कलादालन
आनंद सागर - शेगाव लई भारी...
Primary tabs
नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी...
प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी....
मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप...
खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास,
मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे..
उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा) कर्मचारी भक्त तसेच मुर्तीमय कलाकृती यांनी सजलेलं अस होत हे आनंद विहार...
फ्रेश होऊन दर्शनास गेलो... line मध्ये आनंदाने उभे होतो, line सरकतेय सरकतेय nd संपतच नाही... बघता बघता वेटोळे घेत घेत अखेर ४ तासाने दर्शन मिळाले आम्हास ते पण २ सेकंदाचे फक्त...
असो..
पण दुपारी परत आल्यावर जी ताणून दिली ती रात्रीच जाग आली..
एकूणच शेगाव च जेवण काही विशेष नवत साबुदाण्याची खिचडी सोडता.... साबुदाण्याची खिचडी (तिथल्या भाषेत उसळ) अप्रतिम होती...
रात्री काहीशी फोटोग्राफी केली तसेच दुसर्या दिवशी शेगाव ला प्रसिद्ध असलेल आनंद सागर इथे गेलो, तिथल वातावरण, मूर्ति, शांतता, पक्ष्यांचे आवाज निसर्ग सर्वच अप्रतिम आहे...
एकंदर या सर्व ठिकाणी काढलेले काही फोटोस......
१ झुक झुक गाडीतून जाताना इगतपुरी जवळ काढलेला फोटो...
२ आनंद विहार मधे प्रवेश घेतल्यावर समोरच असलेली भली मोठी कलाकृति....
३.
४
५ सुन्दर भाव जपलेय्त मुर्तिकाराने.. एकदम जिवंतपना वाटतो बघून
६
७ मनाला मस्त प्रसन्न करणारे स्वच्छंदी कमळ
८ मस्त पाउस पडून गेल्यावर खुललेल फूल... यावर पाणी अस जमलय की हे जणू कही प्लास्टिकचच आहे अस भास् होतोय
९ हे मोती बघून camera ला ही रहावालाच नाही
१० पुढील कही महिन्यात अजुन वेग्वेग्ल्या कलाकृति येतील त्यांचे कही फोटोस
११
१२
१३
१४ सर्वन्मधे जास्त अवड्लेली अशी ही कलाकृति
१५
१६
१७ आनंद विहार येथील रात्रीच दृश्य..
१८
१९ केवळ अप्रतिम असे भाव टिपलेत दोघांचे
२०. फुल दिसली की राहवत नाही हो camera ला पण....
२१. आनंद सागर चा आतील प्रवेशद्वार
२२. उगाच काहीतरी...
२३. अगदी खरे वाटत आहेत ना....
२४. तेथील मत्सलायत मस्त वेग वेगळ्या प्रकारचे मासे आहेत...
२५.
२६. खतरनाक असा माणसाना खाणारा पिह्राणा.. खरच याचे दात खतरनाक आहेत...
२७.
२८. क्लास असा एक मस्त रंगमंच तिथे उभारलेला आहे, अगदी जिवंत वाटत एक क्षणी हे....
२९.
३०.
३१. रंगमंचाच्या भोवती
३२. घोड्यावर स्वार महाराणा प्रताप
३३. कसाबस सापडल ते फूल्पाखारू camera मधे
३४.
३५. मनोरंजनासाठी असलेली मिनी रेल.. या गाडीतील announcment ख़ास आहे. मध्य रेलवे च्या कोपर स्टेशन आल्यावर जशी ती बाई बोलते त्याहून भन्नाट ही बाइए बोलते हो...
३६.
३७. अखेर रात्रि घरी परतताना स्टेशन वरून काढलेला असाच एक वेगळा फोटो

आवडले फोटो.
राहण्याचे शुल्क किती आहे तिथे? जरा डिटेल माहिती द्या.
फटू आवडले. शेगावबद्दल बरेच ऐकून असल्याने माझ्या आईवडीलांनी मागल्यावर्षी भेट दिली आणि ते अगदी स्वच्छ असल्याने यावर्षी पुन्हा भेट दिली. ही स्वछता फक्त देवस्थानापुरती मर्यादित आहे असे दिसते. जेवणाबाबत मत काहीसे तुझ्यासारखेच.
मस्त रे सौरभ.
छान फोटो. :)
मस्त सफर घडवलीत शेगावची.
फोटू भन्नाट रे
शेगाव बद्दल थोडेसे
शेगाव ला जाणार्या भाविकांत गेल्या ८ -१० वर्षात मोठ्या संखेने भर पडली आहे
श्रद्धा - अश्रद्धेचा भाग अलाहिदा , पण लोक तिथे मोठ्या संख्येने भेट देतात हे निश्चित . मराठी लोकांचाच भरणा यात जास्त आहे
शिर्डी - शेगाव ची तुलना नेहमीच होते.
पण यात शेगाव संस्थान बाजी मारून जातं , अत्यंत सुंदर स्वच्छता , कुठेही ढणाढणा वाजणारी बाजारू गाणी नाहीत , मठाच्या परिसरातल्या आतल्या भागात गल्लाभरू दुकान नाहीत,
असलेले कर्मचारी हे सेवाभावाने काम करताना दिसतात.
साधा कागदाचा कपटा जरी कुठे पडलेला दिसला , तरी तो पुढच्या मिनिटाला उचलला गेलेला असतो .
सर्वकडे एक प्रसन्न शांतता, कुठेही घाई गडबड नाही.. लाईन सुधा पद्धतशीर पणे फिरवलेली असते. कुठेही श्रीमंती थाटमाट नाही . पण साधेपणातही जागोजागी दिसणारी श्रीमंती .
शेगाव ला राहायची उत्तम सोय होते . भक्त निवास तर एखाद्या ३ स्टार हाटेल ला लाजवेल इतके सुंदर आहे, पण त्यात बुकिंग मिळणं कठीण असत, बरंच आधी बुक करावं लागत .
इतरही हॉटेल्स उत्तम आहेत
आनंद सागर म्हणजे खर्या अर्थाने आनंदाचा सागर
कित्येक एकरांवर वसलेली सुंदर बाग .. त्यात मधोमध असणार प्रचंड तळ.. विविध वृक्ष , फुलझाड .
ध्यानमंदिर , लहान मुलांसाठी एक छोटी ट्रेन . त्याशिवाय "musical fountain " हा एक प्रकार . अर्थात तो रात्रीच सुरु होतो .
खादाडीचीपण उत्तम सोय तीही अतिशय कमी दरात.
त्यात तुम्हाला पोहे.. जिलबी - फाफडा, उपमा , शिरा, कचोरी इत्यादी पदार्थ ५ -५ रुपयात मिळतात .
शेगाव ची कचोरी तर अतिशय फेमस आहे
पूर्ण आनंद सागर फिरायचं ठरवल तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही . शेगाव मंदिर ते आनंद सागर दरम्यान संस्थानांच्या विनामुल्य बस सुरु असतात .
मी तरी शिर्डीच्या गोंगाटात जाण्यापेक्षा शेगावला जाण जास्त पसंत करतो
सुपर
लाइक +१
या ठिकाणी सर्व माहीती मिळेल. संस्थानची राहण्याची उत्तम व्यवस्था अत्यंत माफक दरात आहे. धार्मिक स्थळी स्वच्छता व पावित्र्य कसे असावे याबाबत शेगाव संस्थान एक आदर्श आहे.
शेगावातील "आनंदसागर" तलाव हा मुळात एक ब्रीटीशकालीन पाझर तलाव होता. कालांतराने तो बुजून गेला.
शेगाव मंदीर ट्रस्टने तो तलाव पुन्हा खणून काढला . सुमारे ८० किमीवरून पाणी आणून त्यात भरले. तलावामुळे आसपासच्या विहीरीतील पाण्याची पातळी बरीच सुधारली तसेच पाण्यातील क्षाराचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे.
आनंदसागर आणि शेगाव गाव येथील तापमानात उन्हाळ्यात साधारणतः ६ ते ७ अंशाचा फरक असतो.
शेगाव मंदीरातील कर्मचारी हे बरेचसे पगारी कर्मचारी नसतात तर कित्येक भावीक सेवा म्हणून विनामोबदला हे काम करत असतात.
धन्यवाद.....
मठाच्या जवळ असलेल्या भक्त निवासात २ बेड असलेल्या रूम चे ४०० रु आहेत...
आम्ही राहिलो ते आनंद विहार तिकडे ४ माणसांसाठी पुरेल अशी रूम आम्ही घेतली तिचा दर ३५० रु आहे... अगदी उत्तम सोय आहे इथे, परिसरही अगदी मस्त आहे....
बाकी स्पा शी सहमत शिर्डीच्या अस्वच्चते पुढे शेगाव कैकपटीने उत्तम आहे... सुट्टी निवांत घालवायची असेल तर हि जागा एक उत्तम पर्याय आहे.......
श्री श्री श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शेगाव संस्थान हे बघण्यासारखे आहे हे खरेच, अर्थात गाव आणि बाजार अस्वच्छ आहे हेही तितकेच खरे. शेगाव संस्थान पूर्ण शेगाव दत्तक घेऊन सुधारणा करण्याच्या तयारीत होते पण ग्रामपंचायत, पालिका वगैरे संस्थांनी त्यांना अटकाव केला असे ऐकिवात आले . मात्र शेगाव संस्थानचे उपक्रम तितकेच अव्वल आणि निस्पृह भावनेने होत असतात. श्री महाराजांनी ज्या त्या तीर्थक्षेत्री वास्तव्य केले होते तिथली थोडी जागा संस्थानने विकत घेऊन तिथे सुरेख भक्तनिवास बांधलेत आणि भाडे देखील नाममात्र आहे. भाविकांना कमी दरात उत्तम सेवा पुरवण्यात कुठेही तडजोड केली जात नाही. पैश्याचा संचय करू नका, आलेल्या पैश्याचा योग्य विनियोग करा, विश्वस्तांनी निस्सीम भावनेने कारभार करा अशी श्री महाराजांची शिकवण होती. शेगाव संस्थानमध्ये गादी वारसा नाही, मंत्र दीक्षा नाही, शिष्यांचा घोळका नाही. आनंदसागर हा प्रकल्प मोठ्या हिमकतीने उभा करण्यात आलाय आणि तो यशस्वीरीत्या चालवला जातोय आणि जाईलच कारण त्यांच्या मागे श्री महाराजांची कृपा आहे.
|| श्री श्री श्री गजानन महाराज की जय ||
|| श्री श्री श्री गजानन महाराज की जय ||
शेगाव बद्दल फक्त ऐकले होते, आता पहायची खूप इच्छा झालीय. छान लिहिलंयस, फोटो एकदम भारी...
सगळेच फोटो आवडले, ५ व्या फोटोतल्या मूर्तीच्या चेहर्यावरचे भाव खूप आवडले.
शेगावच्या आनंदसागर बद्दल बरेच ऐकून आहे. तिथल्या शिल्पांचे फोटो आवडले. खूपच रेखीव शिल्पं आहेत.
पाचव्या छायाचित्रातील देवतेच्या चेहर्यावर का कोण जाणे एक खिन्नता जाणवते आहे.
३२व्या छायाचित्रातील राणा प्रतापचे छायाचित्राचा दिशा कोन चुकला आहे असे वाटते. विरुद्ध दिशेने छायाचित्र घेतले असते तर जास्त प्राभावी वाटले असते.
बाकी सर्व छायाचित्रं आणि वर्णन अतिशय उत्तम. मी आस्तिक नाही पण शेगावला तिथल्या स्वच्छतेसाठी आणि स्थळ सौंदर्यासाठी भेट द्यायला नक्कीच आवडेल आणि तेही तुमच्या ह्या लेखामुळे.
धन्यवाद....
प्रभाकर - महाराणा प्रतापांच्या मूर्तीचा फोटो दुसर्या बाजून काढण शक्य नवत कारण त्या पलीकडे शेवट होता आणि ते उंचावर होत, खालून फोतोकाध्य्नासाठी म्हणून जायचं म्हणजे जरा नकोस होत कारण खूप उंचावर असल्याने फोटो काही खास आला नसता तेवढ झूम करून... म्हणून असाच काढला.. जरा वेगळ्या आंगले ने काढलेल्या फोटो मध्ये त्यांच्या डोक्यावर कावळा आलाय म्हणून तो नाही टाकला...
हो जरूर जा आणि.. मी पण नास्तिक नाही पण जास्त देव देव पण जमत नाही... तरी चांगल्या ठिकाणी जायला नेहमीच आवडत म्हणून देवदर्शनास जायला आवडत ते तिथल्या निसर्ग वगरे या गोष्टींसाठी...
धन्यवाद, सौरभ. नक्की जाईन मी.
आनंदसागर माझ्या आवडीचे ठिकाण आहे. तुम्ही अत्यंत सुंदर फोटो काढले आहेत.
- नीलकांत
सर्वच फोटो सुरेख. आणखी काही फोटोंची भर..

१.
२.

३.

४.


५.
६.

७.

८.

९.
सुंदर :)
नक्की जाणार...
तिकडे एका ठिकाणी बागेत चोचीत सुविचार धरलेले करकोचे आहेत. त्यातला एक सुविचार आपल्याला लssssssय आवडला.
"वास ना छोडो, वासना छोडो."
फोटो छानच काढले आहेत. फुलांचा ताजेपणा जाणवला.
वाह, एकदम मस्त फोटो. राम-लक्ष्मण शबरीने दिलेली बोरं खातायत ती मूर्ती तर अप्रतिम आहे. राम-लक्ष्मण आणि शबरी पांढर्या रंगात आणि ती बोरं आणि पानं हिरव्या रंगात मस्त कलर कॉम्बिनेशन जमलाय.
मागे एकदा शेगावला गेले होते पण त्या वेळेला आनंदसागर ला जायला नाही मिळालं. आता कळतंय कि वेळ काढून जायला हवं होतं. पुढच्या वेळी नक्की.
जेवणाबद्दल - मी तर शेगावला जाताना आणि येताना सगळीकडे जी शेव भाजी मिळते ती खाल्ली होती. अप्रतिम असते तिकडची शेव भाजी. आज पण आठवणीने पाणी सुटलाय तोंडाला .
मस्त सर्व फोटु एकदम क्लास !
गण गण गणात बोते ----^----
खुप छान फोटो.... :)
अमोल केळकर
छान फोटो,शेगाव संस्थानातील ट्र्स्टी हे अत्यंत प्रामाणीकपणे काम करतात्,ते संस्थेच्या आवारातील पाणी सुधा पीत नाही असे एकुन आहे.
सुंदर वर्णन आणि फोटो.