पाककृती

अंडा कबाब / टिक्की (एक झँटामेटीक अन क्विक रेसेपी )

Primary tabs

अंडा कबाब / टिक्की (एक झँटामेटीक अन क्विक रेसेपी )

साहित्य : -
१. उकडलेले अंडे ४ ,
२. उकडलेले बटाटे मध्यम ३ ,
३. लाल तिखट १ चमचा.
४. गरम मसाला १ चमचा
५. धने पावडर १/२ चमचा.
६ . चिकन मसाला १ चमचा.
७. मटण मसाला १ चमचा.
८. मॅगी सब्जी मसाला १ चमचा.
९ . मीठ चवीनुसार.
१०. कोथिंबीर बारीक चिरून.
११. ब्रेड क्रम्स ( गरज वाटली तर )

कृती : बटाटे अन अंडे एकत्र स्म्याश करून घ्या .

आता त्यात सर्व मसाले ,मीठ अन कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान कुस्करून घ्या

आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या .

अन आता थोड्या तेलात तव्यावर / पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या >

झाले .अंडा कबाब तय्यार !

अंड अन बटाटा ? कॉम्बीनेशन ऐकायला जरी विचित्र वाटल तरी खायला एकदम चविष्ट लागतात बरे हे कबाब ;)
( विशेष आभार : माझी वहीनी सौ .अश्विनी :) )

सुहास..

आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या .>>

हे चुकुन आता छोट्या हातावर टिक्क्या करून घ्या असे वाचले ;)

पाकी पाकृ मस्त च !!

( ईमामपुरा वरून साभार आली वाटत पाकृ ;) )

प्रास

धागा वाचला.
अंड खात नसल्याने केवळ पियुच्या शतकी धाग्याच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रतिसाद देत आहे.
व्यंजन चविष्ट असावे पण माझा पास.... :-)

नाना चेंगट

हे वैदिक पद्धतीने कसे करावे?

नाना चेंगट

हे वैदिक पद्धतीने कसे करावे?

मृत्युन्जय

खरय. वैदिक पद्धत सांगितलेली नसल्याने माझ्याकडुन देखील पास.

sneharani

छान ग, चवीला कसे झाले होते कबाब? तु खाऊन पाहिलेस का? ;)

शुचि

हो ग पियु चव छान असते का? वाटते खरी म्हणजे :)

पियुशा

@ स्नेहा अन शुची तै
मी अंड खात नाही , बाकीच्यांनी सांगितले कबाब भारी झाल्येत म्हणुन;)
तुम्ही दोघी करा अन मला सांगा कसे झाल्ये ते :p

स्मिता.

आधी हा प्रकार खाल्ला नाहीये पण अंडी, बटाटे आणि तर मसाला आहे तर छानच लागत असणार. एखादे वेळी स्नॅक्स करता करून बघेन.

कबाब एकदम लजीज दिसत आहेत पियुडे :)

बटाटा आणी अंडे मस्तच लागतं :) आजच करणार हे :)

चांगला प्रयोग आहे... फलितही चांगले असणार... उत्तम...उत्तम...उत्तम...!
अशीच पाक-कुशल प्रगती होत राहो. हा आशिर्वाद....आपलं सॉरी...भगवंता चरणी प्रार्थना ... ;-)

अ-वांतर-या पाक-कृतीत कुणाचा हात आहे...? ;-)

michmadhura

रविवारी सकाळी न्याहरीसाठी करायला उत्तमच. :-)

श्रावण मोडक

अंडं आणि बटाटा स्मॅश केले असल्याने एकूण प्रकार पटला (एरवी कबाब आणि तोही अंड्याचा हे डोक्यावरूनच चालले होते). खाल्ल्यावर पुढचं ठरवू.
आता इथं हाटेलात कुठं हे मिळतं का हे पाहणं आलं. नाही तर प्रवास करावा लागेल.

पक्या

स्मॅश नाही हो म्हणत...मॅश म्हणा. स्मॅश आणि मॅश शब्दांचे अर्थ वेगळे आहेत.

@पियुशा - रेसिपी छान.

श्रावण मोडक

कृती : बटाटे अन अंडे एकत्र स्म्याश करून घ्या .

मी थोडं प्रमाणलेखन केलं.

गणपा

बटाटे स्म्याश करुन मॅश करायची पद्धत शिकुन घेतली पाहिजे एकदा. ;)

मराठमोळा

अरे वा.. वेगळीच पाकृ..
एकदा एका ढाब्यावर उकडलेले अंडे चकत्या करुन ते बटाटा भजी प्रमाणे तळुन मिळालेली डिश खाल्ली होती. ती आवडली होती. :)

रच्याकने
१. ही पाकृ अंडे न घालता कशी करता येईल?
२. या पाकृचे काही वैदीक वर्जन आहे का?
३. ही पाकृ सेक्सी पद्धतीने कशी करता येईल?
४. सदर पाकृ पुरुष सदस्याने केली तर चव तशीच येईल का?
५. स्त्री सदस्यांनी ही पाकृ मराठी आंतरजालावर केल्याचे काही स्टॅटीस्टीक्स आहेत का?
६. आयटी बायको असल्यास ही पाकृ कशी करावी याबद्द्ल तज्ञांचे मत काय?
७. या पाकृने बनवलेल्या पदर्थ खाण्याची कुणाला सवय लागल्यास त्यास ईंटरवेंशनची गरज भासेल का?
८. सती जाण्याआधी ही पाकृ केल्यास त्या विधीचे महत्व काय?

जाणकारांनी प्रकाश टाकून माझ्यासारख्या पामरांना योग्य दिशा दाखवावी. :)

आनंदी गोपाळ

जाणकारांनी प्रकाश टाकून माझ्यासारख्या पामरांना योग्य दिशा दाखवावी-->

दिशा (पांडे) पहावी.

ही दिशा अयोग्य वाटत असल्यास दरवाजातून बाहेर पडून वाम मार्गाने पस्तीस पाऊले चालल्यावर फाटा कुठे आहे ते दिसेल ;)

(हलके घ्या)

-स्वयं"प्रकाशित" आनंदी गोपाळ

सुनील

आजची खादाडी + आजची बायडी हे कॉम्बो डील फारा दिवसांनी दिसले :)

गेले ते दिन गेले :(

मराठमोळा

सुनीलरावांशी सहमत.

डॉक्टरसाहेब.. तुमची दिशा आवडली. :)

गणपा

एकदम भारी दिसतायत गं पाशवे पिवशे. :)

५० फक्त

अंडी आणि बटाटा हे न आवडलेल्या काम्बिनेशनपैकी एक आहे,त्यामुळे पास.

तुमच्या शाळेत इयत्ता दुशली ब मध्ये असला डबा चालतो का हो ?

पिंगू

अंडी असल्याने पास.. कारण अंडी खात नाही. पण एका मित्राला देतोय, त्याला नक्कीच आवडेल.

रेवती

फोटू चांगला दिसतोय पण शाखारी असल्याने माझा पास. ;)

शिल्पा ब

हरकत नाही. या पाकृत काय बदल करता येतील असा नविन धागा काढा.

JAGOMOHANPYARE

छान

आनंदी गोपाळ

बघायचीच असेल, तर वर फटू आहेत.
करून खा. नुस्ते बघून काय होईल?

manisha14

mala ithe kontich pakkruti disat nahiye fakt anda kabab naav disat aahe. :( koni madat karu shakat ka?

मनिषा -- अग ह्या वरच्या लोकांनी खाउन टाकले ना त्यामुळे तुला दिसत नाहीये :D