जे न देखे रवी...

जिवलगा...

Primary tabs

व्हायचं ते तसं होऊन गेलं आहे
फक्त आठवणी उरल्यात आता
कालचा दिवस केव्हाच संपला
आलीस सोडून तू काटेरी वाटा

समजायचं तसं ते एक वादळ होतं
आयुष्याला फिरवून ते निघून गेलं
किती खंबीर आहेस तू मनाने हेच
जाता जाता त्यानं जाणवून दिलं

वेदनांमधून सार्‍या बाहेर पड आता
एक छान हसरं आयुष्य दिसेल तुला
पुन्हा एकदा भर मनात उत्साह जरा
दिसेल जागोजागी प्राजक्त फुललेला

तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?

(ही कविता ऑन डिमांड पाडलेली आहे. अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील :D)

आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन

तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?

हे मस्तं

बाकी ठीक आहे. भाउ आता जरा आपला कविता पाडायचा साचा बदला की

"कितिही येउ देत" नंतर बर्‍याच कविता बहुतेक एकाच साच्यातुन आल्यातं काय याचापणं प्रोग्राम बनवला की काय दाब एंटर की पाड कविता (ह. घ्या.)

अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील

हे मात्र लय भारी (जोडधंदा चांगला आहे)

जिवलग (कोणाचा :? )चेतन

मयुरयेलपले

अशाच प्रकारच्या कविता तसेच चारोळ्या आमच्या इथे घाऊक तसेच किरकोळ दरात पाडून मिळ्तील ...

हे मात्र सांगुन आपण गद्य स्वरूपात पत्र लिहिणार्या प्रेमविरांसाठि नवे दुकान उघडल....

आपला गिर्हाइक..
आपला मयुर

विसोबा खेचर

तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये
माझी भाबडी साथ तुला चालेल का
तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य
जिवलगा, सांग मला मिळेल का ?

वा! छान रे सतिश....

तात्या.