रांगोळ्या!!
:)
अप्रतिम आहे कला.
जबरदस्त कलाकारी. :)
मस्त आणि जबरदस्त रांगोळ्या . सुंदर.
धाग्यावर आलेल्या/प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार :-)
आत्तापर्यंत गुर्जींनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या मध्ये या रचना सगळ्यात उजव्या वाटल्या. तुमच्या चिकाटीची दाद द्यावीशी वाटते :)
+१
नमस्कार, मी ह्या सन्केतस्थळावर नवीन आहे. मला ह्या धाग्यावरचे फोटो दिसत नाहित. मदत करा.
परत गंपादादाला त्रास द्यावा लागणार ...
भारी...
मस्तच!!!
सुरेख !!!
अतृप्तआत्मा, तुमच्यातल्या कलावंताने अशीच आपली कला जगापुढे दाखवत ठेवावी. धन्यवाद.
अप्रतिम..... डोळ्यांचे पारणे फिटले....:)
अप्रतिम कला.
आवडली :-)
मस्तच...
फारच छान!
वाह!!! बह्होत खूब आत्मूस!!!!!! लयच भारी :)
ते वधूप्रमाणे फुलांचं जरा बघा हां काय बाकी ;)