हनी - चिली पोटॅटोज
Primary tabs
साहित्य:
२ ते ३ बटाटे सालं काढून, उभे -लांब चिरुन घेणे (फ्रेंच फ्राईजप्रमाणे)
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१-१/२ टेस्पून टोमॅटो सॉस
१ टीस्पून चिली फ्लेक्स (नसल्यास लाल तिखट वापरु शकता आवडीप्रमाणे कमी-जास्त)
थोडेसे मीठ
१ टीस्पून तेल
पाकृ:
एका रिक्लोझेबल बॅगमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करुन हलवून मिक्स करुन घेणे. (भांड्यात ही एकत्र करुन घेऊ शकता)
ओव्हन २०० डिग्री सें वर प्री-हीट करुन घेणे.
बेकिंग ट्रेवर व्हॅक्स पेपर लावून किंवा तेलाने ग्रीज करुन घेणे.
त्यावर बटाट्याचे उभे काप सर्वत्र पसरवून घेणे.
२०० डिग्री सें वर ३०- ३५ मिनिटे बेक करणे (मधे एकदा बटाटे उलटवून ठेवणे)
नोटः ज्यांच्याकडे ओव्हन नाही ते डीप फ्राय करु शकतात, फक्त त्यात मग बटाट्यांना तेल लावू नये.

साहित्य सॉसः
१ टेस्पून डार्क सोया सॉस
१ टेस्पून टोमॅटो सॉस
१-१/२ टेस्पून मध
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
१-१/२ टीस्पून तीळ
कांद्याची पात बारीक चिरून
मीठ चवीनुसार (सॉसमध्ये ही मीठ असतं, तसेच बटाट्यांमध्ये ही घातलं होतं)
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये तेल गरम करुन लसूण परतून घ्या.
लसूण चांगला परतला गेला की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, मध, मिरपूड व मीठ घाला.
त्यात बेक केलेले बटाटे घालून सगळं मिक्स करा.
आता त्यात कांद्याची पात व तीळ घालून एकत्र करा.

गरमा-गरम हनी - चिली पोटॅटो स्टार्टर / अॅपेटायझर म्हणून सर्व्ह करु शकता किंवा कुठल्याही न्युड्ल्स, फ्राईड राईसबरोबर सर्व्ह करु शकता.
करून पहाणार, धन्यवाद! (जाता जाता, २०० डि. सें. म्हणजे जवळजवळ ४०० डि. फॅरनहाईट्स....)
C = 5/9 (F-32)
F = 9/5 (C+32 )
त्यामुळे,
२०० =५/९(F-32)
200=0.5556(F-32)
200/0.5556=F-32
359.971 = F-32
359.971+32 =F
F=391.971
approx 392 F
जबरदस्त !!! परफेक्ट !!!
_/\_ ग्रेट!
काय गं प्रतिक्रिया देऊ दरवेळी?
वा! छान !! मस्त!!!
एकूणच पदार्थ बघत रहावे असे सादरीकरण असते.
खासम् खास... आदर्श चखना.
'हनी'च्या संगतीस 'चीली'चा झणझणीत असेल तर काय वर्णावी मजा.
गेली १५ मिनीटे टक लावून शेवटच्या फोटुकडे पहात बसलोय.

आत्ता येईल आत्ता येईल पुढ्यात...
आईग्ग! अगदी हेच म्हणायचय.
गणपा अशी वाट पाहीली तर खरेच बाहेर येइल ती डीश.
आज काही खरं नै ब्वॉ मिपावर!
काय म्हणणार आता...?
पुन्हा एकदा धागा पाहिला. तूर्तास....
खुप मस्त दिसतेय पाकक्रुती..
छ्य्याआआआ......... छळ च छळ!
लय भारी .
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!!
काय छळ चालवलाय राव आज! मिपाचे बल्लव आणि सुगरणी माजलेत नुसते.
शेवटचा फोटो जीवघेणा आहे.
फार लाळ गाळण्यापूर्वीच झटपटकरून पाहिली अन फटू काढण्यापूर्वीच फस्त झाली..
धन्स सानिकाजी.
मस्त ... (आज परत एकदा चूक केली 'जेवणा'आधी तुमचा धागा उघडण्याची, खपलो आहे)
धन्यु.
बाकी प्रतिक्रीया नेहमी प्रमाणेच.
नेहमी प्रमाणेच अप्रतिम..:)
नक्कीच करून पाहण्यात येईल :)
सगळेच फोटो क्लास आलेत.
:) अ :) प्र :) ति :) म :)
छानच.
पा़कृंचे इतके चांगले फोटो काढून डकवू नयेत. लाळ गळून गळून आमचा किबोर्ड खराब होतो.
विशेषतः इतक्या जवळून काढलेले फोटो बघून तर स्क्रीन पण खराब होतो.
- हुकूमावरून.
'नुसत्या मिसळपाववरच्या पाककृती 'बघत' बसण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवू नका. घरात काही बनवून आम्हालाही खाऊ घाला कधी तरी.'
-बायकोच्या हुकुमावरून
का असा अंत पाहता?
कसलं प्रेझेंटेशन आहे...एक नंबर
आजकाल जुन्या पाक्रु दीसत का नाहीत
मस्त