कलादालन

थेकडी ते मुन्नार अणाईरंकाळ मार्गे

Primary tabs

थेकडीच्या परिसरातील मसाल्याच्या बागा - वेलदोड्याची बाग Image removed. हमरस्त्यालगतच्या बंगल्याकडे चढत जाणारा हिरवागार रस्ता Image removed. रस्त्यांना जणु 'एंजल्स ट्रंपेट्सचे भारदस्त कुंपण Image removed. एंजल्स ट्रंपेट्सची नाजुक, तलम अबोली पिवळसर फुले अक्षरश: हजारांनी फुलली होती Image removed. सर्वत्र हिरवाई, झाडावर देखिल हिरवे शेवाळ आणि रस्ता व हिरवाईच्या मध्ये पिवळी पाचोळ्याची महिरप Image removed. मुन्नारहुन चिन्नकणालला म्हणजे जिथे आमचे विश्रामधाम होते त्याच्या अलिकडे असलेले अणाईरंकाळ धरण Image removed. अणाईरंकाळ सरोवराचे हे दृश्य पाहुन मला तापोळा आठवला Image removed. अणईरंकाळचा विस्तिर्ण जलाशय, इथे हत्ती पाणी प्यायला येतात असे ऐकले. Image removed. Image removed. अणाईरंकाळ धरणावरुन दिसणार्‍या धुक्यात करविलेल्या टेकड्या Image removed. पुन्हा एंजल्स ट्रंपेट्स मात्र पांढर्‍या रंगात, आणि त्यात बेमालुम मिसळलेली गारवेल Image removed. चिन्नकनाल म्हणजे आमचे मुन्नार जवळ आले आणि पाउस सुरू झाला, सारथी आणि चिरंजिव छतावरचे सामान झाकायला प्लास्टिक घेउन सरसावले Image removed. झोड पावसातुन प्रवास करत आम्ही विश्रामधामावर पोचलो Image removed. निसर्गाच्या बदलत्या छटा Image removed. Image removed. Image removed. खोलितुन दिसलेले विलोभनिय दृश्य आणि त्याच्या बदलत्या छटा Image removed. Image removed. Image removed.
सुनील

केरळचे हिरवेगार फोटो मस्तच!

मस्तं हिरवाकंच निसर्ग पाहून सोनू निगमचे हे गाणे आठवले....

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे ...

हेवा वाटावा अशी तुमची ही सहल आहे.

मजा करा राव. आम्ही इथे ४८ डि. से. तापमानात भाजून निघतो आहोत.

५० फक्त

ओ रस्ते सोडुन बाकीचे फोटो टाका की, इथं च्यायला एक दिवस सुट्टी नाही मिळत आणि तुम्ही असले इनव्हायटिंग फोटो टाका...

उदय के'सागर

आम्ही नेमक्या ह्याच रस्त्याने गेलो होतो पण मुन्नार ते थेकडी असे गेलो :)

आणि विशेष म्हणजे ते वेलदोड्याची शेती/रोपं जिथून सुरू होतात तिथपासून वेलदोड्याचा मस्तं सुगंध दरवळत राहतो.. तर हा सफर नुसता 'सुंदर' च नाही तर 'सुंगधी' पण आहे :)

सध्या पावसाळी धाग्यांची रेलचेल सुरू आहे,,, त्यामुळे मस्त वाट्टय.....

क्लासिक फोटो आणी वर्णन :-)

सूड

फोटो झकासच!!

अवांतरः भटजींना आज पूजेचं आंवतण दिसत नाही, स्मायल्याच स्मायल्या टाकतायेत.

गवि

सुंदर निसर्ग.. क्या बात है..

मुन्नारची आठवण विशेषतः तिथल्या थंड पावसाळी ओल्या हिरवाईची आठवण झाली.

उत्तम फोटो. धन्यवाद...

रेवती

किती सुंदर छायाचित्रे!
तुमच्या फटूंमुळे 'आता मात्र केरळ ट्रीप हवीच' असं वाटतय.