पाककृती

चीज मश्रुम्स

Primary tabs


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)

साहित्य : अळंबी (मश्रुम्स) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(ही पाककृती अंड न घालताही करता येईल. ;) अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात विरघळुन वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.

कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.

तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.

चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.


.

.

वेताळ

रविवार आज चांगला जाणार ह्याची खात्री आहे.

पैसा

>>काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे.
आणखी कुठे जाणार? :D

फक्त मश्रूम आणायला हवे आहेत!

सहज

चला फुटबॉल मॅचेस बघताना सोय झाली.. :-)

सोबत आईस्क्रीम

छोटा डॉन

सहजरावांशी सहमती.
अर्थात रात्री १२ वाजता असले काही करणे जमणार नाही .... इन्फॅक्ट ह्या जन्मी असले काही करणे जमणार नाही ह्याची खात्री आहे.
शेवटचे २ फोटो मात्र जबर्‍या !

- (फूट्बॉलप्रेमी) छोटा डॉन

jaypal

रसगुल्ल्या सारखा दिसतो आहे.गंपादादा रेशीपी लै बेश्ट, शेवटच्या फोटो कडे आधाश्या सारखा बघत हा प्रतिसाद टंकतोय. (सोकाजीरावांचे एखादे कॉकटेल, सोबत चिजमश्रुम आणि बाहेर धो धो कोसळणारा पाऊस काय खतरा काँबिनेशन असेल हे)

सागर

तू अजून ऑनलाईन काय करतोयेस रे सुहास?
मला वाटले होते आजपासूनच तू (पार्टीच्या अगडबंब बिलाच्या भितीनं) गायब होशील उद्या काय आहे माहिती हाय नव्हं ;)

तर्री

फोटो पाहूनच हे "स्थळ" पसंत पडले आहे,

योगप्रभू

अळंबीचं काहीपण द्या हो. आमच्यासारखी गुरं गपगुमान चरत्यात.
लई भारी. जीवाला गार वाटलं :)

पियुशा

मला मश्रुम आवडत नाहीत :p
दुसरा काय पर्याय वापरता येइल बरे ?

गणपाभौ तुमच्या पा.क्रु. च्या फोटुसाठी तुम्हाला +१०००००००००

सही रे सई

दुसरा काय पर्याय वापरता येइल बरे ?

गणपाभौ तुमच्या पा.क्रु. च्या फोटुसाठी तुम्हाला +१०००००००००

माझा पण +१

चिंतामणी

खाउन बघ एकदा. शाकाहारी प्रकार आहे.

बादवे तुला पनीरसुद्धा आवडत नसेल. बरोबर????????

आवडत नाही म्हणल्यावर आपल्या पुर्वजांनी तयार केलेल्या म्हणी डोळ्यासमोर यायला लागल्या.

पियुशा

@ चिं.का
बादवे तुला पनीरसुद्धा आवडत नसेल. बरोबर????????

नै नै नै ......................
हायला चिंका काका पनीर जीव की प्राण आहे आपला :)

बहुगुणी

चीज, तेल, अंडी....डॉक्टरांनी 'नियंत्रणात ठेवा!' म्हणून सांगितले आहेत अश्या कॅटेगरीतले तीन पदार्थ असे अटळपणे सामोरे आणलेस, विकेट पडली ना! आता करून पहाणारच (आणि खाणारच!)

मराठमोळा

जबर्‍या..
गणपाशेटने बर्‍याच दिवसांनी पण एकदम खतरनाक चखणा बनवलाय.. ;)
करायचा प्रयत्न करतो पुढच्या वीकांताला. :)

मदनबाण

शॉलिट्ट !
मी मश्रुमची भाजी खाल्ली आहे,पण हा प्रकार त्याहुन टेस्टी दिसतोय ! :)

पदार्थ दिसतोय कसला जबरा :)
पण मश्रुमची अ‍ॅलर्जी असल्याकारणाने पास :(
फोटो तर क्या बात :)

वेलकम बॅक गणपाभौ :)

पिंगू

कालच तर मशरुम-सोयाबीन भाजी हादडली.. आता पुन्हा हा आयटम म्हणजे बहार आहे.. जय गुरुदेव... ;)

- पिंगू

रेवती

पाकृ आणि फोटूनं अगदी मजा आणलीये.
आज किती दिवसांनी स्वातीताई आणि गणपा यांनी जुने मिपाचे दिवस परत आणले.
धन्यवाद.

लै लै लै म्हणजे लै जबराट लागत असल,ह्ये मशरूमचं श्टार्टर...

आम्हा गवताळांची सोय केल्याबद्दल धन्यवाद.... ;-)

सोत्रि

खरेतर हा धागा उघडायचा नाही असे ठरवले होते पण....
ज्यासाठी उघडायचा नाही असे ठरवले होते तेच झाले :(

- ( सध्या रस्सम भाताशिवाय पर्याय नसणारा) सोकाजी

स्मिता.

जबरा पाकृ आणि फोटो आहेत. शेवटचे फोटो बघून तर प्रचंड जळजळ झाली.

प्यारे१

गणपा 'एकटा' (बॅचलर) झाला...! :(
बिच्चारा!

ही सहानुभूति फोटो पाहून झालेली जळजळ शमवण्याचा एक प्रयत्न आहे हे नम्रपणे लक्षात घ्यावे.

उदय के'सागर

व्वा व्वा... गणपाभौ...येक नंबर!!! आणि वेलकम बॅक.... :) शिवाय शाकाहारी पाकृने वेलकम बॅक केल्याने खुप आनंद झालाय....

बाकि पाकृ, फोटो बद्दल तर शब्दच अपुरे आहेत... क्या बात!!! असेच येत रहा!!!

sneharani

फोटो अन् पाकृ. अगदी मस्त.
आता स्वयंपाक घरात गेलाच आहात तर येऊ देत आणखीन पाककृती.
:)

नाना चेंगट

हलकट शिरोमणी !! :)

प्रास

गणपाशेठ, हा धागा मी उघडून पाहिला नि वाचला.

याची इथे नोंद करत आहे.

जागु

खतरनाक...

करुन पहावी लागेल आता ही रेसिपी.

सागर

शाकाहारी माणसांची चंगळच आहे. मांसाहारी लोकांना जसा चिकन लॉलीपॉप असा पर्याय आहे. तशीच शाकाहारी माणसांची मिटक्या मारत खायची चांगलीच सोय केलीस की रे मित्रा तू.. ;)

नेहमीप्रमाणेच सगळे फोटू जबर्‍याच. पण सजावट आणि कलाकुसर अगदी खास गणपा श्टाईलची (कुशल बल्लवाची )

बाळ सप्रे

झक्कास!!
सजावटीसाठी वापरलेला केशरी रंगाचा पदार्थ काय आहे?

गणपा

रंगाचा पदार्थ

ती लसणाची चटणी आहे. फ्लॅशमुळे थोडी केशरी दिसतेय. :p

चिंतामणी

लै भारी रे. चुकलेले (चिज मश्रुम) पोटात घ्यायला तयार आहे. तु पदार्थ नुसते फटुत दाखवतोस.

निश

गणपा साहेब, पहिल्याप्रथम अभिनंदन परत आलात त्याबद्दल. तुम्ही मिपाचे सचिन तेंडुलकर आहात रेसिपी विभागातले.

आता तुमची रेसिपी एकदम अप्रतिम. वाफाळता चहा , चिज मश्रुम व बाहेर धो धो पाउस व संताजी हे संताजी घोरपडे महाराजांवरची कादंबरी मस्त एकदम मस्त बेत.

JAGOMOHANPYARE

आमच्या गावात कांदा, बटाटा , वांगं, भेंडी आणि पालक एवढेच मिळते.... यातलं काय वापरुन करता येईल का?

गणपा

नाही, रोहन या पाककृतीत खायचा रंग नाही वापरला.
माध्यम ते लहान आचेवर तळल्यास रंग ही चांगला येईल आणि मश्रुम्स शिजतीलही.

धागा वर आलाच आहे तर सर्व खवय्या वाचक आणि प्रतिसादकांचे आभार मानुन घेतो. :)

भाते

तुमची ही पाकृ करण्याचा मी प्रयत्न केला. तुमच्याइतकी छान तर नाही पण काही दोस्तांना मी (चकणा म्हणुन) बनवलेली पाकृ आवडली. अर्थात हे श्रेय माझे नसुन मिपावरचे गणपा ह्यांचे आहे हे मी दोस्तांसमोर नम्रपणे नमुद केले.
मिपाचा वाचक असताना तुमची हिच पाकृ बघुन मला मिपासदस्य व्हावेसे आणि कधीतरी हि पाकृ बनवुन बघावी असे वाटले. आता तुमच्या बाकीच्या पाकृ बनवण्याची हिंमत करायचा विचार आहे.
असेच कृपार्शिवाद असु द्या.