भटकंती

राजमाची

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. (हा देव कुठला? वेशीवरचा देव आहे हे नक्की) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
प्रचेतस

मस्त फोटो.
तो वेशीवरचा देव बहुधा काळभैरव आहे. तिथेच झाडाखाली एक दोन वीरगळ पण आहेत.
नुसत्या फोटोंचा धागा टाकलाय तर फोटो अजून जास्त हवे होते.

दशानन

हो, काळभैरव च असेल तो.
वीरगळ दिसले फोटो काढले होते, पण निवडताना विरगळाचा फोटो सोडून दिला :)

प्रचेतस

तो कदाचित वेशीवरचा राखणदार पण असू शकेल. संभाजीपुत्र शाहू महाराजांनी किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला होता. तेव्हा कोकणातील ही वेशीवरच्या राखणदाराची पद्धत सुद्धा राजमाचीच्या वेशीवर या मूर्तीच्या रूपाने आली असेल. कारण खुद्द माचीवर भैरवनाथाचे देऊळ आहेच, तेव्हा परत वेशीवर काळभैरवच असेल असे वाटत नाही.

पैसा

राजे, फोटो लैच भारी आहेत पण लेख कुठे आहे?

पैसा

पण राजे लिहू शकतो म्हणून विचारतेय. प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं!

गणपा

प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं!

=))

बादवे तो दुसर्‍या फोटोतला किटक माशी आणी लेडीबगच्या मिलनातुन आला आहे काय?

सहज

पण खरच!

पण कोण्या युरोपियनाने जर असा फोटो काढून 'बास्टर्ड' अश्या शीर्षकाखाली टांगला असता तर देश, समाज, समाजाच्या काठापलिकडची वस्ती असा मानववंशशास्त्र, इतिहास व्यापणारा, काहीसा गहन अर्थबोध करणारा फोटो म्हणून जगभर प्रसिद्ध झाला असता राव!!

राज फोटो भारी!

रमताराम

पण राजे लिहू शकतो म्हणून विचारतेय. प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं!

का हो जाता जाता बिचार्‍या प्रभ्याला एक धपाटा घालताय ते.

प्रभ्या, आता घेच मनावर. चल आता तू, डान्राव नि विमो युरो कपच्या निमित्ताने हो जाव शुरू. दिखा दो जमानेको की तुम भी क्या चीज हो.

दशानन

लिहावे असे खूप वाटत होतं पण लिहायला सध्या वेळच मिळत नाही आहे, एक मंदिरे व शिल्पकला यावर लेखमाला लिहीत आहे, त्यावरच भरपूर वेळ जात आहे.

चौकटराजा

राजमाची वर आजच सकाळी जाउन आलो पाच मिनिटात ! ( संदर्भ गूगल अर्थ) हे सारे फोटो
पाहून नेत्र सुख मिळाले पण थोडक्यात सुद्धा वर्णन नसल्याने चुकचुकल्यासारखे होतेय राव !
बा द वे गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा)
हा एकमेव रस्ता राजमाचीसाठी आहे का ? माहिती द्यावी ही विनंति .

दशानन

>गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा)

आम्ही याच रस्ताने गेलो, पण हा एकमेव रस्ता नसावा, कारण कर्जत कडून देखील एक रस्ता आहे व लोकलने येणारे पण एक वेगळाच रस्ता पकडून येतात असे कळले.

प्रचेतस

कर्जतहून येणारा रस्ता पायथ्याच्या कोंदिवडे गावाजवळून कोंडाणे लेण्यांच्या वाटेने वर चढत येतो. अतिशय खडी, दमछा करणारी वाट आहे पण तितकीच निसर्गसुंदर.
अजून एक रस्ता कर्जत-वदप-सांडशी घाटाने ढाक बहिरीमार्गे येतो हा बराच लांबचा रस्ता आहे.

चौकटराजा

वल्ली साहेब ( निश स्टाईल मधे ) , धन्यवाद माहितीबद्द्ल. ते उरलेले दोन मार्ग पुढच्या जन्मी करावे म्हणतो .

श्रावण मोडक

ती काळीकुट्ट जाडसर बोर्डरलाईन टाकून चांगल्या फोटोंचं पोस्टर करून टाकलं सालं.

दशानन

हा हा हा, नवीन नवीन फोटोशॉप शिकत आहे मालक ;)

नाना चेंगट

मस्त फोटो !!! :)

मृगनयनी

मस्त फोटु!!!... पण लेख कुठे आहे दशानना!!..... ;)

पहिल्या आणि शेवटच्या फोटोत काही सूक्ष्म १० फरक आहेत का?.. आणि ते फरक आम्ही ओळ्खावेत.. असे आपणास वाटते का? ;)

तुझ्या नावातच राजा असल्याने तू टाकलेले फोटो हे अविस्मरणीयच असणार ह्यात काय शंका ?

बाकी हात कुठे अडकले होते ज्यामुळे लिखाण न करता फकस्त फटू टाकले ?

आणि हो श्री. दशानन हे मिपावरती फक्त स्वतःचे लेख टाकण्यापुरते येतात असे आम्हाला आढळले आहे*. तरी त्यांच्यावरती कारवाई व्हावी. ;)

*म्हणजे माझ्या लेखावरती तुझी प्रतिक्रिया का नाहीये ?

दिपक

क्लास आहेत छायाचित्रे राजे. :-)
ही चित्रे मुळ रेझोल्युशन मध्ये कुठे मिळतील ?

दशानन

माझ्याच कडे!
४एमबीची एक फाईल आहे.

jaypal

वर्णन दोन्ही आवडले :-)