कलादालन
पिपल्स आर्ट : एक चित्रप्रदर्शन वृत्तांत.
Primary tabs
बसमधून जाताना पीपल आर्ट , डब्लीन चे चित्रप्रदर्शन हया छोटया जाहीतीने माझे लक्ष वेधले आणि ऑफिस चे बाजूला सारून शोधाशोध सुरु केली. गुगल बाबा कधीही निराश करत नाही. त्याने क्षणार्धात वेबसाईट शोधून काढली (http://www.peoplesart.ie/) आणि मग शनिवारीच हे चित्र प्रदर्शन आहे हे समजले , आणि मग जायचा बेत पक्का केला.( खरे तर ते फुकट आहे हे समजले तेंव्हा बेत पक्का झाला). इतर अनेक विषयांप्रमाणे चीत्रकले मधलेही मला काही कळत नाही , पण जावेसे वाटते. तसे गाण्यातातले तरी कुठे काही कळते , पण मैफिलीना जायचा शोक मोठा !
चित्रकले विषयी माझ्या मनात गोडी तर सोडाच पण तिटकाराच होता. “अश्वथाची सळसळ “ हे ज्ञानेश्वर नाडकर्णीचे पुस्तक वाचले आणि प्रथम चित्रकलेविषयी रुची निर्माण झाली. मग २/३ प्रदर्शने पहिली आणि मग हळू हळू चित्र कला अपील होवू लागली.
एका मोठया पार्क च्या २ बाजूना हे प्रदर्शन होते. आपल्या कडे जसे आठवड्याचे बाजार भारतात तसेच रुपडे हया प्रदर्शनाचे. भिंती वर लावलेली असंख्य चित्रे आणि समोर शेकडो पसरलेले चित्रकार ! मोठे विलोभनीय दृश्य होते. पहिला फेर फटका “सीजन” कसा आहे ? ते पाहण्यात मारला आणि प्रदर्शनाने मनाचा ताबा घेतला.
चित्रकला किती अंगानी मानवी जीवनाला स्पर्श करते ते हया प्रदर्शनात प्रथम समजले. किती विषय असावेत चित्रांचे ? माय गुडनेस ! आयर्लंड हे बेट आहे ,आणि म्हणूनच समुद्रकिनारे , दीपस्तंभ , मासे , होडया , कोळी , मासे बाजार हे अनेक चित्रकारांच्या चित्राचे विषय होते. प्रत्येक कलाकाराला आठ ते सोळा फुटापर्यंत जागा मिळते , त्याचे भाडे २५ युरो इतके माफक ! मग ज्याच्या त्याच्या चित्र-प्रपंच ८ -१६ फुटात मोठया थाटात मांडलेला होता.
एक डॉक्टर चित्रकार होते आणि त्यांनी निरनिराळ्या ऑपरेशन्स ना चित्रामधून बोलके केले होते. शास्त्र आणि कला याचा सुंदर मिलाफ ! निसर्ग चित्रे , आयरिश निसर्गाची इतकी रूपे दाखवणारी होती की जणू सगळे कृतू पर्यटकांना एकदम पाहायला , अनुभवायला मिळावेत. एका चित्रात बर्फातून चालणाऱ्या एका शाळकरी मुलीच्या चेहऱ्या वरचे मुग्ध भाव मला खिळवून ठेवत होते. पण अजून बरीच चित्रे पाहायची होती म्हणून तिला बाय केले .
स्त्रियांची नग्न चित्रे हा तर अनेक चित्रकाराचा आवडता प्रांत. मी अमृता शेरगिलने केलेले स्वतःचे नग्न पोर्ट्रेट सोडता ही चित्रे पाहण्याची , समजण्याची मोकळी दृष्टी मला नाही. त्यामुळे ही चित्रे ऑप्शन ला पडली. पण एका ठिकाणी एक नग्न चित्र आणि चित्रकर्ती ह्यांच्या चेहऱ्यातील विलक्षण साम्य जाणवले. ही आपल्या दृष्टीने भलतेच धाडस नाही का ? पण ती तिशीतली चित्रकार मोठया विनम्रतेने बोलत होती.
हया उन्हाळ्यात हवामान विचित्र आहे आणि पावसाचा काही नेम नाही. आकाशात ढग गर्दी करत होते आणि उघडया वरचे हया प्रदर्शनाचे काय होणार पावसात काय होणार ? ह्याची मला चिंता लागली होती. पण त्याची तरतूद असणार ! कारण चित्रकार मंडळी निर्धास्त दिसत होती.
फुलांची अगदी साधी साधी चित्रे. चित्रकाराला काय सांगायचे आहे ह्याचा डोक्याला ताण न पाडणारी ! प्रसन्न करणारी रंगीबेरंगी फुले ! अनेक प्रकारची रंगाची आणि आकाराची फुले ! एका चित्रकाराचे “सन फ्ल्वावर फार्म” नावाचे एक चित्र मला जाम आवडले. (भीत भीत किंमत पाहिली २२५ युरो ). आकाशात सूर्य आणि ही अगणित सूर्य फुले. एकच पिवळा रंग पण त्याचे किती प्रकार असावेत !
फळे विशेषता: सफरचंद हा अनेक चित्रांचा विषय होता.
आता पाउस पडायला सुरवात झाली. चित्रकारांनी पटापट चित्रे प्लास्टिक ने झाकायला सुरवात केली. रसिक ही त्या पारदर्शी प्लास्तीकातून , बुरख्यातल्या तरुणी सारखे चित्राकडे पाहू लागले. हया पावसाला इतका गृहीत धरला आहे लोकांनी. कमाल वाटली.
चित्रांचे फोटो काढायची परवानगी मागितली तर काहींनी आनंदाने दिली तर काहींनी नम्र तर काहे स्पष्ट नकार ! जमतील तेवढे फोटो घेतले . पण त्यात काही मजा नाही. चित्रकार विजीटीग कार्ड , वेब साइट , काटलोग दाखवून आपली विक्री वाढवत होते. पण तशी फार खरेदी होत नव्हती. कदाचित रसिक ऑन लाइन खरेदी करत असतील.
डब्लीन हे एक सुंदर शहर आहे ,आणि त्याच्या विविध भागांचे दर्शन चित्रातून झाले.
आता पाउस चांगलाच पडू लागला होता. त्यामुळे नाइलाजाने निघावे लागले. उद्याचा शेवटचा दिवस आहे. पाहूया जायला जमते का ?
फोटो देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
निसर्ग चित्रे
अनेक समुद्र चित्रांपैकी दोन
आपल्या मस्तीत कलाकार एक सिगारेट शिल्गावणारा एक कॉफी वाला
डब्लीन व इतर

वा! रोचक वृत्तांत. आवडला. छायाचित्रे खूप आवडली.
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट - म्हणजे काय याचे प्रत्यंतर त्या २ लहान मुलांचे पाण्यात खेळतानाचे चित्र पाहताना आले.
वा वा छानच.
अशीच आणखी प्रदर्शने बघून मिपावर देत रहा.
चित्रकलेवरील एक धागा:
http://www.misalpav.com/node/21954
छान लेख. सोबतची चित्रं पण फार छान आहेत. काही तर फोटो वाटत आहेत इतकी जिवंत चित्रं काढणार्या चित्रकारांना साष्टांग नमस्कार!
अवांतरः गाण्यांबद्दल लिहायचं लक्षात आहे ना?
पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटतं - लोकांच्या हातात काय कला आहे!!
अप्रतिम(awesome).
छान! खूप आवडले.
असे प्रसंग चुकवू नयेत असेच असतात..
संकेत स्थळावर माहिती पण छान दिली आहे.
पाच आणि सहावे छायाचित्र जरा गंडले आहे. मिपावर टाकताना अस्पेक्ट रेशो बदलून बघा. (उभे असल्यास ४०० x ६०० वगैरे)
मस्त प्रयत्न. लहान मुलांचे पाण्यात खेळतानाचे चित्र खरंच क्लास आहे.
आपल्याकडे मुंबईत, जहांगीर कलादालनाबाहेर आहे अशी गॅलरी. होतकरू चित्रकारांची उत्तमोत्तम चित्रे पाहायला मिळतात तिथे. अनेकदा चित्र काढत बसलेले कलाकारही दिसतात. मात्र (मुंबईच्या) पावसाळ्यात ही बहुधा बंद असते.
नशिबवान आहात.
वर्णन व छायाचित्रे आवडली.
>>इतर अनेक विषयांप्रमाणे चीत्रकले मधलेही मला काही कळत नाही , पण जावेसे वाटते
सहमत.. लहानपणी चित्रकलेत चांगला होतो, पण ते कसब पुढे काही नेता आलं नाही. आता चित्रांमधे नक्की काय पहायचं असतं हे माहित नसून ही चित्रे मनाला भावून जातात. जशी तुम्ही इथे दिलेली चित्रे. रस्त्यातही येता जाता बरेच हौशी कलाकार स्वतःची कला मांडून बसलेले असतात, मन त्यातही कधी कधी लहान मुलासारखे रमून जाते.
चित्रे आवडली. :) धन्यवाद.
छान वृत्तांत
सर्व प्रतीसादाकांचे मनापासून आभार .