Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बावीस जून!

ड
डॉ.प्रसाद दाढे
Sun, 06/22/2008 - 16:02
💬 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6473 वाचन

💬 प्रतिसाद (14)
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/22/2008 - 17:09 नवीन
आणि ते चाफेकर बंधू आमच्या चिंचवडचे होते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sun, 06/22/2008 - 20:13 नवीन
>>२२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. पुण्याच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना आहे. चापेकर बंधू प्रखर देशभक्तीने भारलेले सच्चे क्रांतिकारक होते. ह्याच घटनेवर बनलेला '२२ जून १८९७ ' ह्या लहानपणी पाहीलेल्या सिनेमाची आठवण झाली. अतिशय सुंदर सिनेमा होता. हा सिनेमा आठवला की 'गोंद्या आला रे आला ' ही आरोळी हमखास आठवतेच. '२२ जून १८९७ ' ला २ राष्ट्रीय आणि २ राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली होती. अवांतरः सिनेमाचे संवाद विजय तेंडुलकरांचे होते. दिग्दर्शन नचिकेत व जयू पटवर्धन ह्या जोडप्याचे होते. त्यांचे दिग्दर्शनातील हे पहिले पाऊल होते. ईश्वरी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 06/22/2008 - 20:29 नवीन
१९८० साली बघितलेल्या ह्या सिनेमातली 'गोंद्या आला रे!' ही आरोळी आजही आठवते. अत्यंत थोडक्या बजेटमधे, परिणामकारक सिनेमा कसा बनवता येतो ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. रवींद्र मंकणीचे मी पाहिलेले हे पहिलेच काम आणि मला ते फार आवडले होते. चापेकरांचे चरित्र इतक्या प्रेरकपणे ह्या सिनेमातून मांडले आहे की बस. फितुरीमुळे पकडले जाऊन त्यांना शेवटी फासावर जावे लागते ते बघून जीव गलबलला होता रक्त उसळलं होतं! ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). चतुरंग
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sun, 06/22/2008 - 23:49 नवीन
>>ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). माझ्या माहितीप्रमाणे कथा - पटकथा शंकर नाग व संवाद तेंडुलकर यांचे होते. पटवर्धनांचे दिग्दर्शन होते. त्यांचा कथा वा संवाद लेखनात सहभाग होता की नाही हे माहीत नाही. ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Mon, 06/23/2008 - 02:50 नवीन
चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/23/2008 - 06:31 नवीन
२२ जून : वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. सुर्यास्त सगळ्यांत उशिरा होतो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 06/23/2008 - 06:46 नवीन
नाही. २१ जुन हा सगळ्यात मोठा दिवस असतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विदुषक Mon, 06/23/2008 - 11:06 नवीन
एकाच घरातल्या ३ भाउ देशासाठी बलिदान देतात हे अजोड उदाहरण आहे धन्य ती चाफेकर माता !!! मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 06/23/2008 - 12:45 नवीन
चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..! - टिंग्या अवांतर - थोडेसे स्पेनच्या फुटबॉल टीमविषयी! :) १. दिनांक - २२ जुन १९८६ प्रतिस्पर्धी - बेल्जियम स्थळ - वर्ल्डकप (मेक्सिको) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! २. दिनांक - २२ जुन १९९६ प्रतिस्पर्धी - इंग्लंड स्थळ - युरोकप (इंग्लंड) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ३. दिनांक - २२ जुन २००२ प्रतिस्पर्धी - साऊथ कोरिया स्थळ - वर्ल्डकप (जपान/कोरिया) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ४. दिनांक - २२ जुन २००८ प्रतिस्पर्धी - इटली स्थळ - युरोकप (ऑस्ट्रिआ/स्विस) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये (अखेर) स्पेन विजयी! #:S हुश्श!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/23/2008 - 14:25 नवीन
जिंकले एकदाचे... भारी योगायोग आहे.... .. रेन रेन गो टू स्पेन... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
स
संजय अभ्यंकर Mon, 06/23/2008 - 16:18 नवीन
टिंग्या भाऊ, भन्नाट! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 06/23/2008 - 15:25 नवीन
वा वा टि॑गीसाहेब, चा॑गली माहिती दिलीत.. अजब योगायोग आहे..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/23/2008 - 16:29 नवीन
चाफेकर बंधूंवरचा तो सिनेमा पहायला शाळाशाळातून मुले नेली होती,आणि आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी शाळेतर्फे तो सिनेमा एकत्र पाहिला आणि एकत्रच भारावलो होतो,त्याची आठवण झाली. चाफेकरबंधूंच्या स्मृतीला प्रणाम! स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 06/23/2008 - 19:14 नवीन
एकत्रच भारावलो होतो!! हेहे !! मला पण तो सिनेमा आठवतोय.. खरंच भारावून जायचे मी.. स्पेनची माहीती मस्त आहे!! हेहे जिंकले एकदाचे ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा