Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

व
विसोबा खेचर
Wed, 06/18/2008 - 22:13
💬 62 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
36885 वाचन

💬 प्रतिसाद (62)
व
वरदा Wed, 06/18/2008 - 22:25 नवीन
वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला! खरं आहे... खूप सुंदर आहे रौशनी खरोखरच... अजून काय लिहू शब्द नाहीत्....पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 06/18/2008 - 22:53 नवीन
सहमत आहे. ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती .... खरोखरंच! तिचे फोटो आणि ए मालिक हे गाणे.. यामुळे थोडा चटका लागला मनाला.. कोण कुठे दैववशात जाउन पडेल याचा काही नियम नाही..असो !! पुढचे भाग वाचण्यास उत्सूक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
न
नंदन गुरुवार, 06/19/2008 - 00:07 नवीन
लिखाळरावांशी सहमत आहे. लगेच प्रभाव पडावा असं व्यक्तिमत्व आहे, यात काही शंका नाही. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मुक्तसुनीत Wed, 06/18/2008 - 23:03 नवीन
जोहार रोशनीबाईच्या अम्लान सौंदर्याला. जोहार त्यांच्या गाण्याला , जोहार तुमच्यातल्या रसिकाला - जो बाजारात शोधतो अस्सल गाणे , जो शरीराच्या बाजारात पाहू शकतो खानदानी आयुष्याची फरपट आणि सफर घडवतो वासनांच्या खातेर्‍यात फुललेल्या गाण्याच्या बागेची. आणि जोहार या आयुष्य नावाच्या गुंत्याला , ज्यात , हजारो मैलांवर बसून , कित्येक वर्षांपूर्वीच्या प्रसंगीच्या कुणाच्या मुद्रांच्या फोटोचे फोटो पाहून आणि शोकांतिकांना वाचून आमच्यासारख्या कुणाचा श्वास अडकतो !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/18/2008 - 23:29 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रियाली Wed, 06/18/2008 - 23:44 नवीन
रौशनी भाग ३:
चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती!
व्यक्तिचित्र हा तुमच्या हातचा मळ पण रोशनीचं वर्णन करताना कमी पडलात. बहुधा शब्दांत बांधण्यासारखं नसावंच ते. बाई अतिशय सुंदर आहे. मला चटकन तनुजा (समर्थ) आठवली. तडफदार आणि स्मार्ट, पण तनुजाही पन्नाशीच्या सुमारास अशी दिसत असावी का असा प्रश्न पडला. पन्नाशीच्या आसपासची आणि तरीही नितळ कांतीची, पातळ ओठांची, नाकी-डोळी रेखीव आणि ठसठशीत अंगाची रोशनी खरंच खूप सुंदर आहे. गळ्यात चेन, कानातील छोटेसे इअरिंग्ज, डाव्या हाताचे रिस्टवॉच, साडीचा रंग- टेक्श्चर इ. पाहून बाई खानदानी असावी असेच वाटते. व्यक्तिची आवड आणि पसंती कपड्यांवरून आणि राहणीवरून कळते. साधी पण तरीही टापटीपीची राहणी वाटली. आता ज्याप्रमाणे रौशनीचे वर्णन करण्यात कमी पडलात हे सांगितलं तसंच आणखी एक स्पष्ट सांगते - उपक्रमावर रौशनी आला नाही म्हणून तुम्ही खट्टू असता. कोणत्या माहितीपूर्ण शब्दांत तुम्ही लिहिणार होता ते? आणि काही गोष्टी भावनिक रसात सांगितलेल्याच शोभतात. त्यांची दाहकता माहितीपूर्ण लेखांतून उमजून आलीच तरी हृदयाला चटका बसेलच असे नाही. त्यासाठी शब्दांची पखरण लागते, भावनांचे बांध तोडावे लागतात. माहितीपूर्ण शब्दांत रौशनीला न्याय मिळाला नसता असे आज वाटून गेले. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 00:19 नवीन
व्यक्तिचित्र हा तुमच्या हातचा मळ पण रोशनीचं वर्णन करताना कमी पडलात. शक्य आहे, कारण ती प्रत्यक्षात क्लासच दिसायची! परंतु अगदी प्रथम मला जेव्हा मन्सूर तिच्याकडे घेऊन गेला होता तेव्हा तिच्या चेहेर्‍यात सौंदर्यासोबत करारीपणाही मला दिसला होता, जरबही दिसली होती. जरी तिनं मला बोलावलं होतं तरी प्रत्यक्षात तीदेखील मला प्रथमच भेटत होती. शिवाय ती ज्या जागेवर बसून कारभार हाकत होती ती जागा देखील जरब दाखवण्याचीच जागा होती. हे फोटू मी काढले तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा आमची एकमेकांशी बर्‍यापैकी ओळख झालेली होती. हा माणूस कसा आहे, काय आहे हे तिला बर्‍यापैकी माहीत झालेलं होतं, आमच्यात मोकळा संवादही प्रस्थापित झाला होता. शिवाय तिनं स्वत:हून मला मुजर्‍याला बोलावलं होतं. थोडक्यात, आम्ही एकमेकांशी बर्‍यापैकी फॅमिलियर झालो होतो. त्यामुळे तिला चेहेर्‍यावर जरब वगैरे ठेवायची काहीच आवश्यकता नव्हती/नसावी. परंतु प्रथम भेटीत परिस्थिती खूप वेगळी होती, माहोलही खूप वेगळ होता हा मुद्दा नाकारता येणार नाही. असो, तरीही तू म्हणतेस त्याप्रमाणे मी कमी पडणंही शक्य आहे. कारण विश्वास बसणार नाही इतक्या रुपाच्या अन् स्वभावाच्या अनेकविध छटा असणारं तिचं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे ते शब्दात मांडायला आजही मला अनेकदा कठीण जातं! बाकी, उपक्रमाविषयी मांडलेला तुझा मुद्दा पटला. रौशनीची भट्टी उपक्रमावर जमली नसती! सबब, उपक्रमाच्या मुद्द्यावर सपशेल माघार घेतो आणि पुन्हा हा विषय तिथे काढणार नाही असा तुला शब्द देतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 06/19/2008 - 01:59 नवीन
तात्या, रौशनीच्या चेहर्‍यावर जरब आणि करारीपणा असावा हे खरंच. बाई अतिशय स्मार्ट आहे. मी म्हणत होते तुम्ही तिसर्‍या भागात केवळ एवढंच लिहिलंत तिच्याबद्दल ते खूप अपुरं होतं हे फोटो पाहिल्यावर जाणवलं. उपक्रमाबद्दल तुम्हाला पटलं, त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 03:52 नवीन
प्रियाली शी सहमत !!!!!!!!!!!!!!!!!१
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 06/19/2008 - 03:52 नवीन
सत्य हे कल्पीतापेक्षाही अदभुत असते. इथे ते सुंदर, संगीतमय देखील आहे. मी मिपावर येण्याच्या पुर्वीचे असलेले पाचही लेख वाचलेले नव्हते. ते आता वाचून काढले. अप्रतीम. तात्याराव तुमच्या प्रतीभेची पुन्हा एकदा ओळख झाली. आता पुढच्या भागांसाठी सर्वांची उत्कंठा आणखी जास्त ताणलित तर काही मिपाचे कवी कदाचित गाणी तयार करतील.....ज्यातून आमची वेदना तुम्हाला कळेल! >>>वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/19/2008 - 04:27 नवीन
खरोखर किती सुंदर दिसते रौशनी!! अतिशय देखणी....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/19/2008 - 04:28 नवीन
तात्या, रौशनी सुंदर आहे, कितीतरी वेळ निरखत राहिलो. नियती माणसाला कुठे घेऊन जाईल याची शाश्वतीच नाही. रौशनी एक गाणं आहे, रौशनी एक सौंदर्य आहे, रौशनी एक खळखळता वाहणारा झरा आहे, रौशनी अनेक गुंत्यातला एक भाव आहे, आपल्या लेखनातून हे सर्व वाचायला खुप आवडते. आपली लेखनी भावनिक आंदोलने वाढवतात. अधिक काय बोलावे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!! - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 05:32 नवीन
सरांशी १००% सहमत. नियती माणसाला कुठे घेऊन जाईल याची शाश्वतीच नाही <अनुभवी > राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मानस गुरुवार, 06/19/2008 - 04:55 नवीन
तात्या फारच सुरेख वर्णन, आज सगळे पाच भाग सलग वाचून काढले. रोशनीच्या सौंदर्याची काय तारीफ करणार? शब्दच नाहीत. "उमराव जान" ची आठवण झाली. ती नक्की अशीच दिसत असणार. मार डाला ................
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 05:17 नवीन
मानसराव, कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही परंतु एकवेळ बॉलिवूडच्या अन् कुठल्या कुठल्या नट्या दिसायला अक्षरश: फिक्या पडतील अश्या काही सौंदर्यवती तवायफ आजही मुंबईच्या बाजारात आहेत. मी पाहिलेल्या आहेत! काही लक्ष्मीपतींना त्यांना लाख्खो रुपये देऊ करताना पाहिलं आहे. कशासाठी? तर शैय्यासोबतीसाठी! पैसा ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे बर्‍याचदा अशक्य गोष्टी अगदी सहज शक्य होतात. मान्य आहे! परंतु या खानदानी तवायफ बायांच्या बाबतीत पैशांचा जोर चालत नाही. बड्या बड्या शेठियांनी शैय्यासोबतीकरता केलेल्या लाख्खो रुपयांच्या ऑफर्स अगदी सहज धुडकावून लावणार्‍या काही खानदानी सौंदर्यवती तवायफ बायका आजही मुंबईच्या अन् लखनऊच्या बाजारात आहेत. यांचं फक्त गाण्याशी अन् मुजर्‍याशी इमान असलेलं माझ्या पाहण्यात आहे! कुणी पैशांचा जोर दाखवायला लागला की, "रख तेरे पैसे तेरीही पास. पैसोका घमंड हमे मत दिखा. तू चीज काय है? आज तक तेरे जैसे कितने आए और चले गये. चल फूट यहासे..!" अश्या शब्दात सणसणीत अपमान करायलादेखील मागेपुढे पाहात नाहीत! हां, अगर किसिपे दिल आ गया तो और बात है! वहा पैसोंका सवालही पैदा नही होता! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
म
मानस गुरुवार, 06/19/2008 - 05:42 नवीन
हां, अगर किसिपे दिल आ गया तो और बात है! वहा पैसोंका सवालही पैदा नही होता! क्या बात है!! खरं आहे, उगाच नाही "उमराव जान" अजरामर झाली. खरोखरच मनांत उमराव जानची आठवण झाली. मी असेही ऐकले आहे की या 'तवायफ' अत्यंत सुरेख गझल, ठुमर्‍या, होर्‍या, चैती आणि प्रसंगी "अभंग" ही तितक्याच समर्थपणे सादर करतात. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू असते व मोठ-मोठ्या बुजुर्ग उस्तादांकडे शिकलेल्या ह्या शागिर्द असतात. एकदा अनुभव घेतलाच पाहीजे. पुन्हा एकदा ........ मार डाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 06/21/2008 - 05:04 नवीन
त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू असते व मोठ-मोठ्या बुजुर्ग उस्तादांकडे शिकलेल्या ह्या शागिर्द असतात. निश्चितच. अलिकडच्या काळात नाही, परंतु सर्वप्रथम हिराबाईंनी जाहीर मैफलीत अभिजात संगीत मांडून तुमच्याआमच्या घरातल्या गाणं शिकणार्‍या मुलींना जाहीर मैफलीत गाण्यास कुठलाही संकोच वाटणार नाही असं वातावरण निर्माण केलं. मुलींनी जाहीर मैफलीत बसून गाणं, हे त्या काळात इतकं चांगलं मानलं जात नसे. परंतु हिराबाईंच्या अत्यंत खानदानी, सोज्वळ आणि तेवढ्याच शालीन व्यक्तिमत्वाने हे चित्र बदललं. याचं संपूर्ण श्रेय हिराबाईंनाच जातं! परंतु त्या आधीच्या काळात ज्या मुली गाणं शिकायच्या त्या बहुत करून कोठ्यावर गाण्याकरताच शिकायच्या आणि कोठ्यावरच गायच्या. आपण म्हणता तसं त्यांना एकसे एक बुजुर्ग उस्तादांची तालीमही मिळे. अर्थात, प्रसंगी अनेकदा त्यांना या उस्ताद मंडळींची सर्व प्रकारची(!) सेवाही करावी लागे! असो, या विषयावर निश्चित केव्हातरी अधिक विस्तृत लिहायचा प्रयत्न करेन... तात्या. अवांतर - बरं का मानसराव, बनारसी चाळीतल्या दिदीच्या कोठ्यावर रौशनीच्या गाण्यानंतर मीदेखील अजमेरच्या ख्वाजा मोईउद्देन चिस्तीला समर्पित केलेली पुरियाधनाश्रीतली 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश गायलेली आहे हे आपल्या माहितीकरता इथे जाता जाता नमूद करतो! अभ्यंकरांचा तात्या कोठ्यावरदेखील गायलेला आहे! तो एक वेगळाच अनुभव! :) आज पुण्याला येतो आहे तेव्हा कदाचित हीच बंदिश आपल्याला ऐकवेन..! :) आपला, (कोठेवाला गवई!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
म
मानस Wed, 06/25/2008 - 06:01 नवीन
बनारसी चाळीतल्या दिदीच्या कोठ्यावर रौशनीच्या गाण्यानंतर मीदेखील अजमेरच्या ख्वाजा मोईउद्देन चिस्तीला समर्पित केलेली पुरियाधनाश्रीतली 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश गायलेली आहे हे आपल्या माहितीकरता इथे जाता जाता नमूद करतो! अभ्यंकरांचा तात्या कोठ्यावरदेखील गायलेला आहे! तो एक वेगळाच अनुभव! -- क्या बात है!!! जियो तात्या, 'जोधा अकबर' सिनेमा कसाही असला तरी "ख्वाजा मेरे ख्वाजा" केवळ अप्रतिम. उगीचच आठवण झाली. तात्या, याबद्दल प्रतिसाद द्यायला थोडा विलंब झाला माफ करा, जरा कामानिमित्त अडकलो होतो, पण 'मुश्किल करो आसान..' ही बंदिश ऐकायला नक्कीच आणि फारच आवडेल. आज पुण्याला येतो आहे तेव्हा कदाचित हीच बंदिश आपल्याला ऐकवेन..! आता हे जरा जमणं कठिण आहे, कारण अंमळ जरा लांब आहे पुण्यापासून. मी अमेरिकेच्या राजधानीजवळ राहतो. आपल्या 'मुक्तसुनीत' च्या बाजुच्या गावाला. तेव्हा पुढच्या भारतभेटीत एक मैफील नक्की. अवांतर : नमोगतावरचा "अंतरीक्ष", सध्या एक्सक्लूसिव्ह मिपाकर मानस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 06:57 नवीन
तेव्हा पुढच्या भारतभेटीत एक मैफील नक्की. अरे जरूर भरवूया एक मैफल. मजा येईल. पुरियाधनश्री गाउया! :) नमोगतावरचा "अंतरीक्ष" ओह! ओळखलं! :) सध्या एक्सक्लूसिव्ह मिपाकर जियो...! :) आपला, (एकेकाळचा कट्टर मनोगती, आता कट्टर मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
फ
फटू गुरुवार, 06/19/2008 - 05:03 नवीन
मानलं तुम्हाला... बाजारातही गाणं शोधणारा तुमच्यासारखा रसिक वेगळाच... बाकी रौशनीची कहाणी मनाला चटका लावून गेली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 06/19/2008 - 05:39 नवीन
तात्या, धन्यवाद...........
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/19/2008 - 05:40 नवीन
रौशनी वाचून मनात एक प्रतिमा झाली होती निर्माण.. पण फिकी पडली ती या फोटोंपुढे.. अफलातून खानदानी सौंदर्य आहे रौशनीचे.. तुमची लेखमाला परत वाचून काढावीशी वाटतीय आता.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/19/2008 - 05:54 नवीन
तात्या, हे फोटो त्यांची परवानगी घेऊनच संकेतस्थळावर चढवले असावेत ही अपेक्षा... तुमच्या वैयक्तिक आठवणींसाठी काढलेले फोटो असे सार्वजनिक ठिकाणी आले असतील ( त्यांच्या परवानगीशिवाय) तर ते मला तरी अयोग्य वाटते... ( सिनेमा नट्या, फॅशन मॉडेल्स यांना पूर्ण कल्पना असते की त्यांचे फोटो सौंदर्य दाखवण्यासाठी आणि सार्वजनिक प्रदर्शनासाठीच आहेत, इथे तसे नसावे असे वाटते )... सार्वजनिक संकेतस्थळावर एखाद्या अनोळखी स्त्रीचे फोटो पाहून त्यांच्या सौन्दर्याची विविध शब्दांत सर्वांनी चर्चा करणं थोडं अप्रस्तुत वाटलं खरं... मग ती स्त्री कोणीही असो... आणि त्यांची परवानगी असेल तर मग प्रश्न मिटला... वरील सर्व शब्द मागे घेतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 05:57 नवीन
>>सार्वजनिक संकेतस्थळावर ... ! सहमत. कळीचा मुद्दा. राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 06:03 नवीन
मास्तर, आपल्या सूचनेबदल मनापासून धन्यवाद. परंतु कृपया निश्चिंत असावे. या बाबतीत अधिक खुलासा पोष्टकार्ड पाठवून अथवा प्रत्यक्ष भेटीन तेव्हा करेन... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/19/2008 - 06:09 नवीन
ओके.. आपल्यावर विश्वास आहे... :) आता म्हणतो, "फोटो छान आहेत, गाणेच ऐकू यायला लागले आहे..."... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शेखस्पिअर गुरुवार, 06/19/2008 - 08:17 नवीन
अख्तरीबाईची काफी रागातली एक ठुमरी रौशनीने खरंच खूप छान रंगवली. अजूनही अशा ठिकाणी ठुमरी गायल्या जातात हे वाचून महदाश्चर्य वाटले... कुठेतरी ही कला जिवंत आहे ... छान...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
अ
अन्या दातार गुरुवार, 06/19/2008 - 06:22 नवीन
खरेच, एकदम सुंदर, नेमके व्यक्तिचित्रण करणे हा तात्यांच्या हातचा मळ आहे. भले ती व्यक्ति रोशनी असो किंवा भीमण्णा, पं. फिरोज दस्तूर असोत. गाणे,व्यक्ति यांचे असे वर्णन मला अद्यापही कोठेही वाचावयास मिळाले नाहिए. तात्यासाब, लगे रहो ;)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 06/19/2008 - 06:24 नवीन
किती सुंदर आहेत ह्या, वाईटही वाटलं(रौशनी-५ वाचलं) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 06/19/2008 - 07:36 नवीन
तात्या ,आपली रोशनी खरंच खूप सुंदर आहे. साती
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 06/19/2008 - 07:43 नवीन
रोशनीतल्या कलाकाराला अणि आपल्या रसिकतेला मनापासून सलाम
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 06/19/2008 - 07:49 नवीन
तात्या, आगाऊपणाबद्द्ल माफ करा, पण मला वाटते त्या व्यक्तिच्या परवानगी शिवाय असे फोटो सार्वजनि़क ठिकाणी टाकू नये. तिला किंवा तिच्या साथीदारांपैकी (जसा तबलजी, पेटीवाला) एखादया व्यक्तीला अशा प्रसिद्धीमुळे त्रास होऊ शकतो, ह्याचा अवश्य विचार करा. सगळे प्रतिसाद वाचले नाही, पण पहिल्या काही प्रतिसादात कोणाल हे खटकले नाही हे बघून नवल वाटले. - मनिष
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/20/2008 - 04:52 नवीन
मनिषराव, आपल्या सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद...! मी सर्व सारासार विचार करूनच हे फोटू टाकले आहेत. ही सर्व माझी माणसं आहेत, सर्व जबाबदारी माझी आहे. आपण कृपया निश्चिंत असावे. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/19/2008 - 07:53 नवीन
वाइट वाटलं तात्या, त्या भागातल्या बायांची टिपीकल फिल्मी तसवीर मनात बसलेली अशी चारचौघातली बाई म्हणजे ती हे अक्सेप्ट होईना पटकन. आत्तापर्यंत कोणत्यातरी अनोळखी स्त्रीची कर्मकहाणी म्हणुन वाचत होतो. आता तुम्ही फोटो दिलेत, ती कशी दिसते माहित झाले, पुढचे भाग अजुन अजुन हळवे करणार. उत्तम कादंबरी किंवा नाटक होउ शकते यावर.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/19/2008 - 08:03 नवीन
तात्या,रौशनीने वाचताना तर चटका लावला होताच पण तिला पाहिल्यावर अधिकच वाईट वाटलं.एक खानदानी स्त्री दैवाचे फासे वेडेवाकडे पडल्यामुळे बाजारात आली..(त्याऐवजी जर सिनेमा इंडस्ट्रीत दैवाने नेले असते तिला तरी प्लास्टीक/कचकड्याच्या कित्येक नट्यांची तिने छुट्टी केली असती .) (बाकी तिचे फोटो जालावर चढवण्याबाबत मलाही प्रश्न पडला होता पण मास्तरांना दिलेले स्पष्टीकरण वाचले.आता किंतु नाही.) हा लेख अस्वस्थ करून गेला. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सखी गुरुवार, 06/19/2008 - 17:00 नवीन
स्वातीशी सहमत! आत्ताच मागचे राहीलेले भाग वाचुन काढले. रौशनी अस्वस्थ करून गेली. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
च
चाणक्य गुरुवार, 06/19/2008 - 08:58 नवीन
रोशनी भाग ५: तात्यांची प्रतिक्रीया:
जे काही लेखन आहे ते केवळ अन् केवळ सत्य घटनेवर आधारीत आहे. सत्य घटनेवर आधारीत, जे घडलं तसं लिहिलं आहे, ते जर कुणाला अतिरंजित वाटलं तर वास्तव किती भयानक असेल याची कल्पना करा!
खरं आहे तात्या. जबराट आहे तुमचा अनुभव. काटा आला अंगावर वाचताना. 'ते' जग किती वेगळं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. कितीही तिरस्कार करायचा नाही म्हणलं तरी आतलं पांढरपेशं मन नाही ऐकत. वेश्यावस्ती किंवा रंडीबाजार म्हणलं की नकळत एक प्रकारची घ्रुणा उत्पन्न होते मनात. 'तिथे' ही काही मनाने चांगले लोक असतील, केवळ परिस्थितीमुळे या ठिकाणी ते आले असतील, हे सगळं कळत असलं तरी 'या लोकांशी जवळीक नको रे बाबा' असाच विचार मनात येतो. पांढरपेशा मनाची ही अवस्था तुम्ही नेमक्या शब्दात मांडली आहे. असो. पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड गुरुवार, 06/19/2008 - 10:54 नवीन
तात्या तुमची रोशनी ख्ररोख्रर आवडली. त्याबरोबर्च आवडली तुमची बिनधास्त आणि ओघवती लेखनशेलीही . आजच सारे लेख क्रमाने वाचले. कोठेही कंटाळा आला नाही किंवा अतिशयोक्तीही जाणवली नाही. मात्र माझ्या मनात आलेले काही विचार येथे मांडण्याचा नम्र प्रयत्न करीत आहे. मला वाटते तात्या क्रमशः ने तुमच्या लिखानाचा बाज पाहिजे तसा उतरला नाहीए. मिपाकरांच्या दबावामुळे 'आता काहीतरी दिले पाहिजे' या भावनेतुन पक्की बेठक न जमवता तुम्ही पुढ्चा भाग टाकल्याचे ५ व्या भागात वाटते. त्याचा हा पुरावा नाहीतरी हिने मला दहा वेळा आग्रहाने जेवायला बोलावलंच आहे चॉथ्या भागाच्या शेवटी 'दहा वेळा बोलवल्याचा उल्लेख आहे. तर ५ व्या च्या सुरुवातीला वरील वाक्य आहे. यावरुन लक्षात येणारी बाब ही की तुम्हाला वेळ न मिळाल्याने मागच्या भागाचा क्लू थोडासा निसटला. मी हे पुराव्यासह मांड्ण्याचे कारण आपली चूक दाखवुन माझा शहाणपणा मिरविणे हा नसुन आपण आपल्यातील लेखकावर करीत असलेला अन्याय आपल्या लक्षात आणुन द्यावा एवढाच आहे. रोशनी चे फोटो दाखवुनही आपण तेच केलेत असेच मला वाटते. ते शेवटी दाखविले असतए तर आम्हाला तात्याभाईच्या शब्दांतुन होणाय्रा रोशनीच्या दर्शनात व्यत्यय आला नसता. आता आम्ही तिला तुमच्या नाही तर आमच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आमच्या नकळत करणार आहोत. फिरभी .......दिलसे..ला इलाज नाही. कुणीतरी बाबा कदमांची आठवण आल्याचे म्हटले आहे. ते बिर्याणीपुरतेच असेल तर मीही सहमत आहे. अन्यथा तुमच्या लेखनात तोचतोचपणा नाही हे निश्चितच. संपुर्ण तयार झाल्याशिवाय उर्वरीत कथा प्रकाशित न करण्याच्या आपल्या निर्णयासाठी त्रिवार अभिनंदन. तो सावकाश पण पुर्ण येऊ द्यात. चु.भु. क्षमस्व. काळा पहाड
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/20/2008 - 04:56 नवीन
चॉथ्या भागाच्या शेवटी 'दहा वेळा बोलवल्याचा उल्लेख आहे. तर ५ व्या च्या सुरुवातीला वरील वाक्य आहे. वाचकांना मागील भागाची पुढल्या भागात लिंक लागण्याकरता मी ते मुद्दामून उद्घृत केले आहे... आता आम्ही तिला तुमच्या नाही तर आमच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न आमच्या नकळत करणार आहोत. आता त्याला माझा काय इलाज? मी जे घडलं आहे/होतं, तेच माझ्या शब्दात मांडण्याचा यापुढेही प्रय्त्न करणार आहे. फोटूंचं म्हणाल तर मला ते टाकावेसे वाटले म्हणून मी ते टाकले.. असो, सर्वांचेच आभार... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा_पहाड
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 06/19/2008 - 12:52 नवीन
तात्या, रोशनी खरच सुन्दर आहे ..खानदानी सौंदर्य . आणि तिची कहाणी तितकीच करुण.. आपण किति मोजुन्-मापुन्,सुरक्षित आयुष्य जगतो ते जाणवुन देणारा लेख..
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 06/19/2008 - 13:33 नवीन
तात्या, छान आहे रौशनी. बाकी शब्द नाहीत.. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी गुरुवार, 06/19/2008 - 14:06 नवीन
िव्कास०१५४ मानलं तात्या तुम्हाला..... अतिशय देखणी,सुन्दर, खानदानी सौंदर्य.......बाकी शब्द नाहीत.. "रौशनी" आिन "रोशनी िच लेखमाला" खरंच खूप सुंदर आहे. आप्ला लेख्नाचा एक िनिस्सम चाह्ता.... िवकास िशदे....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/19/2008 - 14:07 नवीन
सलाम, रौशनीबाईला सलाम! काय लिहू? मला गदिमांचे शब्द उसने घेण्यावाचून उपाय नाही - घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 06/20/2008 - 12:55 नवीन
घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार! केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुवर्णा Wed, 02/18/2009 - 12:51 नवीन
घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार! हेच म्हणते... आताच सगळे भाग वाचले.. अप्रतिम!! मनाला चटका लावून गेली रोशनी!! :S (पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारी) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
व
विसुनाना गुरुवार, 06/19/2008 - 14:47 नवीन
सर्व फोटोतून खरी रौशनी प्रकट होतेय. आजूबाजूच्या वातावरणाला ती विसरली आहे. उरली आहे ती फक्त एक घराणेदार गायिका. क्षणभर वाटलं की ही स्त्री एखाद्या गंधर्व महोत्सवाच्या मंचकावर गाताना किती शोभली असती! (रौशनीताई ग्वाल्हेरकर!!) तिसरा फोटू तर वेदनेचाच फोटो वाटला. तिचं व्यक्तिमत्व इतकं सामर्थ्यवान आहे की वाटतं प्रतिष्ठेची बेगडी झूल पांघरणार्‍या आणि अंधारात पाप करणार्‍या कोत्या आणि खोट्या माणसांपेक्षा तीच जास्त पवित्र वाटते. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं अशी म्हण आहे.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 07:55 नवीन
विसुनानांशी अगदी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/19/2008 - 14:50 नवीन
सत्य हे कल्पनेहून विचित्र असतं हेच खरं
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 06/19/2008 - 16:48 नवीन
"रोशनी"चा पुढचा भाग वाचताना हे उमदे चित्र डोळ्यासमोर येईल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2008 - 17:25 नवीन
व्यक्तिचित्र. शब्द आणि प्रकाशचित्रे एकमेकांस पूरक. झकास. मजा आली. यातील तत्वचिंतन वगैरे इतरांकडून वर झालेच आहे. रोशनी ६ च। वाट पाहातो. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा