Skip to main content

लेमन राईस

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 05/06/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल) १/४ वाटी लिंबाचा रस २ हिरव्या मिरच्या चिरून १-२ लाल सुक्या मिरच्या तोडून कढीपत्ता १ टेस्पून शेंगदाणे १ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून चणा-डाळ १ टीस्पून उडदाची डाळ १/४ टीस्पून हींग १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार तेल . पाकृ: पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची फोडणी करावी. . डाळी लालसर रंगावर परतल्या गेल्या की त्यात कढीपत्ता, हींग, हिरव्या व लाल सुक्या मिरच्या घालाव्या. . थोडे परतल्यावर त्यात हळद व शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खमंग परतून घ्या. . आता त्यात शिजवलेला भात व मीठ घालावे. मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. . त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा व सगळे नीट मिक्स करून घ्यावे. लेमन राईस तयार. . तुम्ही कुठल्याही रायत्यासोबत किंवा पापडासोबत सर्व्ह करू शकता. .

वाचने 10179
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

वाचला गेला आहे. सध्या असल्या धाग्यांसाठी ही सामायिक प्रतिक्रिया असेल याची पाकृकारांनी नोंद घ्यावी ही विनंती. छळ मांडतात ही लोकं.... :-(

आकर्षक छायाचित्रं आणि चविष्ठ वर्णन. मस्तं पाककृती. ह्यात जरा लिंबाची साल किसून घातली तर स्वाद अजून वाढतो.

हा लेमन राइइस खाताना नेमके ते मेथीचे दाणेच चावले जातात आणि तोंड कडू होतं :-( इकडे दक्षिणेत लेमन राइस देवळात प्रसाद म्हणून सुद्धा वाटला जातो. अमृत

माझा आवडता पदार्थ आणि सोपा! फोटो बघून आत्ता पाहिजेच असं वाटायला लागलंय!

करून बघण्यात येईल. आणखी काही असे सोपे प्रकार असतील तर आम्हास पा कृ चे धागे देणे. फार भारी नसले तरी चालतील सध्या एकटे आहोत, फक्त उदरभरणाची सोय तेवढी बघायचीय.

छायाचित्रे फारच सुरेख आहेत. अनेक दक्षिण भारतीय पदार्थांपैकी हा सर्वाधिक सुटसुटीत. बनवायला अन खायलाही.

परवा करुन पाहिला सानिकातै, पण चण्याची डाळ आणि ऊडीद यांच समीकरण चावता चावलं जाईना.. बाकी चव मस्त आली पण पुढच्या वेळी डाळी न घालताच करु म्हणतो.. आणि हो लसणाशिवाय या भाताला मी तोंडी घेत नाही, त्यामुळे लसूण घातला होता भरपूर खरपूस तळून :)