कलादालन

रवीतेज

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त). चित्रांची अनुक्रमणिका: १) दिवे आगर, कोकण - जून २००७ २) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४ ३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११ ८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११ १०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७ ११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८ १२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८
मराठमोळा

वा वा फोटु एकदम मस्त..
पहिला फोटु पाहुन मनात आलंच होतं की दिवे आगार चा असेल म्हणून आणि खाली वाचलं तर तेच निघालं..
बाकी तो सॅन फ्रँसिस्को वाला फोटु "फिशरमन्स वार्फ" वरुन घेतलाय का?

धन्यवाद ममो!

सॅन फ्रँसिस्को वाले छायाचित्र कॉयट टॉवरवरून काढले आहे.

खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल.

मराठमोळा

अच्छा..
>>खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल
नाही बुवा. अवघड आहे.. तसं मग खडकवासला / नाशिकचं ओझरखेड/ ऊटीचा तलाव यापैकी काहीतरी असावं

जोशी सर,
खालुन तिसरा शिवाजी सागर अर्थात कोयना धरणाच्या पाण्याचा फोटो आहे का?

पैजारबुवा - कृपया सर म्हणू नका हो. श्रीरंग / रंगा / रंग्या / श्री यापैकी काहीही म्हणू शकता...

(आदेश बांदेकर ताक धिना धीन इष्टाईल मध्ये) उत्तर चुकलेलं आहे.

जोशी सर,
थोडा चुक्याच, पानशेत चा तलाव आहे तो नक्कीच
(म्हणु द्या हो जोशीसर, त्या मागे बर्‍याच आठवणी आहेत आमच्या. अर्थात तुम्हाला आवडत नसेल तर नाही म्हणणार)

सर एकतर गुरुजनांना म्हणावे अथवा कर्माने किंवा वयाने ज्येष्ठ व्यक्तींना म्हणावे. मी कशातच बसू शकत नाही.
विशेषकरून तर इथे तर एवढी मोठी माणसे आहेत की आपल्यासारख्यांचे नशीब त्यांचा सहवास लाभतोय.
त्यामुळे कुणी सर असे संबोधले तर कानकोंडे वाटणारच.

५० फक्त

मस्त खुप छान आहेत फोटो आणि आवडीचा विषय फोटोंचा धन्यवाद.

चित्रगुप्त

विशेषतः अगदी खालच्या फोटोत वरच्या गडद निळ्या रंगापासून हळूहळू खालच्या पिवळ्या-नारिंगी-तपकिरी रंग-छटांपर्यंत होणारे बदल खूपच भावले.

हे ठिकाण म्हणजे एक डोंगराएवढा उंच खडक आहे.त्यावर चढून जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी पोचलात तर सूर्यदेवाच्या कृपेने फारच रम्य सोहळा बघायला मिळतो.

एमी

छान आहेत सगळे फोटु!
खालुन तीसरा मानस, मुळशी किँवा गोवा???
(सगळे मटके मारलेत ;-))

मटके चुकलेत, पण जवळपास आहात त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करा...

एमी

अर्रर्र चुकले मटके : - (
लोणावळा?? गणपतीपुळे??
अजुनच दुर गेले का?? हे हे हे

वल्ली -एकदम अचूक उत्तर दिलंत.

वर ममोंनीही दिलं होतं पण ते ३ पैकी १ असं होतं. त्यामुळे खात्रीशीर अचूक उत्तर देणारे तुम्ही पहिलेच.

पुण्यात राहणाऱ्या वयाने व मनाने तरुण असणाऱ्यांसाठी हे प्रिय असे स्थळ आहे.

अमृत

सोबतीला तुमचा(तुझा म्हटलं तर चालेल?) मिपावरील 'यत्र तत्र सर्वत्र' संचारपण आवडला :-) ;-)

अमृत

बॅटमॅन

सर्व फोटो लै भारी आहेत. क्षणभर नाव वाचून धागा तेलुगु हीरो रवीतेजा बद्दल आहे की काय, असे वाटले :)

शीर्षक काय द्यावे यावर विचार करत असताना, 'हा खेळ सावल्यांचा' हे गाणे आठवले.

~ हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा..

वाह, काय गीत आहे!!
मला तरी हेच शीर्षक समर्पक वाटले.

रा. रा. चित्रपट पहावा लागल्यामुळे रवीतेजाबद्दल बराच संताप निर्माण झालाय...

बॅटमॅन

शीर्षक समर्पक आहेच. रवीतेजाबद्दल माझे मत "एक अभिजात पानपट्टी हीरो" असे आहे ;)

Pearl

छान फोटो.
विविध रंगांची उधळण असलेले ३ ते ९ फोटो जास्त आवडले.

मलाही ते अधिक आवडतात. क्र. २ तर साध्या रीळवाल्या कॅमेऱ्याने काढून नंतर स्कॅन (मराठी शब्द?) केलेला आहे.

माझ्या अनुभवानुसार, अमेरिकेत भारतापेक्षा अधिक सुंदर सूर्यास्त दिसतात. कदाचित कर्कवृत्तापासून अधिक उत्तरेला असल्याने वगैरे असावे. काही महिन्यांपूर्वी जालावर कुणीतरी मराठीत नॉर्वेच्या सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन लिहिले होते. तो देश तर उत्तर धृवाच्या अधिकच जवळ आहे.

तरी देखील ३ ते ९ मध्ये एक खडकवासल्याचा आहेच :-).

सर्व प्रतिक्रियांबद्दल आपले मनापासून आभार. धागा प्रकाशित करताना खालील छायाचित्र नेमके राहून गेले.

"अंताकडे निघालेल्या सूर्यनारायणाचे तेजोमय रूप पाहून मला वाटले की कर्तृत्ववान माणसे सूर्याप्रमाणेच माध्यान्हीच्या काळात प्रखर तेजाने तळपत असली तरी अडचणीच्या समयी त्यांचे तेजस्वी रूप बघण्यासारखे असते. "

धाग्यात उल्लेखलेल्या काकासाहेब गाडगीळांच्या पाठात वरील वाक्य होते. ही शब्दरचना मी माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर जुळवली आहे त्यामुळे जशीच्या तशी नाहीये. पण हे वाक्य माझ्यासाठी आजही तेवढेच प्रेरणादायक आहे जेवढे प्रथम वाचल्यावर होते.

दिपक

श्रीरंगराव फोटो आवडले.

सुधीर

सगळेच फोटो छान! वरून ५वा आणि खडकवासलाचा विशेष आवडला.

चौकटराजा

आता आय एस ओ १२००० पर्यंत सेन्सेविटी असणारे कॅमेरे आलेयत. त्यामुळे लो लाईट फोटो
ही रेखीव यायला मार्ग मोकळा झाला आहे. सूर्यास्त व सूर्योदयाचा सुंदर फोटो हा अप्राप्य राहिलेला नाही. तेंव्हा यात आता थीम महत्वाची रहाणार आहे यापुढे .आपले पहिले दोन फोटो हे सामान्यतः कोणीही काढू शकतो असे आहेत. पण बाकीचे फोटोत आपण एकेक इतर विषयही घेतला आहे. काहीत एकटा ढग, काहीत सिटी स्काय लाईन, काहीत हिल स्केप ,त्यामुळे हे सर्व फोटो काहीतरी बोलतात आपल्याशी. हे आपले यश आहे.

कारण आता तांत्रिक गुण सर्वांच्याच फोटोत येणार आहेत. बोलणारे फोटो हा येणारा जमाना आहे. आपल्या या धाग्याला मी " बोलकी क्षितीजे" असे नांव देतोय. रंगा खुष ?

चौरा सर - आपल्या वस्तुनिष्ठ प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
हो या क्षेत्रात खूपच शिकणे बाकी आहे अजून. आपले मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल.

चौकटराजा

रंगा फोटूग्राफर, आम्ही मार्गदर्शन काय करणार कप्पाळ ? आमचीच फोटूग्राफी अजून अडखळत चालू आहे. त्यातील एक फोटो डकवतोय. हा बोलका वाटतो का ब्वॉ ?

चौरा - सही आहे हे छायाचित्र. छायाचित्रातील व्यक्ती जर गतिमान असतील तर छायाचित्रकाराच्या नाकी ९ येतात.

स्पा

वा कसले क्लास फोटु आहेत.

एस

हा धागा अद्याप पाहिला नव्हता. सुंदर छायाचित्रे आहेत. चौरांनी काढलेला सूर्यास्ताचा लहान मुलांचा फोटोही सुरेख आहे.

महासंग्राम

वाह २,३,४ या फोटोमधले रंग अतिशय सुरेख, कोणता कॅमेरा वापरलात. आणि शक्य असल्यास exif दिलेत तर अजून अभ्यास होईल आमच्या सारख्या शिकाऊ विद्यार्थ्यंचा

नव्याने प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणार्‍या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मंदार - दुसरा फोटो २००४ साली साध्या रोलवाल्या कॅमेर्‍याने काढलेला आहे. प्रिंटेड फोटो स्कॅन करून तो अपलोड केला होता. तीसरा व चौथा फोटो कॅनॉन पॉवरशॉट एसएक्स ३० आयएस या पॉइंट अ‍ॅन्ड शूट (झूम) कॅमेर्‍याने काढले आहेत.

त्यांचे EXIF खालीलप्रमाणे

  • f/5 1/1000 ISO80
  • f/5 1/1000 ISO250

बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.

रमेश आठवले

फार सुरेख फोटो. हा धागा निसटला होता. आत्ताच पाहिला. -वसंतरावांच्या तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज -ची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0

Jack_Bauer

खूप सुंदर फोटो आहेत.