Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुरावलेलं..

ग — गुड्डू, Fri, 09/21/2012 - 13:08
परतीचा प्रवास, वाटेत फक्त अंधार.. क्षितिजाची फक्त चाहूल, बाकी सर्व काळोख.. रातकिड्यांची किर्र किर्र, हलकेच वाऱ्याची शिळ.. पत्थरांची रेलचेल पायी, ठेच - खाच खळगेची साथ.. असं कसं घडलं, नक्की कुठे पाल शिंकली.. सर्व काही नीट चालू असता, कशी सर्व घडी विस्कटली.. आपण सूर्याला गाठलेलं, त्याला हसून हस्तांदोलन केलेलं.. जे न पाहिलं त्या रवीने, ते आपण दोघांनी सहज अनुभवलेलं.. तसं आठवतं घडलेलं सर्व काही, पण मन काही मानत नाही.. आठवणी येत राहतात , मनातून काही जात नाही.. आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो.. जाण्याची वाट फार सुखद होती रे, कारण तिथे तुझी उबदार सोबत होती रे.. परतीचा प्रवास आता एकट्यानेच करायचाय, तुझ्या आठवणींच्या सोबतीने .. जे झालं ते पुसता येणार नाही, या जाणीवेच्या सोबतीने.. जमलं तर माफ कर मला, आणि अलगदपणे विसरून जा.. हरवून टाक ते धागे दोरे, नव्या आयुष्याला सामोरा जा.. माझ्यासाठी तू नेहमीच जवळचा राहशील, तू म्हणजे माझ्या जागेपणी पडलेलं एक दिव्य स्वप्न.. जरी सध्या तू दुरावलेला, तरी तू या आयुष्यातला एकमेव जिवलग मित्र..

प्रतिक्रिया द्या
1751 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
किसन शिंदे Fri, 09/21/2012 - 13:44 नवीन
हरवून टाक ते धागे दोरे, नव्या आयुष्याला सामोरा जा.. इथे तुम्हाला सामोरी टाकायचं होतं का? नाहीतर मग इथे चुकल्यासारखं वाटतंय. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/21/2012 - 16:28 नवीन
>>>>नक्की कुठे पाल शिंकली.. पूर्वी माशी शिंकायची. हल्ली पालही शिंकायला लागली का? >>>>आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो.. माझ्यासाठी तू नेहमीच जवळचा राहशील,..... ..... तरी तू या आयुष्यातला एकमेव जिवलग मित्र..<<<< ह्या ओळींमधून कांही तरी भलतेच मनांत रुजविले जात आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/21/2012 - 21:22 नवीन
आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..>>> अहो ठीक आहे... पण मग लग्न करायच ना सरळ,,,कय पण राव तुम्ही??? ;-)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 09/23/2012 - 07:30 नवीन
"वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..>>> अहो ठीक आहे... पण मग लग्न करायच ना सरळ,,,कय पण राव तुम्ही??? smiley" येडा झाला का? लग्न केल असत तर कविता कशी प्रसवेल? :) काय्य्पन उग्गिच..
  • Log in or register to post comments
ग
गोमटेश पाटिल Wed, 10/10/2012 - 10:04 नवीन
sagalyach goshti etakya sopya nasataat jitke sope yekhadyavarati pratikriya dene..
  • Log in or register to post comments
ग
गोमटेश पाटिल Wed, 10/10/2012 - 10:04 नवीन
sagalyach goshti etakya sopya nasataat jitke sope yekhadyavarati pratikriya dene..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा