कलादालन
नाचण
Primary tabs
या पक्षाला बर्याच दिवसांपासून कॅमेर्यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले.
नावः नाचण.
स्थळः वसंत विहार. ठाणे
=======================================================================-

फोटो मस्तच आहे, पण त्याचे ते दोन दिसतात ते डोळे आहे का, बाहेर आल्यासारखे वाटतात. (बुरख्यातुन पाहतंय असंच वाटतंय) च्यायला, लैच वेगळा पक्षी दिसतो. जरा या पक्षाची जालावर काही माहिती आहे का, फोटोसहित वाचेन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरूटे साहेब.
ते डोळेच आहेत. याला इंग्रजीत फॅनटेल्ड फ्लायकॅचर म्हणतात.
माहितीबद्दल धन्यवाद. पक्षी आवडलाच आणि त्याचा फोटो घेण्यासाठीचे घेतलेले श्रम आणि कसबही.
मस्त, लगे रहो.
-दिलीप बिरुटे
खरच अत्यंत कठीण पक्षी फोटो काढायला..
पण याची खरी गम्मत पुर्ण फोटोत आहे.. शेपटीसकट..
आणखी फोटो काढलेत का त्याचे?
हा आहे त्याचा शेपटीचा फोटो
दोन्हीही फोटो मस्त...
अतिशय सुरेख छायाचित्रण, यासाठी लागणारे कौशल्य व संयम आपल्याकडे ठासून भरलेले दिसते.
अजून येऊद्या.
पहिल्यांदाच पाहतोय हा पक्षी. दोन्ही छायाचित्रे मस्तच.
हा पक्षी फार मस्त शीळ वाजवतो..
जबराच, संयमाला सलाम.
धन्यवाद मंडळी.
शैलेंद्र, तांबट मस्तच टिपलाय :)