मालपुआ - रबडी
Primary tabs
साहित्य झटपट मालपुआसाठी:
१ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी दूध
१/२ वाटी साखर
३/४ वाटी पाणी
१ टेस्पून भरडसर वाटलेली बडीशेप पावडर
चिमूटभर मीठ
१ टीस्पून इनो फ्रुट सॉल्ट
तळण्यासाठी तूप (हो हो तुपचं , तेलात तळले तर मजा नाही पाकृला ;) )
साहित्य सर्व्हिंग व सजावटीसाठी :
तयार रबडी (रबडीची पाकृ नंतर कधीतरी देईन)
बदाम-पिस्त्याचे काप
केशराच्या काड्या
चिमूटभर वेलची पावडर
पाकृ:
एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून उकळी काढा.
साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. (साधारणपणे गुलाबजामाच्या पाकाप्रमाणे)
पाक तयार झाला की वेगळ्या बाऊलमध्ये काढा.
दुसर्या भांड्यात गव्हाचे पीठ, बडीशेप पावडर, मीठ एकत्र करुन घ्या.
त्यात थोडे थोडे करून दुध घाला व मिश्रण चांगले मिक्स करा.
एकही गुठळी होता कामा नये.
मिश्रण साधारणपणे जिलबीच्या मिश्रणाइतपत घट्ट असावे. ( फार पातळ नको)
फ्राईंग पॅनमध्ये तुप मंद आचेवर गरम करावे.
मिश्रणात एनो फ्रुट सॉल्ट घालावे व हलकेच फेसावे.

त्यात चमच्याने छोटे छोटे मालपुए घालावे.
छान फुगतील व जाळीदार होतील.
एका बाजूने सोनेरी रंगावर तळले गेले की उलटवून दुसरी बाजू तळावी.
तळलेला मालपुआ झार्याने काढून, दाबून त्यातले तूप काढून टाकावे.
लगेच कोमट पाकात घालून २-३ मिनिटे मुरु द्यावे.
असे सर्व करून घ्यावे.
निथळून सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे.
त्यावर तयार रबडी घालावी. बदाम-पिस्त्याचे काप पेरावे.
केशर व वेलचीपूड भरभुरावी व सर्व्ह करावे.

नोटः
ह्या मिश्रणाचे साधारण १०-१२ मालपुए होतात.
आपण मालपुआ रबडीबरोबर सर्व्ह करत आहोत म्हणून साखरेचा पाक कमी गोड केला आहे (रबडी ही चवीला गोड असते म्हणून).
जर तुम्हाला रबडीसोबत सर्व्ह करायचे नसेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
मालपुआ पाकात घालून मुरु द्यावा व सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर पिस्त्याचे काप व केशर घाला.
पाकृ सौजन्य:
ही पाककृती मी ईटीव्ही मराठीवर मेजवानी ह्या कार्यक्रमात पाहिली होती. त्यात मुळ पाकृत, मिश्रणात भरडसर काळीमिरी पावडर व अख्ख्या बडीशेपचा वापर केला होता.
मी काळीमिरी पावडर घातली नाही व बडीशेपची भरड पावडर घातली आहे.
आणी हो ह्यात कुठलेच चिजाळलेले अंडे घातले नाहीये, ते घालून कसे लागेल माहीत नाही , त्यावर कुठलेच वैदिक संस्कार केलेले नाही , जसे बनविले तसे दिले आहे ;) कृ ह घे हे वे सां न :)
हर हर हर!
एकदम किलर पाकृ !! करुन बघणेत येईल.
नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.
मालपुवे हे पाकातल्या पुर्यांसारखे लागतात असे मला वाटते.
एकदाच खाल्ले होते त्यावरून.
पापुला घाट घालावा लागतो त्यामानाने झटपट मालपुव्यांची कृती बरी वाटली.
रबडीची पाकृ येईपर्यंत मालपुवे बनवून ठेवते व वाट पहात बसते. ;)
ही पाकृ पारंपारीक असल्याचे नमूद केल्याबद्दल धन्यवाद.
:)
छे हो वाट कशाला पाहताय द्या ते मालपुवे पाठ्वुन इकडं, उगा किती दिवस ठेवणार ते.
तुम्हीच या की इकडं.
आग्रहाचं आमंत्रण समजा आणि या.
वा छान
पण माझी आई गव्हाच्या पिठात थोडे मैद्याचे पीठ घालुन करते. छान लाग्तात.
ठळक केलेले वाक्य फार्फार आवडले.
बकी कमेंट नेहमीप्रमाणे!
एक मस्त पा. क्रु. दिल्याबद्दल.
छान
हा हा हा.. शेवटच्या वाक्याबद्दल विषेश कौतूक ;)
बाकी! फटु नेहमीप्रमाणे जीवघेणा!!
कालच आठवण काढ्ली याची. आज बघते तर पाकृ हजर.
तुझ सादरीकरण आणि पाककौशल्य तर अप्रतिम.
:)
आईईई गं.... पहिल्या फोटोलाच बाण लागला तो पार काळजाच्या आर पार गेला.
पुढे काही पहायचं त्राण नाही.
मार डाला ! मार डाला ! पुढच गाणं तुम्हीच गुणगुणा... ;)
आयटम भारी हाय... :)
बाकी रबडीच म्हणाला तर... आहाहा क्या केहेने ! इंदुरात जातो तवा लयं चापतो बघा. :) पण हल्ली त्याचीही चव च्यामारी बदलली आहे,पुर्वी सारखी मिळत नाय... च्यामायला !
पहिल्या(च) फोटूमुळे,,,सद्ध्या मेलो आहे... प्रतिक्रीया पुढील पा.कृ.च्यावेळी देण्यात येइल... क्षमस्व!
करायला पण सोपी वाटत आहे.
वरील साहित्यातलं 'इनो' तेवढं घेतलं आहे. तुम्ही दुसरं आणा. क्षमस्व.
.
.
.
.
.
एवढंच सांगायचं होतं. :)
गोड पदार्थाने जळजळ होते हे प्रथमच समजले. आमच्याकडुन साष्टांग नमस्काराचा स्वीकार करावा. :)
_/\_
सानिका तुझा नवरा खरच नशिबवान आहे ..
एकदा तरि त्या स्वप्निलचा फोटो ..तुझ्या गोडाधोडाच्या डिश शेजारी टाक कि .....;)
बाकि मालपूवे बनवन्याची सोपी ..ईवन तुझ्या बर्याच सोप्प्या पद्धतीने माझ्यासारख्यान्ची बरीच काम सोप्पी होउन जातायत ..त्यामुळे विषेश आभार :)
व्वा व्वा !!!! मालपुआ जबरदस्त :)
कालच तुझी आठवण झाली अन आज हा धागा ,दुष्काळ संपला विभागाचा ;)
तुमचा पत्ता द्या ! एखाद दिवशी अवचित अतिथी यावे म्हणतो.
बघूनच अंगावर मुठभर मांस चढले.
ज ब रा ट पाककृती आहे.
बघूनच अंगावर मुठभर मांस चढले. >>
सेम पिंच.
माझापण हाच प्रॉब्लेम आहे. :(
करुन खाल्लं तर काय??
खुपच छान रेसिपी.
करुन बघण्यात येईल.
ईथुन पुढे फक्त फोटू बघण्यासाठीच तुमचा धागा उघडल्या जाईल याची नोंद घ्यावी. :)
मस्त पाकृ!!मला खुपच आवडतात...नक्की करुन बघीन...
अहाहा! मालपुआ.
मला फार आवडतो. एक विचारु? गुळाचा असतो ना?
बाकि फोटो पाककृय्ती अन कमेंट भाऽऽरी!
मालपुआ गुळाचा असतो का ह्याबद्दल माहित नाही गं अपर्णा ताई मी तरी साखरेच्या पाकातला ऐकला, पाहीला आहे :)
गुळाचा असेल तर खूपचं छान ..तुला कधी पाकृ मिळाली तर मला सांग , मला नक्की ट्राय करायला आवडेल :)
धन्यवाद प्रतिसादाबद्दल :)
हे साहित्य पाहुन करावेसे वाटले... पण ...
हे पाहुन बेत रद्द करण्यात आला आहे... फक्त फोटो पाहुन खलास झालो आहे. _/\_
पहिलाच फोटो सुरेख दिसतोय. मस्त!!
:)
आवडता पदार्थ आणि तोंडाला पाणी सुटणारे फोटो!
रमझान मधे भेंडीबाजारात जाऊन खास चवीचे मिळतात, पण त्यांत अंडे असते.
खल्लास !!!!
ह.घे. असं लिहिलंय, मालपुवा आणि रबडी हा हलक्यानं घेण्याचा प्रकार आहे काय , कैच्याकै ?
खल्लास!!!!!
मस्त ग!!
स्वाती
एक प्रश्न,
मालपूआ हा प्रकार किती दिवस टिकनारा आहे??
ताबडतोब संपतो!
ए माउ तसं नाहि गं. :(
म्हणजे लवकर खराब होनारा प्रकार नाहि ना??
असं विचारायच होतं :-|
मालपुआ जर नुसता पाकातला असेल तर फ्रिजमध्ये २ दिवस सहज टिकतो, पण जर का त्यावर रबडी घातलेली असेल तर मात्र लगेच संपवावा रॅदर वर माऊताई म्हणते तसा लगेच संपतो :)
इनो आधीच घालून दिल्याबद्दल धन्यवाद! फोटो फारच आवडल्यामुळे खायला मन होणार नाही!
एव्हढे नाही आवडले तर फोटो खाते का काय तु?
अहाहा..... दिल खुश हो गया :) सुंदर प्रेझेंटेशन ....
(रबडी मापपुआ हा प्रकार पुण्यात २-३ ठिकाणी खाल्ला होता.. अगदिच अवडला नव्हता... पण इंदोरला सराफा मधे खाल्ला तेव्हा जाम प्रेमात पडलो ह्या पदार्थाच्या... :) ... तु बनवलेला रबडी मालपुआ हि असाच चविष्ट असेल ह्यात शंकाच नाहि :) )
हे फोटोज इंदोरच्या सराफा मधल्या रबडी मालपुआ चे :)
फोटोच्या मधोमध कॉपीराईट टाकायला विसरलात की काय?
हे राम!!! ...............................
एकापेक्षा एक वजन वाढवणारे शाकाहारी पदार्थ येथे देउन अनेकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत हे.
असो.
बाकी नेहमीप्रमाणेच.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
आणी हो ह्यात कुठलेच चिजाळलेले अंडे घातले नाहीये, ते घालून कसे लागेल माहीत नाही , त्यावर कुठलेच वैदिक संस्कार केलेले नाही , जसे बनविले तसे दिले आहे Wink कृ ह घे हे वे सां न Smile
ह्या वाक्यासाठी
__/\__
मस्त. कालच केले होते फक्त मालपुवे. झटपट होणारी रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद.
आज या पद्धतीने मालपुवे व फोटून तू दाखवलीस तशी दिसेल अश्या पद्धतीने रबडी असे करून बघितले. खूप छान झाले. मालपुवे पहिल्यांदाच केले. तू अगदी गोल गोल केलेस तसे जमले नाहीत, जरा लंबगोल प्रकारचे झाले. पुढील वेळी प्रगती होतीये पाहुयात. ;)
हा धागा परत वरती का आणला?
तुम्हाला अद्याप आमचे दू:ख समजत नाही का?
असो,
"ने मजसी ने परत इंदूरला" असे गाणे म्हणत दिवस काढायला लागणार.
(आता फेब्रुवारीत पुणे की इंदूर अशा भ्रमात पडलेला) मुवि.
बरं - धाग्यात कबूल केल्याप्रमाणे रबडीची पाकृ कुठाय?
आजच करुन पाहण्यात आले. मी इनो वापरलं नाही, कारण मिळालं ते फ्लेवर्ड होतं मग वगळलं. आणखी एक बदल म्हणजे साधारण एक टेबलस्पून मैदा वापरला.
पाकातून काढल्यानंतरः
औंधच्या 'कढाई'मध्ये मस्त मिळतो रबडी मालपुआ.
उद्याच जाउन खातो :)
बाकी पाकृ. एकदम भारी.
सानिका परवाच करुन पाहिला, अतिशय सुरेख प्रकार , घरात सर्वांना खुप खुप आवडला.
असे मु वी म्हणतात ते खरे आहे कारण मलाही हा इतका शुद्ध अत्याचार सहन होत नाहीये ...
आपल्यावर कायदेशीर कारवाई का करणेत येऊ नये ....
फोटो हे सज्जड पुरावा म्हणून वापरण्यात येतील ...
त्रिवार निषेध ...
रेवती धन्यवाद गं बनवून बघीतलेस आणि कळवल्याबद्दल :) सध्या मी भारतवारीत बिझी आहे म्हणून मिपावर येणं फारसे जमत नाही.
सूड तू केलेला बदल आवडला आहे , मी सुद्धा पुढल्या वेळेस असे ट्राय करून बघेन, फोटो भारी आलाय :)
कालच करुन बघितली. एकदम सोपी आणि सुन्दर आहे. धन्यवाद!