कलादालन
विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन
Primary tabs
अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा
चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा
अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती
शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे
अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती
या चार ओळी खासच आहेत.
बाय द वे, कोणतं वृत्त म्हणायच हे ?
-दिलीप बिरुटे
" तेरी भी चुप और मेरी भी.. " या टीकग्रंथात जालिंदरजींनी सांगितलं हे वृत्त...
मेंदूक्रांता वृत्त..
दोलक सतराव्या मात्रेवर.
तीर्थ पाचव्या मात्रेवर...
बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. इतकंच आठवतंय...
दोलक सतराव्या मात्रेवर.
तीर्थ पाचव्या मात्रेवर...
बाकी पूर्ण वेळ टाम्टुम..
माधव ज्युलियन छन्दोरचना या ग्रंथात मेंदूक्रांतावृत्तावर लिहायचे राहुन गेले.
बाकी आभार. दोन क्षण सुखात गेले.
-दिलीप बिरुटे
छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं!!!
जागा चुकली की हो. बरं ते असो.
या निमित्ताने काही अभिजात काव्य वाचायला मिळाले - ते ही समजावून घेण्याचा आटापिटा न करता - हा एक फायदा झाला.
बादवे: तुमच्या कवितेवर ग्रेसचा प्रभाव आहे नि थोडी नियतीशरणता असे वाटते का?
भ्रांत
स्वतंत्र मी स्वयंभू मी
तांत्रिकांची भ्रांत मी
वर्णविंध्य स्पंदनांत
घट्ट स्पष्ट रुष्ट मी
अष्टमी त नष्टमी
सुबद्ध मीच भ्रष्ट मी
कष्ट मी नि क्लिष्ट मी
यत्र तत्र मीच मी
शरदिनी १९ ऑगस्ट २०१२
शरदिनीची अपेक्षा असो वा नसो, या कवितेतून अर्थ निघेल. 'को हं'चे उत्तर आहे ही कविता म्हणजे!
आमच्यासारख्या अज्ञ लोकांना अशी कविता पाहिली की याचीच आठवण होते ;)
जालिंदरजींनी असल्या लोकांवर केलेली एक कविता आहे... त्यातल्य काही ओळी टंकत आहे.
स्मरणभरारी दौलतजादा
जोश जलाली संकटनादा
ऐन दुपारी केला वादा.
इंजिनदादा इंजिनदादा
जालिंदर जलालाबादी
( जलालाबादचे असह्यकडे.. या संग्रहातून)
सिंटॅक्सवादी मार्कोव्हनादी
पोष्टमॉडर्नी सेमँटिकी का
रंगहीन हिरवे विचार सगळे
झोपती क्रुद्धपणे का||
अवघड आहे !!!
काही कळले काही नकळले
नकळलेले कळले कळले
कळलेले न कळले न कळले
कळत वळत चुळत बुळत
कळवळत चुळबुळत
वळवळत कळकळत
कळकळ वळवळ मळमळ सळसळ
सळवळ मळसळ कळवळ कळसळ
ठ्ठो..
अर्धवटराव
कळले नकळले
नकळलेले कळले कळले
कळलेले न कळले न कळले
हा..हाहा...हाहाहा.....
सगळाच हाहाकार
वा तै...
भडकमकरांनी आमचा निरोप पोचवलेला दिसतोय....
तुम्हाला पुन्हा कविता व्हायला लागलेल्या बघुन समाधान वाटले...
आमी तर तुमच्या कविता केवळ नादमयतेकरिता वाचतो बॉ.. बेष्ट!
मेंडूक्रांता वृत्त आवडेश!
या असल्या कविता खरच अर्थगर्भीत असतात का पहिले कविता लिहायची आणि मग अर्थ शोधायचा असा प्रकार असतो?
अर्धवटराव
मजा आली वाचुन
'गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व' असे एक शीर्षक तरळून गेले डोळ्यासमोरून ...
+१
शाष्पिक तात्विक नैराकर्य इ.इ. संदर्भ
>>गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व
-- व्वा.. काय झकास व्युत्पन्न शिवी आहे (नक्की शिवीच आहे का माहित नाहि ). आता येऊ देत कोणाला वादविवाद करायला... पार फाडुन काढतो.
अर्धवटराव
न कळालेल्या कवितांमध्ये अजुन एका कवितेची भर पडली. अवघड आहे.
भारि लिवलाय ओ तै.
आपण तर लई खुश.
आयच्या गावात.....
या शरदिनीचे आप्त पण आहे का इथे......
काहीतरी कळतंय खरे.. :)
हे पादाकुलक वृत्त आहें कीं कांय???? १६ मात्रा हैत म्हणून विचारलं.
भन्नाट कविता!