पाककृती
प्रॉन्स बिर्याणी
Primary tabs
साहित्य :
कोळंबी - १/२ किलो
लिंबाचा रस
केशर
२ टीस्पून गुलकंद
आलं - लसून पेस्ट १ चमचा
३-४ कांदे बारीक चिरलेले
४-५ टोमॅटो बारीक चिरलेले
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
कढीपत्ता काही पाने
१ टेस्पून कसूरी मेथी
बारीक चिरलेली कोथींबीर
बारीक चिरलेला पुदिना
२-३ टेस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
लवंग , काळी मिरी आणि दालचिनी
मोकळा शिजवलेला भात.
मीठ चवीनुसार
पाककृती :
कोळंबीला लिंबाचा रस आणि मीठ लावून मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे. कमीत कमी १ तास ठेवली तरी पुरे आहे. कोळंबी छोटीच असेल तर चांगली, मला मिळाली नाही म्हणून मी मोठी कोळंबी घेतली आहे.
एक छोटी वाटी पाणी घेऊन त्यात गुलकंद आणि केशर घालून ठेवावे.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंग, काळी मिरी , दालचिनी, आले-लसूण पेस्ट , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर परता.
त्यावर लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद ,कसूरी मेथी घाला व सगळा मसाला तूप सुटेपर्यंत परता.
नंतर त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घाला. याला चांगली वाफ सुटून कोळंबी तशीच शिजून द्या.
कोळंबी शिजल्यावर त्यात मोकळा शिजवलेला भात आणि गुलकंद आणि केशर चे पाणी घालून वाफवून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घाला.
प्रॉन्स बिर्याणी तयार ! !

मस्त दिसतेय. :)
फटूच्या लिंक गंडल्या काय हो ?
आणि हो नेक्स्ट टैम कैतरी गवताळ पाकृ टाका.
छान छान! मिसळपाववरचा हा पहिला प्रयत्न छान जमला आहे!
पुढच्या वेळी शाकाहारी रेसिपी टाका... :)
- मृगनयनी.
प्रकार आवडला...
अमृत
तों पा सु .
अजुन वेगवेगळे मासे येऊद्यात. :-)
+१ हेच बोल्तो... :-)
अंडी घालून प्रतिसाद कसा काय नाही या धाग्यावर?
मसाला प्रॉन्स ईतके भारी दिसतायत की त्यात भात टाकायच्या आधीच चाखणा म्हणुन गट्ट्म होतिल.
सुंदर रेसीपी.
केशर आणि गुलकंद मिश्रित पुलाव त्यात कोलंबी मसाला
जबरदस्त प्रकरण आहे
रुसलेल्या बायकोला पटवण्यासाठी भविष्यात हा जालीम व अक्सीर उपाय राखून ठेवत आहे:
अरेरे...! रुसलेल्या बायकोला (स्वतःच्या) पटविण्यासाठी तू कोलंबी पुलाव वापरतोस? हाऊ अन् रोमँटिक.
घरी नेमून दिलेली कामे न करता दिवसभर आज मिपावर पडीक होतो.
त्यामुळे संध्याकाळी काहीतरी खास जेवण करणे आले.
पण घरात गुलकंद नाही आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे करावे लागणार.
सुट्टीचा दिवस म्हणजे घरची कामे.......
प्रेम विवाह तेही स्त्री पुरुष समानता ....
आता आलीय भोगा .....
अरेरे..! किती गळा काढतो आहेस रे! ....जाऊ दे.
हार्दिक शुभेच्छा...!
तरी बरंय कॅथ्रिनवैनींना मराठी येत नै ते ;)
शाकाहारी पाकृ सुद्धा टाकेल . . .
प्रतिक्रियांबद्दल , मनापासून आभार....
छान दिसतेय बिर्याणि :)