पाककृती

झटपट वऱ्हाडी ठेचा :

Primary tabs

साहित्य: ८-१० लाल मिरच्या देठ काढून,(काश्मिरी /ब्याडगी मिरची,) ३-४ पाकळ्या लसूण, एक लिंबू , एक दीड चमचा साखर, चवीपुरते मीठ इ. कृती: लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक कराव्यात. मंद आचेवर कढईमध्ये बारीक केलेल्या मिरच्या लसणाची पेस्ट घालावी. मिरची भिजेल एवढेच पाणी घालून शिजवावे. पाणी आटत असताना त्यात एक चमचा साखर, लिंबू रस आणि मीठ घालून मिश्रण वाफवावे झालेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात २ चमचा तेल घालून मिश्रण एकजीव करावे. किमान अर्धा तास अथवा जास्त वेळ मुरून द्यावे ते अधिकच रुचकर लागते.
नाना चेंगट

झटपट वऱ्हाडी ठेचा

अच्छा हा ठेचा होय !

मला वाटले की वर्‍हाडी मंडळींना ठेचा असलं काही सांगत आहात की काय ?
आजकाल भरोसा नाही हो कूठे काय म्हणे आसामी ठेचा तर कुठे बांग्लादेशी ठेचा !

बाकी ठेचल्यावरचा आपलं ठेचा केल्यानंतरचा फटू काय धुवायला टाकला आहे का?

उदय के'सागर

मला वाटले की वर्‍हाडी मंडळींना ठेचा असलं काही सांगत आहात की काय ? >> :D .. ह.ह.पु.वा.

पैसा

ओ तै, मिपावर पाकृचा फोटो नसेल तर फाउल धरला जातो. आधी पाकृचा फटु हजर करा!

नाना चेंगट

नुस्ता फाऊल धरु नका ! कडक कारवाई करा ;)

फोटू हवा फोटू.... ;)

त्या शिवाय वर्‍हाडीच काय...? कुणालाच ठेचल्याचं मान्य करणार नाही आंम्ही....!

मराठे

मिपावर फोटो बघितल्या नंतर मग पाकृ वाचणारी (आणि बहुतेक वेळा न वाचताच प्रतिक्रिया देणारी) मंडळी आहेत त्यामुळे फोटो नही तो कुछ नही.
रच्याकने (बाय-द-वे): सदस्य झाल्यावर दणादण् लेख लिहित सुटू नका. थोडा थोडा गॅप घ्या. नाहीतर ठेच्यापेक्षाही तिखट प्रतिक्रीया येईल. हे मी बरंच साध्या शब्दात सांगतोय :)

सूड

फोटो खंय गेलो ?

अवांतरः सदस्यत्व मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आत लेख, हास्य(?)कथा, काव्य आणि आता पाकृ असा वावर बघून हेवा वाटला. अवर वावर इज व्हेरी लिमिटेड.आता भटकंती, कलादालनात एकेक लेख आणि एक फक्कडसा काथ्याकूट टाकून द्या.

रेवती

सदस्यत्व मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आत
यात चूक कोणाची ? आधी तुम्हीच ना कौतुक केलं?
अब भुगतो! (संदर्भ- हिंदाळलेले मराठी.) ;)

मदनबाण

अच्छा,अशा पद्धतीने सुद्धा ठेचा करतात तर...

माझी पद्धत :-- ३-४ मिरच्या घेतो. मग त्या गॅसवर भाजतो. एखाद-दुसरी लसणीची पाकळी घेतो आणि भाजलेल्या मिरच्या आणि लसणीची पाकळी + दाण्याचे कुट + चवी पुरते मीठ टाकुन मिक्सर मधे वाटुन घेतो.
आता जेव्हा परत ठेचा करीन तेव्हा दाण्याच्या कुटा ऐवजी फक्त दाणे टाकुन पाहणार आहे ! :)

खूप्प्प्प्प खूप्प्प्प्प्प धन्यवाद !
गेले साडेबत्तेचाळीस महिने ही अमूल्य आणि रेअर पाकृ शोधत होतो.

+१ परा ;)

वरील पाकृ जरा वेगळीच आहे कधीच ऐकली नाही ...मदनबाण म्हणतात तशी पाकृ माहीत होती मला
मिक्सरवर वाटण्यापेक्षा खल-बत्त्यात कुटलेला ठेचा जास्त रुचकर लागतो :)
ठेचापेक्षा चटणीचा प्रकार जास्त वाटत आहे.

मन१

असा नुसता ठेचाच बनतो असे नाही. ह्याचे मस्त लाडूही बनवावेत.
वाटीभर ठेचा घेउन मस्त हाताना बांधावा, लाडू बनवावा.
आपल्याला नाही नाही ते प्रतिसाद देणार्‍यांना , प्रतिसद उडावणार्‍या संपादकांना आग्रहाने , प्रेमाने, बळेबळे खाउही घालावेत.

वेताळ

गवळयाची आठवण आली. तो दररोज न चुकता दुधाचा रतीब घालत असे.
पण असो दुधापासुन ठेचा बनवायला येत नाही.

कवितानागेश

ही चटणी तर भेळेतली/ शेवपुरीतली तिसरी चटणी असते, भेळवाले वापरतात ती.
हा ठेचा नाही.