जे न देखे रवी...
लावणी - प्रणयरातीला कुठे चालला
Primary tabs
रात चांदण टिपूर सांडल
वार्याचा बी साज नवा
प्रणयरातीला कुठ चालला
शृंगाराला सोडून या
नथनी पैंजण दूर ठेवल
कशास त्यांची भीड उगा
प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका
हाती माझ्या हात सख्याचा
अन् फुललेली रात हवी
नभांगणातील लाख चांदणी
प्रीत बघुनी जळल मनी
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
अस सामोर जाव रातीला
रोजच व्हावी रात नवी
नाव वाचून जरा बाचकतंच उघडली कविता, पण बरं झालं टाळली नाहि ते!
.....प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका
...
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी .....
हि कडवी मस्तच आहेत.
एक नविन कविता लिहली आहे
एक नविन कविता लिहली आहे
एक नविन कविता लिहली आहे
छान कविता आहे.
मस्त भाव मा॑डलेले आहेत.
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी .....
खरच हि कडवी खुपच छान आहेत.
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
हे खुपच भावलं....
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
अस सामोर जाव रातीला
रोजच व्हावी रात नवी
शेखर...
सुंदर आहे बाज लावणीचा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रयत्न छानच आहे.
अभिनन्दन
प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका
आहाहा काय सुंदर शब्द आहेत,
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
जिंकलस पुष्कराज. छानच लावणी.
पुण्याचे पेशवे
याला मस्त चाल द्या रे कोणीतरी...
चांगली झालीय... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/