जनातलं, मनातलं

पोर्ट्रेट्स इन पेन्सिल शेडिंग

Primary tabs

काही रेखाटने...

“द स्माईल”

The Smile

“बोल्ड”

Bold

“अमृता”

Amrita

एस

ती खानविलकरांचीच आहे. :)

स्पंदना

२ आणि ३ अप्रतिम!

१ मध्ये जिवनी आणि जबडा इम्बॅलन्स वाटतो.

वाईट वाटुन घेउ नका जे जाणवत ते मोकळेपणान लिहायची सवय आहे मला अन पारखी नजरही आहे.

स्वानन्द

बापरे!!! एवढं डीटेलींग!!! नुसते केस पाहिले तर ते हाताने काढले आहेत यावर विश्वासच बसत नाही. छायाचित्रच वाटतंय. बाकी पहिल्या चित्राबाबत अपर्णा अक्षय यांच्याशी सहमत.

बादवे, प्रत्येक चित्र काढायला किती वेळ लागला?

नगरीनिरंजन

अत्युत्तम रेखाटने.
तिसर्‍या चित्रातल्या ललनेचे केस पाहून असंच वाटलं.
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

किसन शिंदे

जबराट!!!

काय कला आहे राव तुमच्या हातात. खानविलकरांची अमृता एकदम डिट्टो दिसतेय.

सौरभ उप्स

मस्त आहे highlights , shadows आणि midtones चा balance ...... कीप इट अप...

अमृता चे डोळे अप्रतिम...

टुकुल

मान गये उस्ताद !!!

पहिल्या चित्रातले केस केवळ अशक्य वाटत आहेत पेन्सिल शेडिंगनी, त्याच बरोबर हातांनी किंचीत दाबला गेलेला पाय सुध्दा एकदम मस्त आलाय.
तिसर्‍या चित्रातली डोळ्याची बुब्बुळे तर कहर आहेत ___/\___

--टुकुल.

पहिली दोन रेखाटने एकदम ख ल्ला स !

तिसरे मात्र आवडले नाही. आमची खानविलकरांची अमृता येवढी भयाण नाही हो दिसत.

एस

अमृता खानविलकरांचा फोटो खूप वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळ च्या मुखपृष्ठावर आला होता. त्यावेळी कु. खानविलकरांनी कोणत्याही चित्रपटात वगैरे काम केले नव्हते व त्या प्रसिद्धही अजिबात नव्हत्या. मी तेव्हा केवळ तो फोटो आवडला म्हणून त्याचे चित्र बनविले. (ओळख पटत नसेल तर कृपया मला दोष देऊ नका . छायाचित्रकारांस द्या.. :) )
ही सर्व चित्रे फार जुनी आहेत. कु. खानविलकरांचे चित्र डिसेंबर २००४ मध्ये पूर्ण झाले. गेल्या कित्येक दिवसांत मी पेन्सिल शेडिंगवर काम केलेले नाही, कारण एकेक चित्र सहा ते आठ महिने घेते (सलग नव्हे...).

चौकटराजा

पहिल्या व तिसर्‍या चित्रातील केशसंभार अचाट ! अवघड आहे काढायला !
तिसर्‍या चित्रातील अमृता खानविलकरची ओळख अजिबात पटत नाही. व्यक्तिमत्वात नाक हे सर्वात महत्वाचे असून ते चुकले की ओळख हरवायला वेळ लागत नाही.
आपल्या व इतर सर्व चित्र व फोटोप्रेमींच्या साठी एक लिंक देत आहे. www.xaxor.com येथे सुमारे दहा लाख चित्रे असून विविध विषय तेथे उपस्थित आहेत.सर्वानी त्याचा लाभ घेऊन मला धन्यवाद द्यावेत हो !

चित्रगुप्त

धन्यवाद हो चौकट राजा साहेब. आत्ता फक्त साइट उघडली आहे, पण तिचे स्वरूप अचाट असणार, याची लगेच खात्री पटली. ही चित्रे मिपावरील धाग्यात वापरण्यासाठी कॉपीराइट वगैरेची भानगड आहे किंवा कसे, हेही कळवा.

राघव

खूप सुंदर.. आवडलेत.
येऊ देत अजून.

राघव

एस

सर्वांना धन्यवाद... माझी इतर चित्रे लोकांनी नेली. माझ्याकडे आता एवढीच उरली आहेत... :(

मी चित्रकलेचे कसलेच प्रशिक्षण घेतले नसल्याने चित्रे टिकावीत यासाठी चित्रांसाठी आम्लमुक्त कागद वापरावा लागतो हे सुरुवातीला माहीत नव्हते. त्यामुळे ही चित्रे आता खराब होऊ लागली आहेत. आंतरजालावर पेन्सिल शेडिंग करणारे इतर पाश्चात्य व्यावसायिक कलाकार शोधले असता ते वापरीत असलेल्या ब्रॅण्ड्सचा कागद इथे पुण्यात उपलब्ध नाही असे लक्षात आले आहे. यासंदर्भात मिपा वरील कलाकारांना काही माहिती आहे का. तसेच उच्च दर्जाचे चौकटकाम वाजवी दरात करून देणारी ठिकाणे पुण्यात कुठे आहेत कोणाला माहिती आहे का.

अशा काही तांत्रिक बाबींमुळे सध्या मी चित्रे काढत नाहीये.

आंतरजालावर पेन्सिल शेडिंग करणारे इतर पाश्चात्य व्यावसायिक कलाकार शोधले असता ते वापरीत असलेल्या ब्रॅण्ड्सचा कागद इथे पुण्यात उपलब्ध नाही असे लक्षात आले आहे.
तुम्हाला कुठल्या ब्रॅन्डचा आणि कसा कागद आवश्यक आहे ते (मी चित्रकलेतला अज्ञानी आहे हे ध्यानी घेऊन) सविस्तर व्यनि करा. आणि तुमचा पुण्यातला फोन नंबरही तुमची हरकत नसेल तर व्यनि करा.
आमच्या इथे मिळतो का ते बघतो. जर मला परवडण्यासारखा असेल तर काही काळाने पुण्यात येणार आहे तेंव्हा तुमच्यासाठी घेऊन येईन....
पण अशा गोष्टींपायी चित्रे काढायची थांबवू नका....

टुकुल

पिडाकाका सारखच मला पण व्यनी करा जर पेपर हवा असेल तर, पण जरा लवकर करा (१६ ऑगस्ट पुर्वी).

--टुकुल.

एस

पिडां, टुकुल आणि आनंद

धन्यवाद...
काही पाश्चात्य कलाकार उदा. लिंडा ह्यूबर वगैरे Nielsen Bainbridge, Strathmore, Arches, Canson & Montgolfier, Daler, Fabriano, Grumbacher, Guarro, Schoeller Parole and Whatman, वगैरे ब्रॅण्डस् चे कागद वापरतात, जे इथे मिळत नाहीत. बहुधा आंतरजालावरून मागवावे लागतील.
पण आधी काही नमुने प्रत्यक्ष पाहणे महत्त्वाचे आहे. मी इथे पुण्यात शोधेनच. काही माहिती मिळाल्यास व्यनि करेन... पुन्हा एकदा अनेक धन्यवाद...

स्वॅप्स

एस

सहजच लिंडा ह्यूबर ह्यांना ही चित्रे मेल केली होती. त्यांचे उत्तर अर्ध्या तासातच आले. त्यांनी काही शिफारसी केल्या आहेत -

Hi, Your work is great, you have wonderful tones and most all of your fine details are great too. The Nielsen Bainbridge illustration board is great, all boards take a little time to get used to. If you plan on keeping the artwork for many years always draw on good paper.

Here is a link to the drawing supplies I have been using.
http://midtel.net/~imaginee/drawing_supplies.html

Take care~Linda

त्यांचे उत्तर येईल असे मला अपेक्षित नव्हते... :)

तुम्हाला हवे असलेले कागद मिळाले.
तुमचा फोन नंबर संदेशातून पाठवा, पुढल्या आठवड्यात कॉन्टॅक्ट करीन.

चिगो

तुमचं डिटेलिंग जबरा आहे.. पहील्या आणि तिसर्या चित्रात केस अत्यंत सुरेख आलेयत.. पहील्या चित्रात त्या बाईची जीवणी जरा विजोड वाटते, पण माॅडेलच तशी असेल तर मग काय.. आणि अमृताचं नाकही जरा मोठं आलंय असं वाटतंय, पण तुम्ही म्हणताय तसा मुळ फोटोच बोंबलला असेल तर मग जाऊ द्या..

यशोधरा

सुरेख रेखाटने. पहिली दोन अफाट आवडली.
आता अमृताच आवडत नाही, त्यामुळे... :D पण त्याही रेखाटनात तिचे केस आणि डोळे जबर्‍या रेखाटले आहेत.

अशोक पतिल

अतिशय सुरेख !
पहिल्या रेखाटनात काय जबरदस्त सफाइ आली आहे , अप्रतिम !!!

जेनी...

जिवंत .

दुसरा अप्रतिम .
तीसरा छान .
पहिल्यात पूझिशन आवडली .पण चेहेर्‍यात विसंगती ..म्हणजे त्या बसण्याच्या स्थितिला चेहेरा उठावदार का वाटत नाहिय कुनास ठावुक .:(
कदाचित त्या चेहेर्‍यावरचे भाव नीटसे कळत नाहियेत मला .

बाकि उ त्त म .

चित्रगुप्त

चित्र वा फोटोवरून चित्रे करण्याऐवजी समोर वस्तु ठेऊन त्यांची चित्रे काढावीत, असे सुचवतो. उदा:

एस

एक दिवस नक्की.

अभ्या..

हे मात्र आवड्ल्या गेले.
१ नं. चे १ नं.
ग्रेट्च ऊदाहरण चित्रगुप्त साहेब.