दुसरा फोटो जास्त आवडला... बाकी फोटो ओके ओके वाटले....
सगळ्या फोटोस मध्ये एकसारखं focusing केल्यामुळे थोडी मजा कमी झालीये बाकी फोटोंमध्ये...
जरा जास्तच defocus झाल्यासारखे वाटले काही फोटो......
शैलेन्द्रजी,
रिवर्स लेन्स फोटोग्राफी ला अडॉप्टर ची फारशी गरज नसते. दोन प्राईम लेन्सेस (शक्यतो एकाच फोकल लेंग्थ च्या उदा. ५०मिमी फ१.८ घ्यायच्या. एक कॅमे-याला नेहमीसारखी लावायची, दुसरी लेन्स घेऊन तिच्या सीपीयू कॉन्टॅक्टस् च्या बाजूला एक छोटीशी स्प्रिंगने बंद होणारी कळ असते, ती ढकलून शेवटपर्यंत न्हायची व काड्यापेट्यांतील काड्या इ. खोचून ती तिथे अडकवून टाकायची (फिक्स करायची). त्यामुळे अपर्चर पूर्ण क्षमतेने उघडले जाते. लेन्समध्ये पाहून खात्री करावी. मग ह्या लेन्स ची पुढची काचेकडील बाजू मागे करून कॅमे-याला जोडलेल्या लेन्सच्या पुढे आणून अलाईनमेन्ट करून दोन्ही लेन्सेस एकमेकींना टेकवून फिल्टरच्या रिंगवरून चिकटपट्टीने जोडून टाकायच्या. आता कॅमे-याला जणू काही दोन्ही बाजूंना सीपीयू स्पर्शबिंदू असलेली एकच एक लेन्स लावल्याचे दिसेल. (इथे दोन्ही लेन्सेस एकसारख्या असलेल्या किंवा एकाच मापाचे फिल्टर्स बसणा-या असल्याचा फायदा होतो.)
दोन्ही लेन्सेस मॅन्युअल फोकसिंग मोडला ठेवाव्यात. मागील लेन्सचे अपर्चरसुद्धा पुढील लेन्सइतकेच ठेवावे. दोन्ही झूम लेन्सेस असतील तर दोन्हींचे नाभीय अंतर (फोकल लेन्ग्थ) सारखेच ठेवावे. पुढील लेन्सचा फोकस स्केलमध्ये पाहून सर्वात जवळ ठेवावा आणि मागील लेन्सचा फोकस इन्फिनिटीवर सेट करावा.
ज्या विषयवस्तूचा फोटो काढायचा आहे ती वस्तू पुढील बाजूस अगदी जवळ नेऊन पुढे-मागे नेत योग्य अंतरावर हाताने मागील लेन्सचा फोकस सेट करावा आणि क्लिकावा.
कॅमे-यावरचा पॉप-अप फ्लॅश वापरता मात्र येत नाही. विषयवस्तू (सब्जेक्ट) टॉर्च वगैरे वापरून उजळावी.
सुरुवातीला शार्प फोटोग्राफ्स घेणे अजिबात जमत नाही. पण मग जमायला लागले की मजा यायला लागते. विशेषतः फुलांच्या पाकळ्यांवरील, पुंकेसराच्या देठाच्या लवेवरील सूक्ष्म दवबिंदू फार चांगले येतात. पुढील फोटोंची वाट पहात आहे. शुभेच्छा...
आपला,
स्वॅप्स
ता.क. खास मॅक्रो लेन्स घ्यायची नसेल तर काही मॅक्रो फिल्टर्स बाजारात मिळतात. उदा. कॅनन ७७मिमी ५००डी क्लोजअप फिल्टर किंवा एक्स्टेन्शन ट्यूब इ. पण आधी रिवर्स लेन्स मॅक्रो तर करून पहा.
जबरी.
सॉलिडच आलेत फोटो.
"सच्चं भण गोदावरि पुव्वसमुद्देण साहिआसन्ती
सालाहणकुलसरिसं जइ ते कुले कुलं अत्थि ||"
मस्तं..
पण तो नाकतोड्या फोटोतच बरा!
बाप...रे! अगदी नाक तोडायला आल्या सारखा वाटतोय. ;-)
क्लास. तुम्ही फोटो घेत होता म्हणुन नाकतोडा शांत बसला होता की काय ;)
इतक्या जवळुन नाकतोडा कधीच पाहीला नव्हता.
घरातल्या पाशवी शक्तींनी नाकतोड्याला कॅमेर्याऐवजी झाडुने टीपायचा बेत केला होता.. मी नाकतोड्याला अभय दीले, आनी त्याने मला फोटो..
@मी नाकतोड्याला अभय दीले, आनी त्याने मला फोटो..>>>
आता स्माय्ल्या आवरा भटजी ब्वा..
अति वाटत..
असो.. फोटो आवडले
:)
दिसता घरी नाकतोडा फोटोग्राफीचा छद जोडा
छंद जोडा ऐवजी कंड शमवा, जास्त योग्य आहे..
मस्त आलेत फोटो !!
गळ्यातला नवीन हात कधी आणि केव्हढ्याला घेतलात ;) . पावसाळा सरेपर्यंत निघो ही सदिच्छा
लय महाग पडलाय.. आता काय बोलायचं..
त्या नाकतोड्यासाठी आणि वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह वा फोटोंसाठी :-)
अमृत
खूप छान....
दुसरा फोटो जास्त आवडला... बाकी फोटो ओके ओके वाटले....
सगळ्या फोटोस मध्ये एकसारखं focusing केल्यामुळे थोडी मजा कमी झालीये बाकी फोटोंमध्ये...
जरा जास्तच defocus झाल्यासारखे वाटले काही फोटो......
बाकी timing सोल्लिड जमलाय... कीप इत अप...
अगदी मान्य.. गड्बड अशी होती कि एका हाताने फोकसिंग करता येत नव्हतं.. त्यामुळे डिस्प्ल्येवर बघुनच काढावे लागले.
मस्त..:)
आयला एकच नंबर!!!
पण तो प्रार्थना कीटक (मँटिस) आहे का?
नाकतोडा (ग्रासहॉपर) वेगळा दिसतो.
हो .
आम्ही गवळण म्हणतो. एकसारख ताक घुसळत असल्यासारखे हात हलवते म्हणुन.
बाकी इतक निरखुन काय पहातोय तो नाक्तोडा?
लई भारी नाकतोडा!
छान... रिवर्स लेन्स फोटोग्राफी?
नाही.. विथ मग्निफायींग लेन्स..
झक्कास...
मी काढलेले एक प्रचि येथे देत आहे.
मस्तचं.. पण यासाठी अडाप्टर शोधायला हव ना...
शैलेन्द्रजी,
रिवर्स लेन्स फोटोग्राफी ला अडॉप्टर ची फारशी गरज नसते. दोन प्राईम लेन्सेस (शक्यतो एकाच फोकल लेंग्थ च्या उदा. ५०मिमी फ१.८ घ्यायच्या. एक कॅमे-याला नेहमीसारखी लावायची, दुसरी लेन्स घेऊन तिच्या सीपीयू कॉन्टॅक्टस् च्या बाजूला एक छोटीशी स्प्रिंगने बंद होणारी कळ असते, ती ढकलून शेवटपर्यंत न्हायची व काड्यापेट्यांतील काड्या इ. खोचून ती तिथे अडकवून टाकायची (फिक्स करायची). त्यामुळे अपर्चर पूर्ण क्षमतेने उघडले जाते. लेन्समध्ये पाहून खात्री करावी. मग ह्या लेन्स ची पुढची काचेकडील बाजू मागे करून कॅमे-याला जोडलेल्या लेन्सच्या पुढे आणून अलाईनमेन्ट करून दोन्ही लेन्सेस एकमेकींना टेकवून फिल्टरच्या रिंगवरून चिकटपट्टीने जोडून टाकायच्या. आता कॅमे-याला जणू काही दोन्ही बाजूंना सीपीयू स्पर्शबिंदू असलेली एकच एक लेन्स लावल्याचे दिसेल. (इथे दोन्ही लेन्सेस एकसारख्या असलेल्या किंवा एकाच मापाचे फिल्टर्स बसणा-या असल्याचा फायदा होतो.)
दोन्ही लेन्सेस मॅन्युअल फोकसिंग मोडला ठेवाव्यात. मागील लेन्सचे अपर्चरसुद्धा पुढील लेन्सइतकेच ठेवावे. दोन्ही झूम लेन्सेस असतील तर दोन्हींचे नाभीय अंतर (फोकल लेन्ग्थ) सारखेच ठेवावे. पुढील लेन्सचा फोकस स्केलमध्ये पाहून सर्वात जवळ ठेवावा आणि मागील लेन्सचा फोकस इन्फिनिटीवर सेट करावा.
ज्या विषयवस्तूचा फोटो काढायचा आहे ती वस्तू पुढील बाजूस अगदी जवळ नेऊन पुढे-मागे नेत योग्य अंतरावर हाताने मागील लेन्सचा फोकस सेट करावा आणि क्लिकावा.
कॅमे-यावरचा पॉप-अप फ्लॅश वापरता मात्र येत नाही. विषयवस्तू (सब्जेक्ट) टॉर्च वगैरे वापरून उजळावी.
सुरुवातीला शार्प फोटोग्राफ्स घेणे अजिबात जमत नाही. पण मग जमायला लागले की मजा यायला लागते. विशेषतः फुलांच्या पाकळ्यांवरील, पुंकेसराच्या देठाच्या लवेवरील सूक्ष्म दवबिंदू फार चांगले येतात. पुढील फोटोंची वाट पहात आहे. शुभेच्छा...
आपला,
स्वॅप्स
ता.क. खास मॅक्रो लेन्स घ्यायची नसेल तर काही मॅक्रो फिल्टर्स बाजारात मिळतात. उदा. कॅनन ७७मिमी ५००डी क्लोजअप फिल्टर किंवा एक्स्टेन्शन ट्यूब इ. पण आधी रिवर्स लेन्स मॅक्रो तर करून पहा.
छान.. हे टेक्नीक माहीत नव्हत, मी समजायचो कि दोन लेन्स जोडायला अडप्ट्र लागेल.
सध्या मग्नीफाइंग फिल्टर वापरतोय, लेन्सच्या पुढे लावायचे..